• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र शरद पवार यांनी सूचना केल्यामुळे कर्जमाफीच्या रकमेत १२ हजार कोटींची वाढ झाल्याचा दावा, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. बार्शी येथे गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमासाठी आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
Published 26-Jun-2017 14:50 IST | Updated 14:52 IST
सोलापूर - अवैधरित्या पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलची विक्री होत असल्याची तक्रार आल्यानंतर एमआयडीसी आणि पाकणी येथील अवैध धंद्यांवर धाड टाकण्यात आली. एमआयडीसी परिसरात ड्रायव्हरच्या संगनमताने टँकरमधून पेट्रोल, डिझेल चोरून अवैधरित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 25-Jun-2017 19:44 IST
सोलापूर - अवघ्या राज्याचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला राज्यभरातून वारकरी पायी वारीने पंढरपूरला जात असतात. यावेळी मनात फक्त विठूरायाच्या दर्शनाची ओढ असते. या भाविकांना पांडुरंग आता २४ तास दर्शन देणार आहे. कारण आषाढीच्या पार्श्वभूमीवर मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
Published 25-Jun-2017 19:41 IST
सोलापूर - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रस्ते, परिवहन, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मडकी वस्ती, सोलापूर विद्यापीठ, लोंढे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि भिमानगरMore
Published 23-Jun-2017 17:26 IST
सोलापूर - कॉलेज प्रवेश मिळवणे व प्रवेशफी, डोनेशनची व्यवस्था करणे विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक बनले आहे. त्यामुळे अनेक हुशार परंतु गरीब विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. याच तणावातून बार्शी येथील अजिंक्य अरविंद देवकर या विद्यार्थ्याने शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Published 23-Jun-2017 17:11 IST
सोलापूर - सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशाची खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी होळी केली. मंगळवेढा तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांनी यावेळी गावातील सगळे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे गावात पेरणीचीही कामे होऊ शकली नाहीत.
Published 23-Jun-2017 10:51 IST
सोलापूर - बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर येथील शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. नामदेव गंगाराम फुलमाळी (५०), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 22-Jun-2017 14:49 IST
सोलापूर - मनपा अर्थसंकल्प मांडण्यासाठी दिरंगाई करत आहे, असा आरोप शहरातील सामाजिक संघटनेने केला आहे. याचा निषेध म्हणून सामाजिक संघटनेच्यावतीने महापौरांच्या खुर्चीला गाजरांचा हार घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. सुहास कदम, सोहम लोंढे, राज सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
Published 21-Jun-2017 15:53 IST
सोलापूर - तिसऱ्या जागतिक योगदिनानिमित्त सोलापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह महापौरांनी योगाभ्यास केला. या योगाभ्यासात अधिकाऱ्यांसह शेकडो सोलापूरकरांनी सहभाग नोंदविला.
Published 21-Jun-2017 13:58 IST
सोलापूर - अकरा वर्षीय धनश्री नडीमेटला हिने योगामध्ये ९ पदक मिळविले आहेत. दररोज ४ तास सराव करून दीड हजार विद्यार्थिनींना ती योगाचे धडे देत आहे. जागतिक योग दिनानिमित्त जाणून घेऊयात या योगगुरू विद्यार्थिनी विषयी.
Published 21-Jun-2017 09:39 IST | Updated 11:00 IST
सोलापूर - रमजान ईदच्या निमित्ताने सोलापूरच्या मुस्ताख शेख यांनी तयार रेडी टू इट 'शिरखुर्मा मसाला' बाजारात आणला आहे.
Published 20-Jun-2017 16:34 IST
सोलापूर - राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून राम नाथ कोंविद यांची निवड करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, की राष्ट्रपती पदासाठी योग्यता असणाऱ्या व्यक्तीचे स्वागत आहे. राष्ट्रपतीपदासाठी जात-धर्म नव्हे तर पात्रता महत्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Published 20-Jun-2017 08:13 IST
सोलापूर - वैराग येथील पाटील रुग्णालयात शार्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत रुग्णालय व दोन मेडीकल दुकाने जळून खाक झाली.
Published 19-Jun-2017 20:09 IST
सोलापूर - भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळला जाणारा सामना सर्वांना पाहता यावा यासाठी शहरात क्रिकेटप्रेमी तरुणांनी स्क्रीन लावले होते. मात्र भारतीय खेळाडूंनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता आला नाही. भारताने सामना हरल्याने सर्व प्रेक्षकांची घोर निराशा झाली.
Published 19-Jun-2017 07:25 IST


तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण