• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - दोन देशात जाण्यासाठी टुर्सचे नियोजन करुन देतो, असे सांगून एका तरुणाची ३ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.
Published 17-Oct-2018 23:57 IST
पुणे - पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
Published 17-Oct-2018 23:55 IST
पुणे - दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तालुक्याच्या विकास कामांसाठी जवळपास १२०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या विकास कामांच्या निधींबाबत माजी आमदार रमेश थोरात यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेप नोंदविला होता. थोरात यांच्यापेक्षा चारपटीने अधिक कामे केली नाहीत, तर मी पुढील विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. असे आव्हान दौंडचे रासपचे आमदार कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांना दिले आहे. आज बुधवारी झालेल्याMore
Published 17-Oct-2018 23:52 IST
पुणे - एरंडवणे भागात एका व्यक्तीच्या घरात नवरात्रीतील अष्टमी निमित्त होणारी पूजा काही प्राणीमित्रांनी उधळली. पूजेदरम्यान देण्यात येणाऱ्या बोकडाच्या बळीला प्राणी मित्र संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेत घेताला आणि घरात घुसून ही पूजा बंद पाडली. या प्रकरणी विलास अंबादास एखंडे (वय -४७) यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
Published 17-Oct-2018 23:52 IST
पुणे - प्रभागातील कामासंदर्भात फोन केला असता, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांनी दाद दिली नाही. संभाषणादरम्यान उद्धट भाषा वापरली. यामुळे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा कमल घोलप चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी थेट महापौरांकडे तक्रार केली. त्यानंतर महारौपारांनी साळुंके यांनी दालनात बोलावून त्यांची कानउघाडणी केल्याचा प्रकार घडला आहे.
Published 17-Oct-2018 23:44 IST
पुणे - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले असूनही पावसाळ्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना त्यातच आता प्रशासनाने पाणी कपात करण्याचे धोरण तयार केले आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णय आगामी २ दिवसांत घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी कपातीला समोर जावे लागणार आहे. दरम्यान, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन स्थायी समितीच्याMore
Published 17-Oct-2018 23:14 IST
पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींना लावलेला जाचक शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अध्यादेश महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची तातडीने अंमलबजावणी सुरु करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
Published 17-Oct-2018 23:09 IST
पुणे - आंबेगाव तालुक्यातील जवळे गावात आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीतून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात येत आहे. बिबट्याचा हा मृतदेह येथील शेतकरी नारायण गावडे यांच्या शेतात आढळला आहे.
Published 17-Oct-2018 21:28 IST
पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी ८.३३ टक्के बोनस व १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल, याची तजवीज करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखा विभागाला दिले आहेत.
Published 17-Oct-2018 21:17 IST
पुणे - दोन महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार मंगळवारी १६ ऑक्टोबरला सकाळी ससून रुग्णालयात घडला. या महिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेद करण्यात आल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सोपवताना हा गोंधळ उडाला.
Published 17-Oct-2018 21:17 IST | Updated 21:27 IST
पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजपासून महिलांसाठी शबरीमला मंदिर खुले झाले. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या महिलांना मंदिरात जायचे आहे त्यांना त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. हा विरोध गांधीगिरी पद्धतीने नाही तर अत्यंत हिंस्रक पद्धतीने होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीMore
Published 17-Oct-2018 18:38 IST
पुणे - कायदा आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लैंगिक अत्याचाराविरोधात स्त्रियांच्या मदतीसाठी 'WeToo' (व्ही टूगेदर) समितीची स्थापना केली आहे. याद्वारे स्त्रियांचे समुपदेशन तसेच त्यांना कायदेशीर सल्ला देण्यात येणार आहे.
Published 17-Oct-2018 15:21 IST
पुणे - येवलेवाडीतील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगविरोधात तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांला काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
Published 17-Oct-2018 14:55 IST
पुणे - भारतीय सैन्यातील ४ जवानांनी मुकबधिर महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खडकी परिसरात असलेल्या लष्कराच्या रुग्णालयात ही घटना घडली. याविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Published 17-Oct-2018 13:14 IST | Updated 15:11 IST