Redstrib
यवतमाळ
Blackline
यवतमाळ - शेजारी महिलेला धक्काबुक्की केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील स्विय सहायकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. टिळकवाडी येथे वास्तव्य असलेल्या स्वीय सहायक नरेंद्र लांजेवार यांच्या अंगणात शेजारच्यांची पाळीव कुत्री आल्याने लांजेवार यांनी दमदाटी व शिवीगाळ करत मारहाण केल्याची महिलेची तक्रार आहे.
Published 16-Jan-2018 16:45 IST
यवतमाळ - पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपीने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पहिल्या माळ्यावरून उडी मारल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी तो जखमी झाल्याने त्याचा पळून जाण्याचा डाव फसला. विनोद कानबाले असे या आरोपीचे नाव आहे.
Published 15-Jan-2018 22:46 IST
यवतमाळ - आज शेकडो संगणक परिचालकांनी हातात किबोर्ड घेऊन जिल्हा परिषदेवर धडक दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाऱ्या ८२७ संगणक परिचालकांना गेल्या ६ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने थकीत वेतन ताबडतोब मिळावे या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढला.
Published 15-Jan-2018 20:34 IST
यवतमाळ - पांढरकवडा बायपास येथे गोवंश तस्करी करणारा ट्रक पलटी झाल्याने एकूण १६ गाई व बैल ठार झाले असून २२ जनावरे गंभीर जखमी झाले आहेत. बजरंग दलाने हा अपघात रात्रीच्या सुमारास गोवंश तस्करांकडून पैशांची वसुली करणाऱ्या एमआयएम अध्यक्षाच्या वाहनाद्वारे पाठलाग होत असल्याने झाल्याचा आरोप केला आहे.
Published 15-Jan-2018 20:12 IST
यवतमाळ - उमरखेड येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी लाच घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाचखोरीच्या या व्हिडिओने वन खात्यात खळबळ उडाली आहे.
Published 15-Jan-2018 17:10 IST
यवतमाळ - कोठा गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलेला दारूविक्रेत्यांसह मद्यपींनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शकुंतला सहस्त्रबुद्धे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्या गावात दारूबंदीसाठी अनेक महिन्यांपासून चळवळ राबवित आहेत.
Published 13-Jan-2018 21:44 IST
यवतमाळ - जिल्ह्यात पहिल्यांदाच एक समलैंगिक विवाह नुकताच पार पडला. अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या शहरातील एका प्रतिष्ठीत व्यावसायिकाच्या मुलाने विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबतच विवाह केला आहे. सध्या हा विवाह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या विवाहाला वराच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने गुरुवारी काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.
Published 12-Jan-2018 11:36 IST | Updated 14:43 IST
यवतमाळ - नाना पटोले यांनी भाजप खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी केली. यावर बोलताना आपल्या घरी सन्मानाने परतल्याचा आनंद होत असल्याची पहिली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यवतमाळमार्गे माहूर येथे दर्शनासाठी जात असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Published 12-Jan-2018 09:32 IST
यवतमाळ - जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील रामपूर येथे आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दहाव्या वर्गातील विद्यार्थिनीने शाळेतीलच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजश्री चोरंग कोटनाके असे या मृत मुलीचे नाव आहे. मात्र वडिलांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
Published 09-Jan-2018 22:36 IST
यवतमाळ - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्युशी झुंज देत आहे. अमित परशूराम भोंगाडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा तरुण जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील राहणारा आहे.
Published 05-Jan-2018 10:29 IST
यवतमाळ - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या राज्यव्यापी बंदनिमित्त शहरातील सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. शाळा, एसटी बसेस, व्यापारी प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप या सर्वांना बंदचा फटका सहन करावा लागला आहे.
Published 03-Jan-2018 13:01 IST
यवतमाळ - भीमा कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद यवतमाळ जिल्ह्यात देखील उमटले आहेत. यवतमाळ धामणगाव मार्गावर काही लोकांनी एसटी बस अडवून बसच्या काचा फोडल्या. चालत्या बसला अडवून बसवर दगडफेक झाल्याने उपस्थित प्रवासी देखील संतप्त झालेले पहायला मिळाले.
Published 02-Jan-2018 15:55 IST
यवतमाळ - वडगाव परिसरातील नागभूमी येथून मसमितीच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी जिगरबाज योध्यांना मानवंदना देण्यात आली.
Published 01-Jan-2018 19:32 IST
यवतमाळ - ग्रामपंचायत भवन निर्मितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत झरीजामणी तालुक्यातील टाकळी आणि सतपल्ली येथील सरपंच पंचायत समिती, उपसभापती आणि ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
Published 01-Jan-2018 18:56 IST


video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

आठवण काढल्याने नव्हे, या कारणांमुळे लागते उचकी
video playटू-डू लिस्ट लिहून ठेवल्यास येईल लवकर झोप
टू-डू लिस्ट लिहून ठेवल्यास येईल लवकर झोप
video playम्हातारपणी दिवसातून तीनदा करा हे काम
म्हातारपणी दिवसातून तीनदा करा हे काम

video playहॅंडसम हंक सिध्दार्थ मल्होत्राचा आज आहे वाढदिवस
हॅंडसम हंक सिध्दार्थ मल्होत्राचा आज आहे वाढदिवस
video playपॅडमॅन चित्रपटाचे नवीन गाणं प्रदर्शित
पॅडमॅन चित्रपटाचे नवीन गाणं प्रदर्शित