शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सम्राट चौकातील बुधवार पेठ परिसरातील परिवहनच्या बस डेपोत केंद्राच्या निधीतून खरेदी केलेल्या अशोक लीलँड कंपनीच्या दोन बसला अचानक आग लागली. या आगीनंतर आग विझविण्यासाठी महापालिका अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे आग विझविताना अडचण येत होती. या घटनेनंतर महापालिका अधिकारी व पदाधिकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.