• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
पुणे
Blackline
दौंड - राज्यातील पोलीस पाटलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे. दौंड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत पोलीस पाटील संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नवीन पोलीस पाटीलपदी नियुक्त झालेल्या महिला उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तसेच दौंडमध्ये मोठ्या संख्येने पोलीस पाटीलपदी महिलांची निवड झाली आली असून त्यामुळे महिलाराज निर्माणMore
Published 15-Jan-2018 18:22 IST
पुणे - देव दर्शनावरुन परतत असताना झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर लगतच्या कासारी फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे.
Published 15-Jan-2018 12:22 IST | Updated 12:48 IST
पुणे - पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. १५८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असून २१ दिवसांपेक्षा कमी हजेरी असलेल्या कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतच्या हजेरीचा रेकॉर्ड पाहून ही कारवाई करण्यात आली आहे.
Published 15-Jan-2018 11:23 IST
पुणे - शहरातील नागरिकांना तक्रारी नोंदविण्याबरोबर पालिकेच्या योजनांची माहिती देण्यासाठी महापालिकेने कॉल सेंटरची उभारणी केली आहे. या कॉल सेंटरसाठी प्रती महिना तीन लाख रुपये खर्च होणार आहे. हे काम केयरटेल इन्फोटेक कंपनीला देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
Published 15-Jan-2018 09:32 IST
पुणे - हरियाणा संघाने दिल्लीचा ८-० असा सहज पराभव करून १२ व्या राष्ट्रीय फ्लोरबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा पार पडली.
Published 15-Jan-2018 08:45 IST
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा उज्ज्वल स्वरुपाचा आहे. त्यामधून मोठ्या प्रमाणावर वैचारिक साहित्याची निर्मिती झाली. परंतु, या लढ्याच्या ऐतिहासिक नोंदी पूर्णपणे घेण्यात आल्या नाहीत, त्या आगामी काळात नोंदविल्या जाव्यात, त्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ‘नामांतराचा लढा आणि मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली.
Published 15-Jan-2018 07:35 IST
पुणे - ‘‘आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी सतत जागरूक राहणे आणि आपल्याला भिडणाऱ्या गोष्टी डोक्यात साठवून ठेवणे हे चित्रपट लेखक व दिग्दर्शकासाठी फार महत्त्वाचे असते,’’ असा सूर आंतराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांच्या चर्चेत उमटला.
Published 15-Jan-2018 07:16 IST
बीड - जेजुरीजवळ पिंपरे गावच्या हद्दीत ट्रॅक्टर आणि टँकरच्या झालेल्या भीषण अपघात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड मजुरांचा समावेश आहे.
Published 14-Jan-2018 22:58 IST | Updated 12:15 IST
पुणे - एक जात आणि दहा गट यात अडकलेल्या दलित चळवळीला दिशा देण्यासाठी, ती अधिक गंभीर करण्यासाठी विचारवंतांनी एकत्र यावे, असे आवाहन आमदार जयदेव गायकवाड यांनी केले आहे. ते अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनात ‘दलित चळवळीची सद्यस्थिती आणि लेखकांची भूमिका’ या परिसंवादात बोलत होते.
Published 14-Jan-2018 22:38 IST
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यात अंधश्रद्धा आणि चमत्कार घुसवण्याचे काम सध्या व्यवस्थितपणे सुरू आहे. त्यांचे विचार आणि साहित्य जातीच्या चौकटीतून बाहेर काढून त्याला व्यापकता मिळवून देणे गरजेचे आहे. हे काम करण्याची जबाबदारी या विचाराला वाहून घेतलेल्यांनी पार पाडणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे विचार अनुवादच्या रुपाने जगभर पोहचविणे गरजेचे आहे. हे झाल्यास २१ वे शतक आंबेडकरी विचारांचे असेल,More
Published 14-Jan-2018 22:26 IST
खडकी - माजी सैनिक दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खडकी येथील बाँम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटरच्या आवारात हा मेळावा पार पडला. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे मुख्य लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन आदरांजली वाहिली.
Published 14-Jan-2018 22:07 IST
पुणे - राज्यात आज संक्रातीदिवशी भुगोल दिन साजरा केला जातो. कारण ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सी. डी. देशपांडे यांचा आजच जन्मदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भुगोल समितीच्या वतीने महाराष्ट्र नकाशे दर्शन या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
Published 14-Jan-2018 20:54 IST
पुणे - प्रभात रस्त्यावर काल (शनिवार) रात्री अज्ञातांकडून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंद्रभाई जयसुखलाल शहा यांच्यावर गोळीबार करण्यात आला . या गोळीबारात देवेंद्रभाई यांचा मृत्यू झाला असुन डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
Published 14-Jan-2018 16:34 IST
पुणे - आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.
Published 14-Jan-2018 12:31 IST

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

एनर्जी ड्रिंक्स आहेत युवकांच्या आरोग्यासाठी घातक
video playव्यायामाचा थकवा घालवतील हे पदार्थ
व्यायामाचा थकवा घालवतील हे पदार्थ
video playहे उपाय मिळवून देतील तुम्हाला
हे उपाय मिळवून देतील तुम्हाला 'शांत झोप'

video play
'कामसूत्र'वाली इंदिरा 'ती सध्या काय करते' ?