• मुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे
 • रायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट
 • रायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग
 • मुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश
 • पुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह
 • कलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल
 • मुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त
 • औरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू
 • वर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री
 • वर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त
 • वर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
 • गोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मधून जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नांवर गावकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
Published 25-Apr-2018 14:48 IST
पुणे - मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राजमाता जिजाऊ गार्डन आणि पिंपळे गुरव येथे पाणी वाचवा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत घोषवाक्‍ये, पत्रके, स्लोगन, पटनाटयाद्वारे जनजागृती करण्यात आली.
Published 25-Apr-2018 13:20 IST
पुणे - बारामती शहरात रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर नगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली. शहरातील बेकायदा हातगाड्या, स्टॉलसह हॉटेल आणि दुकानासमोरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.
Published 25-Apr-2018 11:15 IST
पुणे - महानगरपालिकेच्या हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम महाविद्यालया शेजारी असणाऱ्या जप्त केलेल्या वाहनांच्या गोडाऊनमधील वाहनांना भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
Published 25-Apr-2018 09:09 IST | Updated 10:39 IST
पुणे - शहरातील महापालिकेचे बहुतांश जलतरण तलाव हे नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचे महापालिकेच्या सेफ्टी ऑडिटमध्ये समोर आले आहे. महापालिकेने शहरात नागरिकांसाठी उभारलेल्या ३१ तलावांपैकी २१ तलावांचे या समितीने ऑडिट केले. यातील फक्त चार तलाव पूर्ण सुरक्षित आहेत.
Published 25-Apr-2018 08:24 IST
पुणे - राफेल विमान खरेदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. सरकार या विमान खरेदीची माहिती दडवून ठेवत आहे. ही माहिती देशाच्या समोर आली पाहिजे. पण पंतप्रधान यावर चुप्पी साधून आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
Published 25-Apr-2018 08:42 IST
पुणे - १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना आणि फुटीरतावादी गटांचा पूर्वनियोजित कट होता, असे मत सत्यशोधन समितीच्या अहवालात मांडण्यात आले आहे. यात आंबेडकरी आणि हिंदुत्ववादी गटाचा काहीही संबंध नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.
Published 25-Apr-2018 08:17 IST
पुणे - दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील अनाजी खाडे अनाथ आश्रमशाळेला १५ सायकली भेट देण्यात आल्या. सहजपूर येथील विशाखा कंपनीने मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात या शाळेल्या सायकली भेट दिल्या. या सायकलींमुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी २ किलोमीटर होणारी पायपीट आता थांबणार आहे.
Published 25-Apr-2018 08:04 IST
पुणे - अली बाबा आणि चालीस चोरांचे दुकान चालणार नाही. परिवर्तन हा नियम आहे. त्यामुळे अहंकाराचा अंत हा होईल, अशी चौफेर टीका करत भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. पुण्यात आयोजित वसंतदादा सेवा संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
Published 25-Apr-2018 07:27 IST | Updated 08:26 IST
पुणे - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुण्यातील सचिनप्रेमी राजू गायकवाडने त्याच्याकडील सचिनच्या २२ हजार संग्रहित फोटो नागरिकांना पाहण्यासाठी खुले केले आहेत.
Published 24-Apr-2018 17:27 IST
पुणे - केंद्र आणि राज्य स्तरावर ‘स्वच्छ भारत मिशन’ राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक शौचालय मोहिमेचा शहरातील १२६५ नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
Published 24-Apr-2018 13:08 IST
पुणे - माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हदयाशी हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात जलप्रेमी झर्‍याच्या संरक्षणासाठी एकत्र आले होते. यावेळी येथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असलेल्या झऱ्याचे पूजन करण्यात आले.
Published 24-Apr-2018 13:01 IST
पुणे - जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेनिमित्त पुण्यात आलेल्या १६ देशांच्या संघांनी पुण्यातील विविध स्थळांना भेटी देत शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेतले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देत तिथे बाप्पांची आरती देखील बॅडमिंटनपटूंनी केली.
Published 24-Apr-2018 10:09 IST
पुणे - शहरातील मार्केटयार्ड परिसरात एका महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपावरची रोकड लूटणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून मुद्देमाल २४ लाख १२ हजार १५० रुपयांसह चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
Published 23-Apr-2018 23:01 IST