• किदम्बी श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
  • रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
  • कोल्हापूर: महसूल मंत्र्यांच्या संपत्तीची ई.डी.मार्फत चौकशी करा - आमदार क्षीरसागर
  • ठाणे : मनसैनिकांना चोख उत्तर देण्यासाठी डोंबिवलीतील भीमसैनिक सज्ज
  • सोलापूर : कर्जमाफीची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात - सुभाष देशमुख
  • औरंगबाद : कर्जमाफीची मार्केटिंग करा - रावसाहेब दानवे
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - एकीकडे राज्यात शेतकरी आपल्या पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून धडपडत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या आगतिकतेचा फायदा भ्रष्ट अधिकारी घेत आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी गाव कामगार तलाठ्याकडून दाखला घ्यावा लगातो. याच दाखल्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून २० रुपयांची लाच घेतली जात आहे. याचाच भांडाफोड येथील एका शेतकऱ्याने स्टिंग ऑपरेशन करत केला आहे.
Published 01-Aug-2017 16:38 IST
सोलापूर - शहरातील अचल आटोमोबाईल्सचे मालक सुहास हुंबरवाडी यांना पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना बार्शी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
Published 01-Aug-2017 08:54 IST
सोलापूर - समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी स्वामी असिमानंद यांना अटक करण्यात आली होती. हे स्फोट घडवून आणण्यास संघप्रमुख मोहन भागवत यांनी सांगितल्याचे असिमानंद यांनी सांगितले होते. त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे कारवाई करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. याचा अर्थ काय ? असा सवाल करत असिमानंद यांच्याकडे डायरी असेल तर प्रकशित का करत नाही, असा सवाल शिंदे यांनी केला.
Published 28-Jul-2017 18:27 IST
सोलापूर - रेल्वे विभागाकडील मिळकत कराच्या थकबाकीसाठी महापालिकेच्या वतीने डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागील २५ वर्षापासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने पालिकेचा कर थकवला आहे. याकारणाने पालिका पदाधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी हलगीनाद करत रेल्वे प्रशासनाची ड्रेनेज लाइन तोडली.
Published 28-Jul-2017 18:31 IST | Updated 18:33 IST
सोलापूर - पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरास जेरबंद केले आहे. दुचाकी चोरीबरोबर सोनचाखळी चोरीतही या चोराचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. निशांत नरसिंह वेरनेकर, असे या चोरट्याचे नाव आहे.
Published 24-Jul-2017 19:43 IST
सोलापूर - पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेरामेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. ती दूर होऊन पाऊस पडू दे, अशी साद यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सिद्धरामेश्वरांना घातली.
Published 24-Jul-2017 19:21 IST
सोलापूर - शहरातील टीईटी परीक्षा केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना सकाळपासून ताटकळत उभे राहावे लागले. परीक्षा दहा ते एकच्या दरम्यान असल्याने येथील एका केंद्रावरील मुख्य गेट अचूक दहा वाजताच बंद करण्यात आले. यामुळे हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.
Published 22-Jul-2017 17:59 IST
सोलापूर - माजी कृषी अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून सलग ३ वर्ष शासकीय अनुदान लाटले आहे. २०१२ ते २०१५ या कार्यकाळात पदावर असताना या कृषी अधिकाऱ्याने फळबाग लागवड न करता अनुदान उचलले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी ननवरे यांनी ही माहिती उजेडात आणली आहे.
Published 20-Jul-2017 20:15 IST
सोलापूर - महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेने विविध मागण्यासाठी सोलापूर बसस्थानक येथे अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास संघटनेचे कर्मचारी संपावर जातील, असा इशारा देण्यात आला.
Published 20-Jul-2017 19:49 IST
सोलापूर - पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरमधून फिरण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्नही वाऱ्यावर सोडले आहेत, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
Published 18-Jul-2017 20:29 IST
सोलापूर - मराठा वस्ती येथे शिवगंगा देवीचे मंदिर आहे. शिवगंगा मंदिर ट्रस्टने मंदिरासमोर असलेली १० हजार स्क्वेअर फूट जागा विकत घेतली आहे. या जागेवर मंदिर समितीच्या वतीने भव्य असे मंगल कार्यालय बांधण्यात येणार आहे. परंतु मंदिर समितीच्या जागेवर सध्या बेकायदा बांधकाम सुरू आहे. येथील गावगुंड येथे अतिक्रमण करून व्यापारी संकुल उभारत आहेत.
Published 16-Jul-2017 18:50 IST
सोलापूर - तेलंगणा सरकारकडुन शासकीय कामासाठी सांगोल्यात आलेल्या जनावरांच्या डॉक्टरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळत डॉक्टरची सुखरुप सुटका केली.
Published 10-Jul-2017 17:27 IST | Updated 17:47 IST
सोलापूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतू त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. कर्जमाफी व तातडीच्या कर्जाबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
Published 10-Jul-2017 16:00 IST
सोलापूर - सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तरुणांनी वर्षभरापूर्वी गुडमॉर्निंग ग्रुपची स्थापना करून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम राबवला. बार्शी शहरातील संभाजी नगर रोड, रेल्वे स्टेशन, दत्त नगर, भोसले चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून या तरुणांनी ९०० झाडे जगवली. रेल्वे मैदानाला २०२० सालापर्यंत ऑक्सीजन पार्क बनवण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला आहे.
Published 07-Jul-2017 07:07 IST

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव