• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
सोलापूर
Blackline
सोलापूर - पोलीस ठाण्यातील शस्त्रगारातून गहाळ पिस्तुलांचा अखेर शोध लागला आहे. खून प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून हे पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
Published 19-Aug-2017 07:49 IST
सोलापूर - सोलापूर-हैदराबाद महामार्गावर ट्रक अडवून पैसे लुटणाऱ्या ४ जिल्ह्यातील ७ दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कादीर अहमद शफीउल्ला खान (वय ४५, रा. मुंब्रा.जि. ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Published 18-Aug-2017 22:47 IST
सोलापूर - सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना विविध सवलतींचा लाभ मिळावा म्हणून दाखले वितरित केले जातात. मात्र गेल्या ४ महिन्यांपासून समिती सदस्यांअभावी हे दाखले रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जातपडताळणी कार्यालयाला भेट दिली.
Published 18-Aug-2017 18:03 IST
सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुकाणू समितीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुकाणू समितीमधील पदाधिकारी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Published 17-Aug-2017 20:23 IST
सोलापूर - शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव आपटे यांचे बुधवारी निधन झाले. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच सोलापूर जिल्हा दूध संघाचे ते संचालक होते.
Published 17-Aug-2017 16:28 IST
ठाणे - वाशीमधून ७ ऑगस्ट रोजी अपहरण झालेल्या शिलवंत सोनकटले (२६) या तरुणाचा मृतदेह आंध्रप्रदेश राज्यातील विजवाडा येथील कृष्णानदीच्या पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिलवंतच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नसल्या तरी त्याचे अपहरण करणाऱ्या व्यक्तींनी त्याची हत्या केली, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आंध्रप्रदेशला रवाना झाले आहे.
Published 16-Aug-2017 21:38 IST
रायगड - मोहपाडा येथून अलिबाग समुद्र किनारी फिरण्यास आलेल्या ५ पर्यटकांमधील २ जण समुद्रातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पोलीस आणि जीवरक्षक त्यांचा शोध घेत आहेत.
Published 15-Aug-2017 20:43 IST | Updated 20:45 IST
सोलापूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यावर रविवारी रात्री खुनी हल्ला झाल्याची घटना घडली. हल्लेखोराने मोटार सायकलने प्रथम धडक दिली व त्यानंतर खुनी हल्ला केला. ही घटना स्टेशन रोडवरील पॉप्युलर हॉटेलजवळ घडली.
Published 14-Aug-2017 17:43 IST
सोलापूर - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जत येथील एका युवकाचा खून करून फेकलेला मृतदेह आढळला होता. त्याप्रकरणी मंगळवेढ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता गोरख भोसले असे त्या खुनी पोलिसाचे नाव आहे.
Published 14-Aug-2017 10:59 IST
सोलापूर - देशाचे जातीच्या आणि धर्माच्या नावावर तुकडे होऊ देणार नाही, असा निर्धार जमियत उल्मा ए-हिंदचे मौलाना इब्राहिम यांनी बोलून दाखवला. जमियत उल्मा ए-हिंदच्यावतीने देशातील ७०० जिल्ह्यांमध्ये 'अमन मार्च'चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातून 'अमन मार्च' काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
Published 13-Aug-2017 17:13 IST
सोलापूर –ग्रामीण भागात राहुनही चित्रपट आणि इतर सर्वच क्षेत्रात खूप काही करता येते हे अनेकांनी आपल्या कार्यातून सिध्द करुन दाखवले आहे. त्यामुळे हाती येणाऱ्या संधीचा तरुण पिढीने योग्य वापर करुन पुढे जावे, असे आवाहन चित्रपट निर्माती आणि लेखिका सायली जोशी यांनी केले.
Published 12-Aug-2017 16:55 IST
सोलापूर - विमानतळावर अडसर ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. चिमणी पाडण्यासाठी कारखाना स्थळावर मनपा प्रशासन गेल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Published 12-Aug-2017 10:54 IST | Updated 16:52 IST
सोलापूर - कामगारांचे प्रश्न मार्गी लागावे या अनुषंगाने या शहरात सहाय्यक कामगार आयुक्तांची नेमणूक करण्यात आली, परंतु गेल्या दोन वर्षांपासून सोलापूरचे कामगार आयुक्त बेपत्ता आहेत. ते कधीही त्यांच्या ऑफिसमध्ये भेटत नाहीत. त्यामुळे शहरांतील अनेक कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत.
Published 11-Aug-2017 22:55 IST
सोलापूर - विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी महापालिकेकडून पाडण्यात येणार आहे. या चिमणीच्या बचावासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत़. त्यांनी ही चिमणी पाडू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढला.
Published 11-Aug-2017 16:09 IST


तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण