• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
Redstrib
वाशिम
Blackline
वाशिम - पावसाने दगा दिल्याने शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. खरिपातील उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकरी, शेतमजूर गावे सोडून शहराकडे जात आहेत. या संदर्भात विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी कार्यालयसमोर अर्धनग्न आंदोलन केले.
Published 17-Oct-2018 21:00 IST
वाशिम - जिल्ह्यातील आसेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे रस्त्यावर सापडलेले दीड लाख रुपये सचिन पट्टेबाहदूर यांनी मूळ मालकाला परत करत माणुसकीचा परिचय करुन दिला. हरीश इरच्छे या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी रिठद येथील जिल्हा बँकेतून दीड लाख रुपये काढले. ते पैसे घेऊन मोटारसायकलवरुन घरी चालले होते. मात्र, रस्त्यात बेलखेड फाट्यावर गतिरोधकावर गाडी आदळल्याने त्यांचे दीड लाखMore
Published 17-Oct-2018 13:38 IST
वाशिम - सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. जिल्ह्यातील मालेगावमधील खिरडा गावात राहणाऱ्या मनोज खाडे यांनी मंगळवारी आपली जीवनयात्रा संपवली.
Published 17-Oct-2018 02:06 IST | Updated 07:38 IST
वाशिम - माहेरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नाही म्हणून हताश झालेल्या युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना जिल्ह्यातील मिर्झापूर येथे घडली. शिवाजी ज्ञानबा सोमटकर (वय २३) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
Published 16-Oct-2018 17:25 IST
वाशिम - शहरातील विविध भागात ३ मुले भीक मागत होती. मात्र, त्या मुलांची आईच त्यांना भीक मागायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीच्या मदतीने सदर महिलेला ताब्यात घेतले.
Published 15-Oct-2018 23:18 IST
वाशिम- जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीच्यानिषेधार्थ वाशिममध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल - डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या वाहन चालकांना गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
Published 11-Oct-2018 20:36 IST
वाशिम - जिल्ह्यातील शहर व परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, १० ऑक्टोबरला छापे टाकले. यात ६ लाख ३४ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Published 10-Oct-2018 23:33 IST | Updated 23:38 IST
वाशिम- मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून नावलौकीक असलेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरतास येथील श्री जगदंबा देवी संस्थानच्या नवरात्र यात्रा महोत्सवास आज १० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. आगामी ९ दिवस संस्थानवर समाजप्रबोधनपर कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Published 10-Oct-2018 21:28 IST | Updated 23:18 IST
वाशिम - जिल्ह्यातील बोराळा प्रकल्पातून प्रस्तावित पुलाचे काम विनाविलंब करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या मागणीसाठी मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर अवचार यांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
Published 09-Oct-2018 19:02 IST
वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव येथे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपंचायतच्यावतीने शनिवार ६ ऑॅक्टोबरपासून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Published 06-Oct-2018 21:28 IST
वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. समृद्धी महामार्गासाठी संपादित होत असलेल्या जमिनीचे क्षेत्र विवरण पत्रात चुकीचे दर्शविले आहे. त्यामुळे यात दुरुस्ती करुन जमिन संपादित करावी आणि मोबदला द्यावा, या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. आज (६ ऑक्टोबर) या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
Published 06-Oct-2018 19:24 IST
वाशिम - व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करुन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
Published 06-Oct-2018 18:57 IST
वाशिम - मुंबई विद्यापीठाने तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता पदवी अभ्यासक्रमात समाविष्ठ केली होती. या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी वाशिम येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
Published 05-Oct-2018 23:51 IST
वाशिम - सोयाबीनची काढणी करीत असताना मळणीयंत्रात अडकल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हराळ येथे शुक्रवारी घडली. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. राजू उत्तम शेंडगे (वय ३०), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Published 05-Oct-2018 22:19 IST