• किदम्बी श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा
  • रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
  • कोल्हापूर: महसूल मंत्र्यांच्या संपत्तीची ई.डी.मार्फत चौकशी करा - आमदार क्षीरसागर
  • ठाणे : मनसैनिकांना चोख उत्तर देण्यासाठी डोंबिवलीतील भीमसैनिक सज्ज
  • सोलापूर : कर्जमाफीची रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात - सुभाष देशमुख
  • औरंगबाद : कर्जमाफीची मार्केटिंग करा - रावसाहेब दानवे
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - सरपंचाचे पद महिलांसाठी आरक्षित असतांना महिला अर्जच करत नाहीत. अर्ज केलाही तर तो परत घेतला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार आर्वी तालुक्यातील नेरी मिर्झापूर ग्राम पंचायतमध्ये पाहायला मिळाला आहे.
Published 27-Aug-2017 16:47 IST
वर्धा - राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे ६५ हजार अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी २७ हजार ८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. तर ४८ हजार ३८२ शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर केले आहेत. यावरून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेताना ऑफलाईन अर्जालाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
Published 25-Aug-2017 20:04 IST
वर्धा - रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल न्यायमूर्ती रूपनवाल कमिशनने दिला होता. त्या अहवालाविरोधात आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
Published 25-Aug-2017 09:57 IST
वर्धा - नंदी पोळा हा शेतकऱ्यांसह पशूंना पूजनाचा दिवस. शेतात मशागतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणारा बैल या दिवशी पूजनीय असतो. पण आजच्या यंत्र युगात बैलांची संख्या कमी होत आहे. याची जाणीव करून देणारे चित्र वर्धा शहरातील पोळ्यामध्ये दिसून आले.
Published 22-Aug-2017 16:03 IST
वर्धा - प्रत्येक गरोदर मातेस प्रसूतीपूर्व काळात उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा देण्यासाठी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
Published 20-Aug-2017 17:26 IST
वर्धा - सेवाग्राम रेल्वे स्थानकावर संदिग्धावस्थेत फिरत असणाऱ्या अकोला येथील दाम्पत्यास गांजासह अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ किलो २०० ग्राम गांजा जप्त केला असून त्याची किंमत २ लाख १२ हजार रुपये आहे.
Published 20-Aug-2017 17:04 IST
वर्धा - कारंजा तालुक्यातील शेलगाव लहाने येथे विजेचा धक्का लागून आईसह दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Published 20-Aug-2017 07:45 IST
वर्धा - कारंजा तालुक्यातील ठाणेगाव शिवारात अॅक्सिस बँकेची कॅशव्हॅन लूट प्रकरणातील १८ जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यापैकी ५ जणांना सात वर्षांचा तर १३ जणांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
Published 19-Aug-2017 08:14 IST
वर्धा - येत्‍या तीन वर्षात जिल्‍ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे कृषीपंप सौर ऊर्जेवर चालविण्‍यात येतील. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये सौर विज प्रकल्‍प उभारण्‍यात येणार असल्‍याचे राज्‍याचे ऊर्जा व उत्‍पादन शुल्‍क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
Published 18-Aug-2017 22:55 IST
वर्धा - पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Published 18-Aug-2017 18:49 IST
वर्धा - 'कलाभवन बांध म्हणतो... आणि परवड आमची टाळ म्हणतो... जागा हक्काची मागतो... लढण्यास बळ मागतो' असे म्हणत शहरातील कलांवतांनी अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. रस्त्यावर कविता वाचन करत एवढेच नव्हे तर रात्रीच्या अंधारातही पणतीच्या प्रकाशात कविता करत ते व्यासपीठाची मागणी करत आहेत. धरणे देत कवितांमधूनच होणाऱ्या या आवाजाला शब्दांची चांगलीच धार आहे.
Published 18-Aug-2017 18:53 IST
वर्धा - विदेशी दारूचा साठा वाहून नेणाऱ्या टाटा एस मिनी ट्रकमधून अकरा लाख ३२ हजार ५०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान केलेल्या झडतीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.
Published 17-Aug-2017 20:26 IST
वर्धा - एकुलत्या एक मुलाचे आकस्मात निधन झाल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्यातून सावरत त्या मुलाचा मृतदेह त्याच्या परिवाराने नागपूर येथील रुग्णालयात दान केल्याने समाजापुढे नवा आदर्श घालून दिला. ही घटना हिंगणघाट येथे घडली असून मोहीत असे त्या मृत मुलाचे नाव आहे. तर राजेंद्र झोटिंग असे मुलाचा मृतदेह दान करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.
Published 14-Aug-2017 07:30 IST | Updated 08:02 IST
वर्धा - राष्ट्र सेवा दलाच्यावतीने १९४२ च्या भारत छोडो क्रांती पर्वाची आठवण म्हणून 'ऑगस्ट क्रांती जागर यात्रा' काढण्यात आली. सेवाग्राम क्रांती प्रेरणास्थळ ते आष्टी क्रांती लढास्थळ अशी ही यात्रा होती. ज्येष्ठ गांधीवादी जयवंत मठकर यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 'आजच्या काळात घडणाऱ्या विविध देश -समाज विघातक गोष्टींचा अतिरेक थोपविण्यासाठी विचार समृद्व युवा शक्ति घडवणे, ही काळाचीMore
Published 11-Aug-2017 10:48 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत संमिश्र वर्चस्व
video playचिमुकल्या शिलेदारांनी साकारला
चिमुकल्या शिलेदारांनी साकारला 'सुवर्णगड'

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव