• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारात अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला.
Published 09-May-2017 15:42 IST
सोलापूर - उजनी धरणात आजमितीला ५८ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यातील साडेचार ते साडेपाच टीएमसी पाणी सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. एकूण ९ हजार क्युसेक्स इतक्या वेगाने हे पाणी सोडल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published 09-May-2017 15:32 IST
सोलापूर - बार्शी तालुक्यातील कारी येथे जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. यासंबंधी चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
Published 09-May-2017 13:06 IST
सोलापूर - विहिर खोदण्यासाठी १०० टक्के अनुदान मंजूर होऊन ५ वर्षे लोटली तरीही अद्याप अनुदान मिळाले नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने अखेर आमरण उपोषण सुरू केले. मात्र उपोषणादरम्यान कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने ६० वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
Published 09-May-2017 12:22 IST
सोलापूर - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली होती. सर्व ठिकाणी उष्णता जाणवत होती. यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळले होते. मात्र सोमवारी सायंकाळी ५ वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोलापूर शहर आणि परिसरात जवळपास एक तासभर पाऊस झाल्याने नागरिकांना वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळाल.
Published 09-May-2017 11:15 IST
सोलापूर - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तूर खरेदीला मुदत वाढ देण्याबाबत चर्चा केली. राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तूर खरेदीसाठी ३१ मे २०१७ पर्यंत मुदत वाढ दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती पणन मंत्रीMore
Published 09-May-2017 10:18 IST | Updated 10:28 IST
सोलापूर - पूजा मागासवर्गीय गारमेंट्स औद्योगिक उत्पादक संस्थेला शासनाकडून मिळालेल्या दोन कोटींच्या आर्थिक सहाय्याचा विनियोग योग्य ठिकाणी न केल्याने तत्कालीन समाज कल्याण अधिकारी मनीषा फुले आणि दीपक घाटे यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली. पुढील कार्यवाहीत प्रथम वर्ग न्यायालयाने दोघांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Published 07-May-2017 11:26 IST | Updated 11:54 IST


तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण