• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रभावी कामामुळे पिंपरी-चिंचवड भाजपचा एक गट पूर्णतः हवालदिल झाला आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये बारणे यांच्या समोर कोणताही सक्षम उमेदवार मिळत नाही. त्यामुळे हताश होऊन भाजपचे एकनाथ पवार वाटेल तशा अफवा पसरवू लागल्याची टीका थेरगाव शिवसेना विभाग प्रमुख सोमनाथ गुजर यांनी केली आहे.
Published 10-Aug-2017 22:49 IST
पुणे - पीएचडीसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी पुण्यातील नामवंत महाविद्यालयातील प्राध्यापकाने इराणी तरुणीचा विनयभंग करत, तिच्याशी शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शिवाजी बोर्‍हाडे या प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 10-Aug-2017 22:36 IST | Updated 22:46 IST
पुणे - सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी आहे.सरकारने कर्जमाफीच्या जाचक अटी शेतकऱ्यांवर लादल्या आहेत. सरकारच्या या धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीने १४ ऑगस्टला राज्यभर चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.
Published 10-Aug-2017 22:28 IST
पुणे - घराघरातून बाहेर पडणाऱ्या मैलापाणी व सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर केल्यास ३० ते ४० टक्के पिण्याच्या पाण्यात बचत होणार आहे. यासाठी डीप टँक एरेशन सिस्टीम (डिटास) यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्यातील पर्यावरण अभियंता आणि संशोधक प्रा. राजेंद्र सराफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Published 10-Aug-2017 18:10 IST
नवी दिल्ली - पुण्यातील सहारा ग्रुपच्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव निश्चित झाला आहे. लिलाव प्रक्रियेवर स्थगिती आणावी, यासाठी सहारा ग्रुपद्वारे सादर केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Published 10-Aug-2017 18:06 IST | Updated 18:44 IST
पुणे - नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर कारवाई करत मध्यप्रदेश सरकारने त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यामध्ये विविध समाजवादी, डाव्या विचारसरणीच्या संघटनेच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली.
Published 10-Aug-2017 17:04 IST
पुणे - महामेट्रो अंतर्गत होत असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाला फ्रेंच डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने भेट दिली आहे. सदर प्रकल्पासाठी २४५ मिलियन युरोचे कर्ज बँकेकडून घेण्याची सरकारची योजना आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने बँकेच्या शिष्टमंडळाने आज प्रकल्पाची पाहणी केली.
Published 10-Aug-2017 16:45 IST | Updated 16:51 IST
पुणे – एकीकडे जलसंवर्धन करण्यासाठी शासन नागरिकांना 'रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करत आहे. दुसरीकडे मात्र बारामती नगरपालिकेने स्वतःच्या मालकीच्या बहुउद्देशीय वाहनतळ इमारतीला 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्यावर पाणी फेरले आहे. पावसाचे पाणी जिरवण्याऐवजी गटारात सोडण्याचा घाट नगरपालिकेने घातला असून, ‘स्टॉर्म वॉटर’च्या नावाखाली १६ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे.
Published 10-Aug-2017 15:48 IST | Updated 15:55 IST
पुणे - अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, पदनिहाय कामाव्यतिरिक्त कामे, कामांची जोर जबरदस्ती अशा विविध समस्यांबरोबर आरोग्य विषयक समस्यांवरून एसटी वर्कशॉपमधील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.
Published 10-Aug-2017 14:44 IST
पुणे - सहाय्यक अभियंता विक्रांत वरुडे यांची दोन वेळा झालेली बदली पुन्हा रद्द करून त्यांना मोशी कार्यालयातच रूजू करून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी इलेक्ट्रिकल ठेकेदारांनी ढोल वाजवा आंदोलन केले.
Published 10-Aug-2017 08:49 IST
पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने कासारवाडी नाशिकफाटा येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा उड्डाणपुलाच्या रॅम्पचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले.
Published 10-Aug-2017 07:33 IST
पुणे - विविध शैक्षणिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्नीत बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अद्यादेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच जारी केला आहे. यामुळे पात्र व्यक्तीपर्यंत थेट मदत पोहोचणे शक्य होणार आहे.
Published 09-Aug-2017 22:53 IST | Updated 22:57 IST
पुणे - 'चले जाव', 'भारत माता की जय' अशा घोषणा देत इंग्रजांसमोर नारायण दाभाडे या विद्यार्थ्याने स्वतःच्या प्राणाची आहुती देत काँग्रेस भवनावर तिरंगा फडकाविला होता. ही घटना शहरातील काँग्रेस भवनमध्ये घडली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी शालेय मुलांना नाटकातून मिळाली आहे.
Published 09-Aug-2017 19:58 IST | Updated 20:11 IST
पुणे - ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार आर्या घारे हिने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आज अंध मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असतानाच बाल वयात तिने हा मोठा निर्णय घेतला आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची सर्व प्रक्रिया तिने आपल्या नवव्या जन्मदिनी पूर्ण केली. यासंदर्भात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पत्र लिहिले आहे. यात तिने नेत्रदानाविषयी जनजागृती करावी, अशी विनंती मोदींना केलीMore
Published 09-Aug-2017 19:36 IST

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण