• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - माजी कृषी अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून सलग ३ वर्ष शासकीय अनुदान लाटले आहे. २०१२ ते २०१५ या कार्यकाळात पदावर असताना या कृषी अधिकाऱ्याने फळबाग लागवड न करता अनुदान उचलले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी ननवरे यांनी ही माहिती उजेडात आणली आहे.
Published 20-Jul-2017 20:15 IST
सोलापूर - महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेने विविध मागण्यासाठी सोलापूर बसस्थानक येथे अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास संघटनेचे कर्मचारी संपावर जातील, असा इशारा देण्यात आला.
Published 20-Jul-2017 19:49 IST
सोलापूर - पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरमधून फिरण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्नही वाऱ्यावर सोडले आहेत, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
Published 18-Jul-2017 20:29 IST
सोलापूर - मराठा वस्ती येथे शिवगंगा देवीचे मंदिर आहे. शिवगंगा मंदिर ट्रस्टने मंदिरासमोर असलेली १० हजार स्क्वेअर फूट जागा विकत घेतली आहे. या जागेवर मंदिर समितीच्या वतीने भव्य असे मंगल कार्यालय बांधण्यात येणार आहे. परंतु मंदिर समितीच्या जागेवर सध्या बेकायदा बांधकाम सुरू आहे. येथील गावगुंड येथे अतिक्रमण करून व्यापारी संकुल उभारत आहेत.
Published 16-Jul-2017 18:50 IST
सोलापूर - तेलंगणा सरकारकडुन शासकीय कामासाठी सांगोल्यात आलेल्या जनावरांच्या डॉक्टरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळत डॉक्टरची सुखरुप सुटका केली.
Published 10-Jul-2017 17:27 IST | Updated 17:47 IST
सोलापूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतू त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. कर्जमाफी व तातडीच्या कर्जाबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
Published 10-Jul-2017 16:00 IST
सोलापूर - सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तरुणांनी वर्षभरापूर्वी गुडमॉर्निंग ग्रुपची स्थापना करून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम राबवला. बार्शी शहरातील संभाजी नगर रोड, रेल्वे स्टेशन, दत्त नगर, भोसले चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून या तरुणांनी ९०० झाडे जगवली. रेल्वे मैदानाला २०२० सालापर्यंत ऑक्सीजन पार्क बनवण्याचा निर्णय या तरुणांनी घेतला आहे.
Published 07-Jul-2017 07:07 IST
सोलापूर - बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र गावातील मेरत कुटुंबाला यंदाच्या शासकीय महापुजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या पत्नी अनुसया (वय ४२) असे या वारकरी दाम्पत्याचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेरत दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
Published 04-Jul-2017 10:22 IST
सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त विठोबाच्या दर्शनासाठी आलेला वारकऱ्यांच्या अद्वितीय अशा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची पहाटे शासकीय महापूजा संपन्न झाली. शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विठुरायाला घातले.
Published 04-Jul-2017 08:16 IST | Updated 09:58 IST
सोलापूर - श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने समितीच्या अध्यक्षपदी केली आहे. या पदासाठी भरपूर नावे चर्चेत होती अखेर भोसले यांची वर्णी या पदी लागली आहे.
Published 03-Jul-2017 22:35 IST
सोलापूर - कर्जमाफीला विरोधकांनी राजकारणाचा विषय बनवले आहे. या विषयावरून सरकारला खिळखिळे करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मनराव ढोबळे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला आहे. यावरून ढोबळेच्या या आरोपावरून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.
Published 03-Jul-2017 21:24 IST
सोलापूर - विठ्ठल मंदिरावरील नव नियुक्त समिती बरखास्त करण्याची मागणी करत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारकऱ्यांनी पालखी रोखून धरली आहे. ही पालखी पंढरपूरातील सरगम चौकात रोखण्यात आली आहे.
Published 03-Jul-2017 20:01 IST
सोलापूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या (गाडी क्रमांक एसएच १४ बीटी २६४४) दरवाजामधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना (सोमवार) सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर घडली. महेश अरूण घाडगे (वय २२ रा. वांगरवाडी ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Published 03-Jul-2017 17:14 IST
सोलापूर - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज ओसेकर यांची निवड करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने समितीची नियुक्ती करण्याबाबत राज्य सरकारला आदेश दिले होते. ओसेकर महाराज हे मूळ औसा जिल्हा लातुरचे आहेत. २००१ ते २००५ याकाळात ते मंदिर समितीवर सदस्य म्हणून होते.
Published 01-Jul-2017 17:08 IST


तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण