• नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान चालणार
 • छत्तीसगड : माओवाद्यांच्या अम्बुशमध्ये जवान फसले, ५ गंभीर
 • पुणे : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथील बस थांब्याजवळ गोळीबार
 • मुंबई : सलग ३ दिवस सुट्टी आल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
 • मुंबई : घाटकोपरमध्ये झोपडीवर दरड कोसळली, अडीच वर्षाचा मुलगा जखमी
 • मुंबई - घाटकोपरच्या कतोडी पाडा येथे दरड कोसळल्याने मुलगा जखमी, मदतकार्य सुरू
 • चीनमधील भूस्खलनात १०० नागरिक अडकल्याची शक्यता
 • नंदुरबार : विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर
 • नंदुरबार : चौपाळा येथे दोन गटात तुफान हाणामारी, ३ जण जखमी
 • वाशिम : शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजकरता ४० टक्के निधीस राज्य सरकारची मंजुरी
 • हिंगोली : जिल्ह्यात काही भागात तुरळक पाऊस, शेतकरी सुखावला
 • हिंगोली : एकाही राष्ट्रीयकृत बँकेत दहा हजार कर्ज देणे अद्याप सुरू नाही
 • २०१९ ची लोकसभा निवडणूक रमजानच्या महिन्यात घेतली तरी आम्ही तयार - ओवेसी
 • नाशिक : १.९८ कोटींच्या नवीन नोटांसह २ जण ताब्यात, आरोपी पुण्याचे
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - जिल्हापरिषद कार्यालयातील नव्याने तयार करण्यात आलेल्या लिफ्टमध्ये लिफ्ट बंद पडल्याने ५ कर्मचारी अडकून पडले. कुठलीही टेक्निकल यंत्रणा जिल्हापरिषदेकडे उपलब्ध नसल्याने लिफ्ट तोडून कर्मचाऱ्यांना बाहेर काढावे लागले. लिफ्टच्या आतील आणि बाहेरीलही कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास हा थरार अनुभवला.
Published 24-Jan-2017 10:35 IST
वर्धा - कारंजा तालुक्यातील राजनी शिवारातील रोपवनमध्ये वन्यप्राणी पकडण्यासाठी जाळी लावण्याच्या कारणावरुन वनरक्षक व शेतकऱ्यावर शिकाऱ्यांनी हल्ला केला. सीताराम गाखरे यांच्या शेताजवळ वनविभागाच्या रोपवनात पंधरा शिकाऱ्यांनी शिकारीसाठी सापळा रचतांना त्यांना मज्जाव केल्याने वनरक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात वनरक्षक व शेतकरी जखमी झाले आहेत.
Published 23-Jan-2017 09:29 IST
वर्धा - खादी व ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांच्या चित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यासोबत छायाचित्र छापण्यात आले आहे. झालेल्या जाहिरातबाजीच्या या प्रकारावर गांधीवाद्यांनी सडकून टीका केली आहे.
Published 13-Jan-2017 16:13 IST
वर्धा - शहरातील पार्किंगच्या समस्येकडे नगरपरिषद जराही लक्ष द्यायला तयार नाही. निवेदने आणि मोर्चाला जुमानत नसल्याने तरुणांनी आज चक्क नगरपरिषद कार्यालयात सायकली टाकून कायदेभंग आंदोलन केले. 'युवा परिवर्तन की आवाज'च्या तरुणांनी सायकली थेट नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनसमोर लावल्या.
Published 11-Jan-2017 21:07 IST
वर्धा - शहरात पार्किंगची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने रस्त्यावर उभी ठेवावी लागतात. त्यामुळे शहरातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
Published 08-Jan-2017 17:55 IST
वर्धा - हिंदनगर परिसरात धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या करण्यात आली. ही घटना रात्री ११ वाजल्याच्या सुमारास घडली आहे.
Published 08-Jan-2017 16:09 IST
वर्धा - मांडवा-विरुळ मार्गावर २ दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील ४ तरुण जागीच ठार झाले. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री मांडवाजवळ घडली.
Published 08-Jan-2017 16:27 IST


आता डेंग्यू, चिकनगुनियास कारणीभूत डास होतील नामशेष
video playअतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन
अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन

video playसलमानच्या
सलमानच्या 'ट्यूबलाईट'ला देशभर उत्तम प्रतिसाद !