• पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
  • वाशिम : मंगरुळपीर येथील लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
  • वाशिम : नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर- सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत नागरिकांनाही मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री शहरातील राजस्व नगर आणि बसवेश्वर नगरात घडली. यावेळी दरोडेखोरांनी मारहाण केल्याने अर्चना कुलकर्णी, नारायण कुलकर्णी हे दोघे गंभीर जखमी झाले. मात्र शहरात दरोडेखोर धुमाकूळ घालत असताना पोलीस गेंड्याची कातडी पांघरुन असल्याचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
Published 31-Mar-2017 19:33 IST
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उडान योजनेंतर्गत सोलापूरसह राज्यातील ५ शहरात विमानसेवा सुरु करण्याला गुरुवारी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली सोलापूर - मुंबई विमानसेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Published 31-Mar-2017 16:29 IST
बल्लारी- सोलापूर येथील लॉरी क्लिनर युवकाचा बल्लारीतील बँकेच्या संरक्षक भिंतीवर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. समीर शेख असे त्या मृत युवकाचे नाव असून तो सोलापुरातील सनातन नगरातील रहिवासी आहे. दरम्यान समीर हा मंद असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Published 30-Mar-2017 19:13 IST | Updated 19:47 IST
सोलापूर - अनैतिक सबंधातून नाही तर केवळ आरोपीच्या संशयी वृत्तीमुळे इंद्रजित गायकवाड (वय १२) याचा खून झाला असल्याचे उघड झाले आहे. इंदापूर तालुक्यातील निमगावभाट येथे इंद्रजित गायकवाड याचा मृतदेह आढळून आला होता. यातील आरोपी विश्वास साळुंखे याने केवळ संशयवृत्तीमुळे हा खून केल्याचे आता समोर आले आहे.
Published 29-Mar-2017 21:59 IST
सोलापूर - पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ टेंभूर्णी येथील तरूणाने पोलीस ठाण्याबाहेर उपोषणास सुरूवात केली आहे. न्याय न मिळाल्यास कोल्हापूर परिक्षेत्रीय कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या तरूणाने दिला आहे.
Published 29-Mar-2017 16:38 IST
सोलापूर - पहिल्या पत्नीच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने पतीने आपल्या ७ वर्षीय मुलासह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. हा प्रकार मोहोळ ते सोलापूर रेल्वे मार्गावर वडवळ शिवारातील पवार वस्तीजवळ घडला.
Published 28-Mar-2017 22:38 IST
सोलापूर- शहराच्या शेळगी या भागात मागील अनेक महिन्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. घरासमोरील सायकली तर कधी रिक्षांच्या बॅटऱ्या अशा छोट्या वस्तूंवर चोरटा हात साफ करत होता. वाढत्या चोऱ्यांनी येथील नागरिक हैराण झाले होते. पोलीस गुन्हेगाराला शोधत नाहीत म्हटल्यावर नागरिकांनीच सापळा रचून चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Published 27-Mar-2017 20:29 IST
सोलापूर- जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. स्वाईन फल्यूमुळे आत्तापर्यंत ६ जण दगावले आहेत. याशिवाय आणखी १५ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Published 27-Mar-2017 20:38 IST | Updated 20:41 IST
सोलापूर- यंदाच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा चांगलाच पराभव झाला. त्याचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वादाला आता सुरूवात झाली आहे.
Published 27-Mar-2017 19:44 IST
सोलापूर - हक्काचे पाणी असूनही शासन पाणीपुरवठा करत नसल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास १८ गावांनी, 'पाणी द्या अन्यथा कर्नाटकात सामील करा, अशी मागणी करत रास्तारोको आंदोलन केले. सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Published 25-Mar-2017 17:25 IST
सोलापूर- इंदापुर तालुक्यातील निमगावभाट येथील अल्पवयीन मुलाचा खून करून आरोपी करमाळा पोलिसात स्वत:हून हजर झाला. विश्वास साळुंखे (३५) असे आरोपीचे नाव आहे.
Published 24-Mar-2017 17:11 IST
सोलापूर- मोहोळ तालुक्यातील न्यायालयात आज एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. न्यायाधिशांसमोर विनयभंगाच्या तक्रारीची चौकशी सुरु असतानाच तक्रारदार महिलेने कोर्ट हॉलमधून धाव घेतली आणि न्यायमंदिराच्या आवारातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
Published 23-Mar-2017 18:44 IST | Updated 19:12 IST
सोलापूर - महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरुची रोमिओने छेडछाड केली. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील रोमिओला अटक केली आहे. अकलूज पोलीस ठाण्यात छेडछाड करणाऱ्या रोमिओ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Published 23-Mar-2017 07:52 IST | Updated 09:58 IST
सोलापूर - सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात असताना सोलापुरातील जैन गुरुकूल प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका मुलीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
Published 22-Mar-2017 22:28 IST

video playजिल्हापरिषदेच्या शिक्षकाने बनवले मतदान यंत्र, असे...
जिल्हापरिषदेच्या शिक्षकाने बनवले मतदान यंत्र, असे...

अशा प्रकारचा ग्रीन टी ठरतो आरोग्यासाठी हानिकारक
video playन्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका
न्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका