• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
मुख्‍य पानMoreराज्यMoreकोल्हापूर
Redstrib
कोल्हापूर
Blackline
कोल्हापूर - दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कित्येक वर्षांपासून कोल्हापूरकरांची मागणी असलेली कोल्हापूर-हैद्राबाद आणि कोल्हापूर-बंगळुरू ही विमानसेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. एअर अलाईन्स कंपनीच्या ७२ सिटर विमानातून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Published 17-Oct-2018 18:06 IST
कोल्हापूर - पारंपरिक पद्धतीने यावर्षीही तिरुपतीहून अंबाबाई देवीला मानाचा शालू आणण्यात आला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा शालू घेऊन तिरुपती मंदिर ट्रस्टचे अशोक कुमार आणि विजया रेखा या शालू घेऊन आल्या. याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्विकार केला.
Published 17-Oct-2018 15:05 IST
कोल्हापूर - वडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांचा घातपात आहे, अशी तक्रार मुलाने न्यायालयात केली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांत चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मृत सेवानिवृत्त कस्टम अधिकारी चंद्रसेन नानासाहेब लोखंडे यांचा मृतदेह तब्बल ६ महिन्यानंतर बाहेर काढण्यात आला. कदमवाडी येथील दफनभुमीतून हा मृतदेह बाहेर काढून त्याची सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
Published 16-Oct-2018 22:54 IST
कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवात सातव्या माळेला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. काळ्या विद्येचे निराकरण करणारी म्हणून ती प्रत्यंगिरा. दुपारच्या आरतीनंतर ही पूजा बांधण्यात आली. आज सकाळपासूनच अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती.
Published 16-Oct-2018 21:22 IST
कोल्हापूर - 'जोतिबाच्या नावानं चांगभल'च्या जयघोषात मंगळवारी वाडी रत्नागिरी येथे (श्रा क्षेत्र जोतिबा डोंगंर) जोतिबाचा जागर पारंपरिक पध्दतीने साजरा झाला. हजारो भाविकांनी जोतिबाच्या जागरानिमीत्त तेल, कडाकणी, ऊस अर्पण करुन जोतिबा देवाचे दर्शन घेतले. या वेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.
Published 16-Oct-2018 19:51 IST
कोल्हापूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात चांगलीच जुगलबंदी बघायला मिळत आहे.
Published 16-Oct-2018 19:35 IST
कोल्हापूर - तिरुपती दरम्यान १६ नोव्हेंबरपासून विमान सेवा सुरू होणार आहे. यासोबतच १८ डिसेंबरपासून बेंगलोरसाठी इंडीगो विमानसेवा सुरू होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Published 15-Oct-2018 23:49 IST
कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी २४ ऑक्टोबरला पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे ऊस परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हजेरी लावणार आहेत.
Published 15-Oct-2018 21:18 IST
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी रुपात पूजा बांधण्यात आली. यावेळी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दर्शनाबरोबरच मुख दर्शनासाठीही मोठ्या रांगा लागल्या आहेत.
Published 15-Oct-2018 20:08 IST
कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवात आज पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कौमारी रूपातील पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पाचव्या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम राहिला. सायंकाळपर्यंत सुमारे २ लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
Published 14-Oct-2018 19:10 IST
कोल्हापूर - नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे करवीर निवासिनीचा मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या नयनरम्य दृश्यांचे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करण्यात आले आहे.
Published 13-Oct-2018 21:12 IST | Updated 21:56 IST
कोल्हापूर - दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र जोतिबाच्या डोंगरावरही नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जोतिबाची पूजा पाचपाकळी सोहन कमळ स्वरूपामध्ये बांधण्यात आली होती.
Published 13-Oct-2018 20:58 IST
कोल्हापूर - महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्रौत्सव जगप्रसिद्ध आहे. आजच्या चौथ्या माळेला म्हणजेच पंचमीदिवशी बांधण्यात येणाऱ्या पूजेला विशेष महत्व असते. तिथीनुसार पंचमीनिमित्त आज गजारुढ स्वरुपात पूजा बांधण्यात आली होती.
Published 13-Oct-2018 20:58 IST | Updated 21:01 IST
कोल्हापूर - अंबामातेचा अखंड जयघोष आणि भाविकांची गर्दी अशा भक्तिमय वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला . आश्विन शुद्ध पंचमीनिमित्त दरवर्षी ही यात्रा भरते. भेटीच्या सोहळ्यापूर्वी परंपरेने कुमारिकेच्या हस्ते कोहळारुपी राक्षसाचा वध करुन कुष्मांड विधी करण्यात येतो. हा विधी पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
Published 13-Oct-2018 18:00 IST