• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - भूगाव येथील उत्तम गालवा स्टील कंपनीतील ३६ कामगारांना काही दिवसापूर्वी कामावरून काढण्यात आले होते. याबाबतची कंपनी प्रशासनासोबतची आमदार बच्चू कडू यांची चर्चा फिस्कटली. त्यामुळे व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी त्यांची चांगलीच खडाजंगी झाली.
Published 29-Apr-2017 08:03 IST | Updated 09:18 IST
वर्धा - वेळेवर शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अवजारे मिळत नसल्याने प्रत्‍येक गावात शेतीची अवजारे व यंत्रसामग्री बँक सुरू करण्‍यात यावी. महिला किंवा शेतकरी बचत गटाला त्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिल्या आहेत.
Published 28-Apr-2017 11:17 IST
वर्धा - शेतकऱ्याला हमीभावात तूर विकता यावी यासाठी शासनाने ५०५० रुपये भाव देत खरेदीचा शुभारंभ केला. सरकारी खरेदीच्या दुप्पट व्यापाऱ्यांनी तूर खरेदी केली. आकडेवारीचा विचार करता शासकीय तूर खरेदीच्या संथ कारभारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
Published 28-Apr-2017 11:18 IST
वर्धा - बीआरओ तेजपुर आसाम आरसीसी १२७ मध्ये कार्यरत असलेला जवान घरी नागपूरकडे येत असताना अचानक बेपत्ता झाला आहे . त्याच्याशी आठ दिवसापेक्षा अधिक काळापासून संपर्क होऊ शकला नाही. यानंतर जवानाच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून देवळी पोलिसांत त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे .
Published 27-Apr-2017 22:55 IST
वर्धा - मे महिन्याच्या मध्यरात्री केंद्रीय दारुगोळा भांडाराच्या डेल्टा शेडमध्ये स्फोट झाला होता. त्यात १९ जवान शहीद झाले होते. तर १७ जवान जखमी झाले होते. यात आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते. गुरुवारी स्फोटात नुकसान झालेल्या गावातील नागरिकांना आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांची उपस्थिती होती.
Published 27-Apr-2017 22:44 IST
वर्धा - रेल्वे पोलिसांची नजर तशी नेहमीच बोगीतील प्रत्येक हालचालींवर असते. चांगल्या - वाईट गोष्टींचा वेध घेणाऱ्या पोलिसांचा असाच एक सामाजिक दक्षतेचा दाखला वर्ध्यातील रेल्वे पोलिसांनी दिला. मजुरीसाठी घेऊन जात असलेल्या ७ बालकांना वर्ध्यातच रोखून त्यांचे बालपण वाचविण्याचे काम रेल्वे पोलिसांनी केले आहे.
Published 24-Apr-2017 22:31 IST
वर्धा - बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या ८ महिन्याच्या गर्भवती प्रेयसीने लग्नापूर्वीच्या प्रियकरासह आत्महत्या केली. प्रेयसीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन तर प्रियकराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शेख आरजू असे त्या प्रेयसीचे तर शेख राजीक शेख अब्बास असे त्या प्रियकराचे नाव आहे. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडी येथे बुधवारी उघडकीस आली.
Published 20-Apr-2017 14:36 IST
वर्धा - नागपूरहून वर्ध्याकडे येणारी ट्रॅव्हल्स आणि वर्ध्याहून नागपूरला जाणारा कंटेनर समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. सेलू तालुक्यातील महाबळानजीक हा अपघात झाला आहे.
Published 16-Apr-2017 22:16 IST
वर्धा - गुजरात विरुद्ध पुणे संघात खेळल्या जात असलेल्या आयपीएल सामन्यावर कॅशलेस जुगार खेळला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वर्धा आणि कारंजा येथून पाच जणांना अटक करण्यात आली.
Published 16-Apr-2017 10:51 IST | Updated 11:45 IST
वर्धा - गिरड गावातील टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या हमीद पटेल यांच्या शेतात रविवारी रात्रीच्या सुमारास एक वाघ घुसला व त्याने गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवत एका कालवडीचा फडशा पाडला.
Published 11-Apr-2017 11:52 IST
वर्धा - राजकीय नेत्यांनी केलेले दुर्लक्ष व प्रशासनाने केलेली चालढकल याचा निषेध करत सुमारे ३५ कुटुंबांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. समतानगर येथील अतिक्रमणधारकांना हक्काचे घर अद्याप मिळाले नसल्याने घरपट्टे मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
Published 08-Apr-2017 07:44 IST | Updated 08:22 IST
वर्धा - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज सेवाग्राम येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल रोको आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अडवून तब्बल ३ तास रेल्वे रोको आंदोलन केले.
Published 06-Apr-2017 14:01 IST | Updated 16:12 IST
वर्धा - सेलू येथे गेल्या कित्येक महिन्यापासून बंद असणाऱ्या एटीएमला हार घालून आरती ओवाळत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद राहणाऱ्या एटीएममुळे बँकांचा निषेध नोंदविला आहे. सेलू येथे वेगवेगळ्या तीन बँकेचे एटीएम आहेत.
Published 05-Apr-2017 20:26 IST
वर्धा - मध्यप्रदेश येथे तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या आरोपीला आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. शरद मखराम चौहान असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Published 04-Apr-2017 21:17 IST

तुमचे फेसबुक फोटो दर्शवतात तुमची मनस्थिती
video playहे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
हे पदार्थ वाढवतात स्त्रियांची लैंगिक क्षमता
video playएकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण
एकटेपणा देतो या आजाराला आमंत्रण