• पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
  • वाशिम : मंगरुळपीर येथील लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
  • वाशिम : नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - डॉक्टरांच्या राज्यभरातील संपाला उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आज रूग्णसेवेते रूजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने सोलापुरातील ११२ डॉक्टरांना निलंबित करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली आहे.
Published 22-Mar-2017 17:26 IST
सोलापूर - शहर पोलिसांकडून छायाचित्रकार आणि पत्रकारांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ सोलापुरात पत्रकारांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
Published 22-Mar-2017 17:07 IST
सोलापूर - जिल्हा परिषद निवडणुकीवेळी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांचे चिरंजीव यशवंत शिंदे याला सोलापूर पोलिसांनी मारहाण केली. मागील काही महिन्यांपासून सोलापुरात पोलिसांकडून नागरिकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Published 22-Mar-2017 13:54 IST
सोलापूर - जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी विश्वासघात केल्याचा आरोप जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गटाचे सर्व ८ जिल्हा परिषद सदस्य राजीनामा देणार आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाही खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी आग्रह करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Published 22-Mar-2017 11:48 IST
सोलापूर- जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत संजय शिंदे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार अशी परिस्थिती असताना देखील संजय शिंदे यांनी आकडेवारीच्या खेळात बाजी मारली.
Published 21-Mar-2017 20:45 IST
सोलापूर - जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २३ उमेदवार निवडून आले आहेत. असे असुनही राष्ट्रवादीने सांगोला विकास आघाडीच्या अनिल मोटे यांना उमेदवारी दिली आहे.
Published 21-Mar-2017 12:55 IST
सोलापूर- जिल्हापरिषदेसाठी कमी संख्याबळ असताना देखील भाजपने संजय शिंदे हे अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तर संख्याबळ जास्त असताना देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अद्याप अध्यक्ष पदाचा आपला उमेदवार जाहीर केला नाही. यामुळे भाजप नक्की काय खेळी करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Published 20-Mar-2017 18:51 IST
सोलापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अन्नदात्यासाठी एक दिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले. सरकारला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या संवेदनांची जाणीव करून देण्यासाठी आणि शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
Published 20-Mar-2017 09:58 IST
सोलापूर - चोरांची आता देवावरही वाकडी नजर पडली असून बसवेश्वरांची मूर्तीच चोरट्यांनी चोरुन नेल्याने खळबळ उडाली. ही घटना दक्षिण सोलापुरातील होनमुर्गी या गावात घडली आहे. बसवेश्वरांची मूर्तीच चोरट्यांनी चोरुन नेल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे.
Published 20-Mar-2017 09:52 IST
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे शेतीच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जखमी झालेले शेतकरी मल्लिकार्जुन दिंडोरे यांना उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 20-Mar-2017 07:50 IST | Updated 10:06 IST
सोलापूर - महानगरपालिका परिवहनच्या बुधवार पेठेतील बस डेपोतील दोन नव्या गाड्यांना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन बस गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
Published 19-Mar-2017 14:01 IST
सोलापूर - शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले आहे. पाणी द्या पाणी द्या, पालकमंत्री पाणी द्या, या पालकमंत्र्यांचे करायचे काय ? खाली मुंडी वर पाय, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
Published 18-Mar-2017 18:40 IST
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या लेखासेवा वर्गातील कर्मचाऱ्यांचे दोन दिवासांपासून लेखणीबंद आंदोलन चालू आहे. यामुळे दररोज ५ कोटींचे नुकसान होत आहे. पदोन्नतीचा कोटा वाढवून वित्त व लेखा सेवा वर्ग ३ ची परीक्षा दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावी. खंडपीठाच्या निर्देशानुसार ग्रेड पे देण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
Published 17-Mar-2017 19:27 IST
सोलापूर - अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षभरात आली होती आणि ज्वारी, गहू, मका, हरभरा आदी पिकांची काढणी सुरू होती. मळणीसाठी काही अवधी शिल्लक असताना झालेल्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणाने हिरावून नेला.
Published 17-Mar-2017 14:26 IST

video playजिल्हापरिषदेच्या शिक्षकाने बनवले मतदान यंत्र, असे...
जिल्हापरिषदेच्या शिक्षकाने बनवले मतदान यंत्र, असे...

अशा प्रकारचा ग्रीन टी ठरतो आरोग्यासाठी हानिकारक
video playन्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका
न्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका