• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - जात आणि धर्माच्या आधारावर देशात कटुता निर्माण करणार्‍यांनी कॉम्रेड पानसरे, डॉ. दाभोळकर आणि डॉ. कलबुर्गी यांची हत्या केली. या घटनांनंतरही चळवळ थांबली नाही. उलट ती जास्तच जोर धरत आहे. समाजवाद, निधार्मिकता, बंधुता, समता यांचा नारा देणार्‍या राज्यघटनेला धर्मांध शक्तींकडून धोका निर्माण झाला आहे, असे मत कॉम्रेड उमा गोविंद पानसरे यांनी व्यक्त केले.
Published 08-Aug-2017 09:50 IST
पुणे - जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की गुणवत्तेचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. मात्र बांगरवाडीतील कदमवस्ती येथील झेडपी शाळा ही गुणवत्तेमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करत आहे.
Published 07-Aug-2017 19:58 IST | Updated 11:55 IST
पुणे - थेरगावमधील घर बचाव संघर्ष समितीने थेरगाव विभागातील नागरिकांसाठी रिंगरोड बाधित घरांच्या संदर्भात शासनाला सूचना व हरकत कशाप्रकारे करायच्या, याचे मार्गदर्शन घेतले. यावेळी ५० ते ६० हजार सूचना व हरकती देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
Published 07-Aug-2017 19:20 IST
पुणे - नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात तब्बल २१०० शहाळ्यांच्या नारळांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मंदिरात दोन दिवसीय कल्पवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंदिराच्या कळसापर्यंत नारळाची झाडे, मुख्य गाभाऱ्यासह प्रवेशद्वारावर आकर्षक फुले आणि पानांची आरास यामुळे मंदिरात हजारो नारळांचा नैवेद्यचMore
Published 07-Aug-2017 18:30 IST
​पुणे - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी ही घोषणा केली आहे.
Published 07-Aug-2017 15:14 IST | Updated 11:57 IST
पुणे - सोलापूर-पुणे लोहमार्गावर दौंड तालुक्यातील बोरीबेल गावच्या हद्दीत रविवारी दुपारच्या सुमारास लोहमार्ग ओलांडणाऱ्या दोघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात एका बालकाचा समावेश आहे. सुरेश भिकाजी सूर्यवंशी (वय ६५ वर्षे) व कार्तिक अमोल खळदकर (वय ४ वर्षे) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
Published 07-Aug-2017 13:03 IST
पुणे - रक्षाबंधनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना महिलांनी राख्या बांधून भाऊ बहिणीचे नाते जोडले. लष्कर भागातील महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ चव्हाण व विशाल मोरे यांनी केले होते
Published 06-Aug-2017 22:55 IST

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण