• पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
  • वाशिम : मंगरुळपीर येथील लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
  • वाशिम : नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम
Redstrib
पुणे
Blackline
पुणे- तळेगाव येथे राहत्या घरात पोलीस हवालदाराने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
Published 17-May-2017 22:43 IST
पुणे - लोकलमध्ये जागेवरून नेहमीच वाद होत असतात. अशाच एका वादामध्ये थेट एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या डोक्यात ऊस घालून त्याला रक्तबंबाळ केले. ही घटना आज कासारवाडी ते पिंपरी या रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
Published 17-May-2017 21:07 IST
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. नितीन.आर.करमाळकर यांची निवड झाली आहे. राज्यपाल सी.एच.विद्यासागर राव यांनी आज ही घोषणा केली.
Published 17-May-2017 15:07 IST | Updated 17:21 IST
पुणे - तवेरा कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघात तवेरातील २ महिलांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात सकाळच्या सुमारास सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (सोरतापवाडी, ता. हवेली) गावच्या हद्दीत घडला.
Published 17-May-2017 12:31 IST
पुणे - दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरात ८२३ क्विंटल रेशनिंग गव्हाचा अवैद्य साठा आढळून आला होता. या प्रकरणी फरार असलेले आरोपी सुरेंद्र बलदोटा आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
Published 17-May-2017 07:58 IST
पुणे - कितीही वाईट परिस्थिती आली तरी खचून न जाता हिम्मतीने परिस्थितीला तोंड दिले की शेवटी आपल्याला यश मिळतेच. परिस्थितीवर मात करून पुढे जाणारेच खरे हिरो असतात. त्यामुळे खचायचे नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन उभे राहायचे, असा प्रेरक सल्ला ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी भाचेमंडळींना दिला.
Published 16-May-2017 23:20 IST
पुणे - एका नराधमाने तरुणीला व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्दकी सलीम काझी, असे आरोपीचे नाव आहे.
Published 16-May-2017 22:32 IST | Updated 22:37 IST
पुणे - पिंपरी-चिंचवडच्या रहाटणीमध्ये इन्फोसिसच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. निनाद पाटील(२४), असे या तरूणाचे नाव आहे. राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून निनाद पाटीलने आत्महत्या केली.
Published 16-May-2017 21:37 IST
पुणे - पवना धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झाला आहे. धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी दिले जाते. या प्रश्नावर मात करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकास निधीतून पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली.
Published 16-May-2017 20:02 IST
पुणे - पक्ष विस्ताराची जबाबदारी ही कोणा एकट्याची नसून ती सर्वांची आहे. यासाठी कोणत्याही अडचणी न सांगता झोकून देवून काम करा, असा सल्ला पालकमंत्री गिरीश बापट यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. ते पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त विस्तारक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.
Published 16-May-2017 19:26 IST
पुणे - नवनाथ कांबळे यांच्या निधनाने केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचे नुकसान झाले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. अशा शब्दात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
Published 16-May-2017 19:49 IST
पुणे - भ्रष्टाचाऱ्यांना पकडून देणे हे नागरिकांचे काम आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालणार नाही. महापालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.
Published 16-May-2017 19:36 IST
पुणे - उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे पुणे महानगरपालिकेची सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक वगळता) बदं ठेवत दुखवटा पाळण्यात आला.
Published 16-May-2017 19:42 IST
पुणे - मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येनंतर दोनच दिवसात त्यांच्या पत्नीसह दोन मेहुण्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 16-May-2017 16:27 IST | Updated 18:37 IST

video playपाणी कमी होताच नदीपात्रात दिसू लागते महादेवाचे हे...
पाणी कमी होताच नदीपात्रात दिसू लागते महादेवाचे हे...
video playलग्न सोहळ्यात चक्क रक्तदान शिबिराचे आयोजन
लग्न सोहळ्यात चक्क रक्तदान शिबिराचे आयोजन

अशा प्रकारचा ग्रीन टी ठरतो आरोग्यासाठी हानिकारक
video playन्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका
न्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका