• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - यावर्षाचा अर्थ संकल्प वर्ध्यातील नागरिकांना आनंदाचा ठरला आहे. या अर्थ संकल्पामुळे १९ वर्षांपासून बंद पडलेली 'शकुंतला' रेल्वे परत सुरू होणार आहे. पुलगाव-आर्वी मार्गावरील रेल्वे या बजेटमधील तरतुदींमुळे पुन्हा रुळावर धावणार आहे.
Published 05-Feb-2017 16:24 IST | Updated 23:03 IST
वर्धा - घरगुती वादातून पतीने मध्यरात्रीच्या दरम्यान पत्नीला पेटविले. ही घटना कारंजा तालुक्यातील तरोडा येथे घडली.
Published 05-Feb-2017 14:21 IST | Updated 14:25 IST
वर्धा - साहित्य हे माणसाला माणसात आणते. साहित्य वेदना आणि प्रतिमेचा संगम असतो. साहित्य निर्मिती वेडेपणातून जन्माला येत असते. शहाणपण कायम ठेऊन चांगल्या कलाकृतीची निर्मिती होत नसते. यासाठी अस्सल जीवनानुभव घ्यावा लागतो. तो घेण्यात मराठी साहित्यिक थिटा पडतो आहे असे वाटते. कारण अशी अजरामर कलाकृती मराठीत अद्यापतरी दिसत नसल्याची खंत सुप्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.
Published 04-Feb-2017 22:58 IST
वर्धा - गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीवर वर्ध्यातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पैशाची गुंतवणूक करवून घेत प्लॉट देऊ, असे आमिष दाखवणाऱ्या मैत्रेय कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
Published 03-Feb-2017 20:51 IST
वर्धा - पाणी, पर्यावरणासाठी काम करण्याची आज नितांत गरज आहे. बापूंच्या बुनियादी शिक्षणात मानवी ह्रदय परिवर्तन करण्याची ताकद आहे. यातूनच पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र सिह यांनी सेवाग्राम आश्रमात हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रमात काढले.
Published 31-Jan-2017 11:58 IST
वर्धा - यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारा दिले जाणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ७ साहित्यरत्नांची निवड या पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.
Published 28-Jan-2017 20:55 IST
वर्धा - वाहन चोरीच्या प्रकरणात येथील पोलिसांनी केलेली आतापर्यंतची ही जिल्ह्यामधील मोठी कारवाई आहे. हिंगणघाट येथील दुचाकी चोरीच्या प्रकरणातील ३ चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून ४ कार आणि १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
Published 25-Jan-2017 13:10 IST
मुंबई - शेतकऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या जिल्हा सहकारी बँका डबघाईला आल्याने या बँकांना पुनरुज्जीवित करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. त्यामुळे तोट्यात असलेल्या या जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.
Published 24-Jan-2017 19:53 IST
वर्धा - जिल्हापरिषद कार्यालयातील नव्याने तयार करण्यात आलेल्या लिफ्टमध्ये लिफ्ट बंद पडल्याने ५ कर्मचारी अडकून पडले. कुठलीही टेक्निकल यंत्रणा जिल्हापरिषदेकडे उपलब्ध नसल्याने लिफ्ट तोडून कर्मचाऱ्यांना बाहेर काढावे लागले. लिफ्टच्या आतील आणि बाहेरीलही कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास हा थरार अनुभवला.
Published 24-Jan-2017 10:35 IST
वर्धा - कारंजा तालुक्यातील राजनी शिवारातील रोपवनमध्ये वन्यप्राणी पकडण्यासाठी जाळी लावण्याच्या कारणावरुन वनरक्षक व शेतकऱ्यावर शिकाऱ्यांनी हल्ला केला. सीताराम गाखरे यांच्या शेताजवळ वनविभागाच्या रोपवनात पंधरा शिकाऱ्यांनी शिकारीसाठी सापळा रचतांना त्यांना मज्जाव केल्याने वनरक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात वनरक्षक व शेतकरी जखमी झाले आहेत.
Published 23-Jan-2017 09:29 IST
वर्धा - खादी व ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांच्या चित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यासोबत छायाचित्र छापण्यात आले आहे. झालेल्या जाहिरातबाजीच्या या प्रकारावर गांधीवाद्यांनी सडकून टीका केली आहे.
Published 13-Jan-2017 16:13 IST
वर्धा - शहरातील पार्किंगच्या समस्येकडे नगरपरिषद जराही लक्ष द्यायला तयार नाही. निवेदने आणि मोर्चाला जुमानत नसल्याने तरुणांनी आज चक्क नगरपरिषद कार्यालयात सायकली टाकून कायदेभंग आंदोलन केले. 'युवा परिवर्तन की आवाज'च्या तरुणांनी सायकली थेट नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनसमोर लावल्या.
Published 11-Jan-2017 21:07 IST
वर्धा - शहरात पार्किंगची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने रस्त्यावर उभी ठेवावी लागतात. त्यामुळे शहरातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
Published 08-Jan-2017 17:55 IST
वर्धा - हिंदनगर परिसरात धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या करण्यात आली. ही घटना रात्री ११ वाजल्याच्या सुमारास घडली आहे.
Published 08-Jan-2017 16:09 IST


स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे