• किदम्बी श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
  • रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
  • कोल्हापूर: महसूल मंत्र्यांच्या संपत्तीची ई.डी.मार्फत चौकशी करा - आमदार क्षीरसागर
  • ठाणे : मनसैनिकांना चोख उत्तर देण्यासाठी डोंबिवलीतील भीमसैनिक सज्ज
  • सोलापूर : कर्जमाफीची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात - सुभाष देशमुख
  • औरंगबाद : कर्जमाफीची मार्केटिंग करा - रावसाहेब दानवे
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - पु. ल. देशपांडे उद्यानासमोर पाटे बील्डर यांच्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ७ व्या मजल्याच्या स्लँबचे काम सुरू असताना सेंट्रींग कोसळून ३ कामगार ठार झाल्याची घटना घडली आहे. यात १ जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यातील एका कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Published 17-Oct-2017 11:07 IST
पुणे - ऐन दिवाळीत मिठाईला नागरिकांची मागणी असते. गुजरातहून पुण्यात आलेली विनापरवाना साठा केलेली तब्बल ३५७० किलो ४ लाख ६३ हजार ५८० रुपये किंमतीची स्पेशल बर्फी अन्न व औषध प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त केली आहे.
Published 17-Oct-2017 10:38 IST
पुणे - एका उधारीच्या वादातून दूध व्यावसायिकाचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे.
Published 17-Oct-2017 10:17 IST
पुणे - हडपसर-सासवड-जेजुरी हा पालखी रस्ता असून या रस्त्यावरील खड्डे तसेच अन्य दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Published 17-Oct-2017 09:25 IST | Updated 12:12 IST
पुणे - महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या बस पासच्या बदल्यात महापालिका पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपीएमएल) रक्कम आदा करते. मात्र अनेक दिवसांपासून पाससाठी द्यायची रक्कम पालिकेने पीएमपीएमएलला दिली नाही. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पासच्या खर्चापोटी पीएमपीएमएलला २० कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली.
Published 17-Oct-2017 09:07 IST
पुणे - विमाननगर - सोमनाथनगर भागातील भाजपचे नगरसेवक अनेक दिवसांपासून कलवडवस्ती परिसरात फिरकले नाहीत. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असूनही अद्याप पाणी, रस्ता यांसारखे मुलभूत प्रश्‍न सुटत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी नगरसेवक गेले कुठे ? नगरसेवक हरवले आहेत असे फलक लावले आहेत.
Published 17-Oct-2017 07:14 IST
पुणे - महापालिकेतर्फे शहरातील रस्ते खोदाईसाठी काही मोबाईल कंपन्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे. परवानगी दिलेल्या अनेक कंपन्यांकडे महापालिकेची थकबाकी आहे. अशा मोबाईल कंपन्यांकडे थकबाकी असतानाही त्यांना रस्ते खोदाईची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित करत तुमच्या पक्षाचे ‘गुंड’ पदाधिकारी थांबून खोदाईची कामे करून घेतात, असा आरोप केल्यानंतर महापालिका सभागृहात एकच गोंधळ उडाला.
Published 16-Oct-2017 22:50 IST
पुणे - दौंड तालुक्यातील पाटस येथील माँ शेरेवाली ढाबा आणि बियर बारचे मालक अनधिकृत दारू विक्री करत असल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या भांडणात तिघांना गजाने व काठीने जबर मारहाण झाली. यामध्ये प्रमोद भागवत, निलेश भागवत आणि महेंद्र भागवत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published 16-Oct-2017 22:41 IST
पुणे - एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनुपम खेर यांनी प्रथमच पुण्यात येऊन संस्थेतील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. कॅन्टीनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत जेवण घेतले.
Published 16-Oct-2017 20:09 IST
पुणे - दिवाळी ही मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. अशा सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुणे नवरात्र महोत्सव समितीने असेच काही केले आहे. त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना दिवाळीनिमित्त नव्या कपड्यांसह फराळ आणि फटाक्यांचे वाटप केले.
Published 16-Oct-2017 19:52 IST
पुणे - कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना लांछनास्पदच आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशीच इच्छा सर्वांसोबतच सरकारचीदेखील आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित घटनेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता वर्तविलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोपर्डी घटनेचे राजकारण करत आहेत. ते त्यांनी करू नये, अशी अपेक्षा भाजपचेMore
Published 16-Oct-2017 17:58 IST
पुणे - सांगलीतील चरण या गावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जाणाऱ्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. यात ३ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.
Published 16-Oct-2017 17:21 IST
पुणे - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये पुणे जिल्ह्यातील १७३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान सुरू आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यातील २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित १७३ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे.
Published 16-Oct-2017 16:39 IST
पुणे - शबरीमाला मंदिराचे प्रमुख प्रयार गोपाल कृष्णन यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडने त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. मंदिराच्या व्यवस्थापन समितीवरुन गोपाल कृष्णन यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.
Published 16-Oct-2017 16:20 IST

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव