• पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
  • वाशिम : मंगरुळपीर येथील लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
  • वाशिम : नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - शहरात पार्किंगची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने रस्त्यावर उभी ठेवावी लागतात. त्यामुळे शहरातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
Published 08-Jan-2017 17:55 IST
वर्धा - हिंदनगर परिसरात धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या करण्यात आली. ही घटना रात्री ११ वाजल्याच्या सुमारास घडली आहे.
Published 08-Jan-2017 16:09 IST
वर्धा - मांडवा-विरुळ मार्गावर २ दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील ४ तरुण जागीच ठार झाले. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री मांडवाजवळ घडली.
Published 08-Jan-2017 16:27 IST
वर्धा - देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेच्या हातात दारिद्र्य, अशी अवस्था राज्याची व देशाची झाली आहे. मोदींजवळ उत्तर नाही. मोदी बोलत नाहीत. देशात नोटा बंदी जाहीर झाल्यानंतर जनतेचे हाल झाले आहेत. जनतेला वारंवार त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र भाजप पक्षाच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत, भाजप त्याचा खुलासा करीत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
Published 06-Jan-2017 19:28 IST
वर्धा - पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली होती. या भीषण स्फोटात १९ जवान शहीद झाले, तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. या स्फोटाने देशभर खळबळ उडाली. पुलगाव शेजारील गावांवर त्याचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटाचे हादरे परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरास कारणीभूत ठरले.
Published 02-Jan-2017 20:22 IST | Updated 21:48 IST
वर्धा - सरकारने नोटबंदी करुन ५० दिवस पुर्ण झाले आहेत, तरीही शेतकरी व शेतमजुरांची परिस्थिती सुधारल्याचे चित्र दिसत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो मोफत वाटल्याचा प्रकार वर्ध्यात घडला आहे.
Published 28-Dec-2016 22:12 IST
वर्धा - जिल्ह्यातील असंख्य ठिकाणी संत गजानन नगरीच्या नवाखाली पाडण्यात आलेले ले-आऊटला परवानगी नसल्याची बाब उघड झाली आहे. भू माफिया सतीश नरहरशेट्टीवार याला काही दिवसापूर्वी सावंगी पोलिसांनी अटक केल्यावर दररोज एक ना अनेक रहस्य पुढे येत आहेत. यात महसूल विभागही संशयाच्या भोवऱ्यात आहे.
Published 26-Dec-2016 22:17 IST
वर्धा - बोरधरण येथील बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील सालई पेठ शिवारात आज सकाळी बिबट्या अत्यवस्थ आढळून आला. वनविभागाने त्याच्यावर उपचार करुन त्याचे प्राण वाचविले आहेत. गावकरी आणि पीपल फॉर अॅनिमलच्या सहकार्याने जखमी बिबट्याला करुणाश्रमात ठेवण्यात आले.
Published 23-Dec-2016 20:19 IST
वर्धा - पुलगाव रेल्वे स्थानकावरुन केंद्रीय दारुगोळा भांडारात जात असलेल्या मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरुन खाली घसरले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच घटनेची माहिती चालकाने रेल्वे प्रशासनाला दिली. दरम्यान यात कोणतीही हानी झाली नाही.
Published 22-Dec-2016 17:58 IST
वर्धा - कारंजा येथे तीन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारंजा येथील पार्डी जंगलाजवळ एका विहिरीत तीन अस्वले मृतावस्थेत आढळून आली.
Published 22-Dec-2016 13:11 IST
वर्धा - नवीन २ हजाराच्या नोटा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला मिळालेल्या माहितीवरुन ३४ लाख ४३ हजाराच्या रक्कमेसह पकडण्यात
Published 21-Dec-2016 17:41 IST
वर्धा - शहरातील स्टेशनफैल परिसरातील उडाणपूलच्या खाली नाकाबंदी दरमयान शहर पोलिसांना गाडीमध्ये चार लाख पन्नास हजार रुपयाची रोकड सापडली आहे.
Published 20-Dec-2016 22:21 IST
वर्धा - महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचा विद्यार्थी व राष्‍ट्रीय सेवा योजनेचा स्‍वयंसेवक विकास कुमार याची नवी दिल्‍ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या परेडकरिता निवड करण्‍यात आली आहे.
Published 19-Dec-2016 19:04 IST
वर्धा - पश्चिम बंगालवरून आणलेल्या नकली नोटा गुन्हे शाखेने वर्धा रेल्वे स्थानकाजवळ पकडल्या होत्या. ही कारवाई २०१४ मध्ये करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना पंधरा वर्षांची शिक्षा व प्रत्येकी २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. अब्दूल खालीक शेख आबेद, पुसद येथील शेख असीम शेख उस्मान असे त्या आरोपींची नावे आहेत.
Published 18-Dec-2016 16:59 IST

video playगॅस्ट्रोच्या साथीचे थैमान, आढळले १३० रुग्ण

अशा प्रकारचा ग्रीन टी ठरतो आरोग्यासाठी हानिकारक
video playन्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका
न्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका