• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - शहरातील बहुचर्चित पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्यामुळे प्रशासनाला दुसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ द्यावी लागली आहे. विशेष म्हणजे या निविदेसाठी कंपन्यांच्या संयुक्त प्रकल्पाला सुद्धा मान्यता दिली आहे. तरीही, या प्रकल्पासाठी कंपन्या निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नसल्यामुळे प्रकल्पाच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. प्रशासनाने आता २२ जानेवारीपर्यंत निविदेला मुदतवाढ दिली आहे.
Published 17-Jan-2018 12:54 IST | Updated 12:56 IST
पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे दलित-मराठा समाजात तेढ निर्माण झाले असून, या दंगलीला कारणीभूत असलेल्या मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींवर कारवाई करावी, अशी मागणी समस्त मातंग आघाडीच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन करण्यात आली. या वेळी मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Published 16-Jan-2018 19:49 IST
पुणे - सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सर्वत्र खळबळ माजली आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉ अँन्ड ऑर्डर फोरमची स्थापना करण्यात आली आहे. खालच्या न्यायालयातील न्यायाधीशांच्या तक्रार निवारणासाठी यामार्फत प्रयत्न केला जाणार आहे.
Published 16-Jan-2018 19:14 IST
​आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे १६ एम. एम. चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात येणार आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे. शनिवार, दि. २० व रविवार, दि. २१ जानेवारीला लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या ऑडिटोरियमध्ये हा महोत्सव होणार असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती संस्थेचे हेमंत जाधव यांनी पत्रकारMore
Published 16-Jan-2018 18:39 IST
पुणे - सातारा रोडवरील हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे, शिवापूर येथील रस्त्यांची कामे रखडली असून, नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे पुणे शहर शिवसेना शाखेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Published 16-Jan-2018 17:49 IST
पुणे - दौंड येथे नगर मोरी चौक व बोरावके नगर परिसरात आज दुपारी झालेल्या गोळीबारात ३ जण जागीच ठार झाले होते. या घटनेनंतर हल्लेखोर आरोपी संजय शिंदे हा पसार झाला होता. परंतु शिंदे यास (सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथून पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. हा हल्ला आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Published 16-Jan-2018 16:13 IST | Updated 23:01 IST
पुणे - विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांचे आज सकाळी ८.२० वाजताच्या सुमारास पुण्यात निधन झाले. फरांदे हे नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी युती सरकारच्या काळात विधानपरिषदेचे सभापती आणि उपसभापती पद भुषविले होते.
Published 16-Jan-2018 13:02 IST
पुणे - पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती देण्यात आली. त्यांच्या निवडीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे शिफारस केली होती.
Published 16-Jan-2018 11:05 IST
विधानपरिषदेचे माजी सभापती व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ना. स. फरांदे यांचे आज पुण्यामध्ये रूग्णालयात उपचार घेत असताना सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
Published 16-Jan-2018 11:00 IST | Updated 13:16 IST
पुणे - रेल्वेत तिकीट कलेक्टर, क्लार्क या पदावर नोकरीला लावतो. मी रेल्वेत नोकरीला असून, माझी तिथे ओळख आहे, असे सांगत नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ७ जणांची ४० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
Published 15-Jan-2018 21:46 IST
पुणे - गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून वर्षभरात ७९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात २ हजार १६५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली असून, यात सर्वाधिक वाटा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मालमत्तेचा आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
Published 15-Jan-2018 21:34 IST
पुणे - प्रभात रस्त्यावर शनिवारी रात्री प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंद्रभाई जयसुखलाल शहा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात देवेंद्रभाई यांचा मृत्यू झाला असून पोलिसांना या प्रकरणी २ हल्लेखोरांची ओळख पटली आहे.
Published 15-Jan-2018 21:23 IST
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती वनस्पतीशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.
Published 15-Jan-2018 20:46 IST | Updated 20:53 IST
पुणे - स्क्रॅप करता येतील अशी वाहने, कागदपत्रांअभावी स्क्रॅप करता येत नाहीत. त्यामुळे वाहनांचे मालक ही वाहने रस्त्याच्या बाजूला लावून सोडून जातात. अशी पुणे महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेची बंद अवस्थेतील वाहने जप्त करण्यात येणार आहेत. या संबधी जप्तीची कारवाई करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.
Published 15-Jan-2018 19:39 IST

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

एनर्जी ड्रिंक्स आहेत युवकांच्या आरोग्यासाठी घातक
video playव्यायामाचा थकवा घालवतील हे पदार्थ
व्यायामाचा थकवा घालवतील हे पदार्थ
video playहे उपाय मिळवून देतील तुम्हाला
हे उपाय मिळवून देतील तुम्हाला 'शांत झोप'

video play
'कामसूत्र'वाली इंदिरा 'ती सध्या काय करते' ?