• पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • पनवेल, भिवंडी-निजामपूर, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
  • वाशिम : मंगरुळपीर येथील लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
  • वाशिम : नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - तुरीला हमीभाव देऊन शासनाने शेतकऱ्याला दिलासा दिला. १५ मार्चपर्यंत असणाऱ्या सरकारी तूर खरेदीला मुख्यमंत्रांनी एक महिन्याची मुदत वाढ दिली आहे. परंतु बारदाणे उपलब्ध नसल्याचे कारण सांगून एफसीआयने तूर खरेदी पुन्हा बंद केली आहे. सुमारे दहा दिवसांपासून ही खरेदी बंद असल्याने मुदतवाढ देऊनही शेतकऱ्याला आपली तूर व्यापाऱ्याला मातीमोल किमतीत विकावी लागत आहे.
Published 19-Mar-2017 10:45 IST | Updated 10:54 IST
वर्धा - महिला व बाल विकास विभागाच्‍या वतीने समस्‍याग्रस्‍त व पीडित महिलांच्‍या प्रश्‍नांची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करणे. तसेच समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्‍हणून प्रत्‍येक महिन्‍याच्या तिसऱ्या शनिवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्‍यात येते. येत्‍या २० मार्च ला सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिन आयोजितMore
Published 18-Mar-2017 13:35 IST
वर्धा - काँग्रेस आणि भाजपच्या गट नेत्यांची निवड करण्यात आली आहे. आज शासकीय विश्रामगृहावर झालेल्या भाजपच्या बैठकीत सरोज मते यांना गटनेतेपदी निवडण्यात आले आहे. काँग्रेसमध्येही गट स्थापन करण्यात आला असून संजय शिंदे यांची काँग्रेसच्या गटनेते पदासाठी निवड करण्यात आली आहे.
Published 18-Mar-2017 12:19 IST
वर्धा - उमरेड येथून पहाटे गांधीग्रामला जाणाऱ्या रेल्वेच्या मालगाडीच्या दोन बोगीला आग लागल्याची घटना पुलगाव येथे घडली आहे.
Published 17-Mar-2017 22:57 IST
वर्धा - आर्वी येथील कापूस जिनिंगला आग लागल्याची घटना आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या आगीत २ हजार कापूस गाठी जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. जिनिंगला आग लागण्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.
Published 15-Mar-2017 11:45 IST
वर्धा - जिल्ह्यात झालेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवड प्रक्रियेत भाजपने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील ८ ही पंचायत समितींवर आपला झेंडा रोवून सभापती पद मिळवले आहे. भाजपला ६ ठिकाणी उपसभापती पद मिळाले आहे तर केवळ २ ठिकाणी काँग्रेसला आपला उपसभापती नेमता आला आहे.
Published 14-Mar-2017 22:40 IST
वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे दोन गटात वाद झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आजी माजी सदस्यांच्या गटात हाणामारी झाल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. होळीच्या दिवशी झालेल्या या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत.
Published 14-Mar-2017 17:37 IST
वर्धा - कारंजा येथील अमरावती-नागपूर महामार्गावरील ओरिएंटल पाथवेज टोल नाक्यावरील ६ कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. एका सहकाऱ्याने आपल्या डब्यात आणलेले कोहळ्याचे भजे खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे. रुग्णांना आर्वी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 13-Mar-2017 22:32 IST
वर्धा - तळेगाव शामजी पंत येथील नागपूर - अमरावती महामार्गावरील इंदरमारी शिवारात एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे.
Published 12-Mar-2017 22:28 IST
वर्धा- छत्तीसगडमधील सुखमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरात शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत शहीद झालेले नाचणगाव येथील जवान प्रेमदास मेंढे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published 12-Mar-2017 17:40 IST | Updated 17:51 IST
वर्धा - छत्तीसगडमधील सुखमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरात शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ केंद्रीय राखीव दलाचे जवान शहीद झाले आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथील प्रेमदास मेंढे हे जवान शहीद झाले आहेत.
Published 12-Mar-2017 10:14 IST
मुंबई - मतमोजणीच्या दिवशी सुखमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर शनिवारी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे १२ जवान शहीद झाल्याची घटना घडली. या शहीदांमध्ये महाराष्ट्राच्या मंगेश पांडे, नंदकुमार अत्राम आणि प्रेमदास मेंढे या ३ जवानांचा समावेश आहे.
Published 12-Mar-2017 09:56 IST
वर्धा - देवळी तालुक्यात इंजाळा येथील उसनवारीचे पैसे परत न केल्यामुळे बाप लेकाची हत्या करण्यात आली आहे. गावातील एका व्यक्तीने काठीने मारहाण केली. यात मुलगा आणि वडील दोघेही गंभीर जखमी झाले. परंतु, रुग्णालयात नेत असताना त्या दोघांचाही मृत्यू झाला.
Published 09-Mar-2017 20:44 IST
वर्धा - देवळी तालुक्यातील इंजाळा गावात बाप लेकाची काठीने मारून हत्या झाल्याची घटना घडली. संजय नाथूजी होले आणि त्याचे वडील नथ्थू तुकाराम होले अशी खून करण्यात आलेल्या बाप-लेकाची नावे आहेत.
Published 09-Mar-2017 12:02 IST

video playगॅस्ट्रोच्या साथीचे थैमान, आढळले १३० रुग्ण

अशा प्रकारचा ग्रीन टी ठरतो आरोग्यासाठी हानिकारक
video playन्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका
न्यूमोनियामुळे वाढतो या आजाराचा धोका