• अमरावती - तिवस्यात दोन रायफलीसह एक देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त
  • मुंबई - दहिसरमध्ये सिलेंडरचा स्फोट, चार जण गंभीर जखमी
  • मुंबई - केंद्रीय मात्सिकी शिक्षा संस्थानमधील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी संप
  • अकोला- जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवारांची बदली
  • ठाणे - भाजपच्या दोन नगरसेवकांवर ६० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा
Redstrib
सांगली
Blackline
सांगली - बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या कास्टिंग काउचचे प्रसिद्ध सिनेनृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी समर्थन केले आहे. बॉलिवूडमध्ये कोणत्याही मुलीवर बलात्कार करून तिला सोडून दिले जात नाही. तर, तिला भाकरी पण देतो, असे त्या म्हणाल्या.
Published 24-Apr-2018 16:18 IST | Updated 17:29 IST
सांगली - एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. विटा जवळील रेवणगाव घाटात कराडहून आटपाडीकडे निघालेल्या एसटी बसला डंपरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
Published 24-Apr-2018 14:43 IST | Updated 15:13 IST
सांगली - महापालिका क्षेत्रातील एलबीटी असिसमेंटच्या कारवाईचा विषय निकाली काढा. अन्यथा व्यापार बंद करुन आमदार व आयुक्तांकडे दुकानाच्या चाव्या सुपुर्द केल्या जातील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शाहा यांनी दिला आहे.
Published 24-Apr-2018 11:03 IST
सांगली - प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य करा अन्यथा सरकारविरुद्ध संघर्षाची भूमिका घेऊ असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. सांगलीत पार पडलेल्या शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय १७ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात हा इशारा देण्यात आला.
Published 23-Apr-2018 10:39 IST
सांगली - राजकीय कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी रविवारी एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी पाटील यांनी शेट्टींना संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. भाजपचा नाद सोडला असला, तरी तुमचा हात अजून धरलेला नाही, यावर विचार करु, असे मिश्किल उत्तर यावेळी शेट्टी यांनी दिले.
Published 23-Apr-2018 08:28 IST
सांगली - मगरीच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे. ब्रह्मणाळच्या कृष्णा नदीत मगरीने सागर डंक या मुलावर हल्ला चढवत नदी पात्रात ओढून नेले होते. अखेर तब्बल ४० तासांच्या अथक प्रयत्नानंतर तुंग नजीकच्या नदी पात्रात सागरचा मृतदेह सापडला आहे. वन विभाग आणि ग्रामस्थांकडून गेल्या तीन दिवसांपासून शोध मोहीम राबण्यात येत होती.
Published 22-Apr-2018 14:02 IST
सांगली - पाय घसरून जलाशयात पडल्याने ९ वर्षीय बालिकेचा दुर्देवी अंत झाला आहे. मिरज तालुक्यातील आरग नजीक म्हैसाळ सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या जलाशयात शनिवारी ही घटना घडली. गौरी चव्हाण असे मृत बालिकेचे नाव असून ती पाय धुण्यासाठी पाण्यात उतरली होती.
Published 22-Apr-2018 12:16 IST
सांगली - देशातील जातीय व्यवस्था बदलायची असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज गरज असल्याचा सूर ३० व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनामध्ये उमटला. शनिवारी सकाळी शानदार सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन पार पडले.
Published 22-Apr-2018 07:52 IST
सांगली - ब्रह्मणाळ येथील कृष्णा नदीपात्रातील मगरीने १५ वर्षीय मुलाला ओढून नेल्याच्या घटनेला २४ तास ओलांडले आहेत. मात्र अद्यापही सागर डंक या मुलाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सायंकाळी हताश झालेल्या वन विभागाने आपली शोध मोहीम थांबविली आहे.
Published 22-Apr-2018 07:27 IST
सांगली - रॉकेल ओतून एका महिलेला तिघांनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कुपवाडच्या दुर्गा नगरमध्ये घडली आहे. पोलिसात देण्यात आलेली तक्रार आणि इतर व्यक्तींशी ही महिला बोलत असल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Published 22-Apr-2018 07:08 IST
सांगली - शहरात प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ३० व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून खासदार संजय पाटील तर कार्याध्यक्षपदी आमदार सुधीर गाडगीळ यांची निवड करण्यात आली.
Published 21-Apr-2018 19:40 IST
सांगली - ब्रह्मणाळ येथील कृष्णा नदी पात्रात मगरीने हल्ला केलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध घेण्यास आज पहाटेपासून सुरुवात झाली आहे. वन विभागाच्या पाच बोटीच्या साह्याने ही शोधमोहीम सुरू झाली आहे.
Published 21-Apr-2018 11:05 IST | Updated 11:26 IST
सांगली - मटका व्यवसाय प्रकरणी वाळवा तालुक्यातील दोन टोळ्यांना सांगली पोलिसांनी तडिपारीचा दणका दिला. १२ जणांना सांगलीसह तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील मटकावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
Published 21-Apr-2018 10:26 IST
सांगली - डोंगराला लागलेल्या आगीत २५ एकरावर असणारी वनस्पती जळून खाक झाली आहे. यामध्ये खासगी मालकीचे २० तर वनविभागाचे पाच एकरवरील झाडे झुडपे जाळली आहेत. शिराळा तालुक्यातील बिऊर येथील पावलेवाडी खिंडीजवळ हा वणवा पेटला होता.
Published 21-Apr-2018 07:22 IST