• मुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे
 • रायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट
 • रायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग
 • मुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश
 • पुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह
 • कलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल
 • मुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त
 • औरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू
 • वर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री
 • वर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त
 • वर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
 • गोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे; असा आरोप करत शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्राने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावे, असे मत माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
Published 31-Mar-2018 07:16 IST
सोलापूर - नराधम बापाने आपल्या पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवरच बलात्कार केल्याची घटना संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
Published 30-Mar-2018 17:12 IST
पुणे - सोलापूरमध्ये लाचलुचपत विभागाच्या गळाला एक मोठा मासा लागला आहे. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अंभियत्याला ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तसेच या अभियंत्याच्या घराच्या झडतीमध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. एसीबीच्या पुणे शाखेने ही कारवाई केली आहे.
Published 30-Mar-2018 08:49 IST
सोलापूर - राज ठाकरे यांच्या ब्लु प्रिंटमधील अनेक योजना भाजपने चोरल्या आहेत. योजनांची नावे बदलून ही ब्लु प्रिंट अमलात आणली असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. सोलापुरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
Published 29-Mar-2018 21:00 IST
सोलापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़. या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यांतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Published 28-Mar-2018 19:29 IST
सोलापूर - संभाजी भिडे यांच्या समर्थनात राज्यभर सन्मान महामोर्चा काढण्यात आले आहेत. यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम पाळा, असे आवाहन सोलापुरात केले.
Published 28-Mar-2018 11:29 IST | Updated 11:56 IST
सोलापूर - कुंपणच शेत खात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात सुरू असलेल्या अवैध कामांवर आळा बसवण्याचे काम पोलीस करत असतात. मात्र, सोलापुरात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सहायक फौजदार, ३ पोलीस कर्मचार्‍यांसह ७ जुगारी पोलिसांनाच अटक करण्यात आली आहे.
Published 25-Mar-2018 08:28 IST | Updated 08:34 IST
सोलापूर - अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात एकूण ४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच ठाणे पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून, याच प्रकरणातील अन्य २ जणांचा शोध सुरू आहे. बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केली.
Published 23-Mar-2018 09:47 IST
सोलापूर - सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील ५ लाख रुपयांच्या रोकड लुटीप्रकरणातील फिर्यादी सहायक फौजदार मारूती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांनी बुधवारी सकाळी तुळजापूर रोडवरील शेळगी पुलावरून उडी टाकत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येमुळे लूटप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
Published 21-Mar-2018 16:16 IST | Updated 17:06 IST
सोलापूर - लुटीप्रकरणी फिर्यादी सहायक फौजदार मारूती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांच्या घरातच २ लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रक्कम कोठून आणली याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा जोडभावी पेठ व शहर गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे.
Published 20-Mar-2018 20:44 IST
सोलापूर - श्री सिद्धेश्वर मंदिरात विनापरवाना सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी महापालिकेने देवस्थान मंदिर पंचकमिटीला २५ लाख ३९ हजार रुपयांचा दंड केला आहे.
Published 20-Mar-2018 20:14 IST
मुंबई - पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार हत्येप्रकरणी ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्येत वापरलेली हत्यारे आणि २ पिस्टलही जप्त करण्यात आली आहेत.
Published 20-Mar-2018 11:12 IST
सोलापूर - पंढरपूरमधील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे याच्यासह ३ आरोपींना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्याकांडाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार भारत भालके यांनी औचित्याचा मुद्दा मांडत सरकारला धारेवर धरले.
Published 19-Mar-2018 21:25 IST
सोलापूर - पोलीस मुख्यालयात ५ लाख रुपये जमा करण्यासाठी जाणार्‍या सहाय्यक फौजदारालाच ६ जणांच्या टोळीने लुटल्याची घटना घडली. लुटारुंनी सहाय्यक फौजदारांच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूने वार करत लुटल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयासमोरील मार्केंडेय जलतरण तलावाजवळ घडली.
Published 19-Mar-2018 15:44 IST