• काश्मीर -नौशेराच्या लाम भागात आयईडी स्फोट, एक मेजर शहीद
Redstrib
सातारा
Blackline
सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात म्हसवड येथील चारा छावणीमध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलगाम हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Published 15-Feb-2019 22:49 IST
सातारा - पाचगणी येथे पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकल्याने एका कोरियन नागरिकाचा मृत्यू झाला. पाचगणी येथून उड्डाण केल्यानंतर अभेपुरी गावाच्या हद्दीत तो एका डोंगराला धडकला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी वाई मिशन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Published 13-Feb-2019 17:19 IST | Updated 17:38 IST
सातारा - पुस्तकांचं गाव भिलार येथे गावाची जत्रा असल्याने १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत 'पुस्तकांचं गाव' हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे. अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली.
Published 13-Feb-2019 13:18 IST
सातारा - शासनाने दुष्काळ जाहीर करून तीन ते चार महिने उलटले. मात्र, ना शेतकऱ्यांना कोणत्या सवलती भेटल्या ना विद्यार्थी वर्गाला सवलती मिळाल्या. असाच काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यातील अनेक कॉलेज व शाळांमध्ये घडला आहे.
Published 10-Feb-2019 11:36 IST | Updated 11:43 IST
सातारा - सम्राट निकम खून प्रकरणी रावण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या खून प्रकरणानंतर मयुर जाधव उर्फ रावण व त्याच्या टोळीतील चौघांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या होत्या. मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्याने ही कारवाई होणार आहे.
Published 10-Feb-2019 04:22 IST
सातारा - महसूल विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून तसेच माण महसूल विभागाच्या हद्दीतून बेकायदेशीर उत्खनन करून ओएफसी केबल टाकण्याचे काम चालू होते. यावर महसूल विभागाने कारवाई करत पोकलेन मशीन जप्त केली. शिंगणापूर येथे ही कारवाई करण्यात आली असून तहसीलदार बाई माने यांनी ही कारवाई केली आहे.
Published 09-Feb-2019 12:33 IST
सातारा - राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसवर गेले आहे. आज पहाटे परिसरात अनेक ठिकाणी बर्फची चादर पाहायला मिळाली.
Published 09-Feb-2019 11:00 IST
सातारा - खंबाटकी घाटात बेक्र निकामी होऊन अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातातून चालक व क्लिनर थोडक्यात बचावले आहेत.
Published 07-Feb-2019 17:00 IST | Updated 18:21 IST
सातारा - माण तालुक्यातील दहिवडी ते शिंगणापूर रस्त्याच्या बाजूने बेकायदेशीर उत्खनन करून ओएफसी केबल टाकण्याचे काम चालू होते. दरम्यान, वनविभागाच्या जागेतून विना परवाना खोदकाम केल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून पोकलँड मशीन जप्त केले आहे.
Published 07-Feb-2019 12:27 IST
सातारा - जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या माण-खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. यामुळे या भागातील लोकांसह शेजारील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक गावे सोडून आपल्या जनावरांना घेऊन चारा छावणीत येत आहेत.
Published 06-Feb-2019 12:25 IST
सातारा - जिल्ह्यातील १९ मंडलांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला, मात्र शासनाने या भागात कोणतीही मदत दिलेली नाही. आज शासनाने दुष्काळी गावांमध्ये महसुलात सूट घोषित केली. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार ३४२ शेतकऱ्यांचा १० लाख ६३ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. शासनाने १९ जिल्ह्यातील मंडलामध्ये नव्याने दुष्काळ घोषित केला आहे.
Published 05-Feb-2019 21:16 IST
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱयादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणारा पंकज कुंभार या युवकाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील आगरिपाडा परिसरातून त्याला जेरबंद करण्यात आले. हा युवक मनोरुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Published 04-Feb-2019 14:34 IST | Updated 15:17 IST
सातारा - खंडाळा येथे कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० हजार साताऱ्याच्या नागरिकांना जीवे मारण्याची पोस्ट एका व्यक्तिने फेसबुकवर टाकली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा' अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली आहे.
Published 03-Feb-2019 17:22 IST | Updated 17:29 IST
सातारा - दुष्काळी भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या भागात चारा टंचाई असेल त्या महसूल मंडळाच्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
Published 03-Feb-2019 15:13 IST
Close

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक