• मुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे
 • रायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट
 • रायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग
 • मुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश
 • पुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह
 • कलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल
 • मुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त
 • औरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू
 • वर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री
 • वर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त
 • वर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
 • गोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - आष्टी तालुक्यातील पंचाळा गावानजीकच्या जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जगन विघ्ने (५५), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 13-Apr-2018 19:15 IST
वर्धा - भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या उपोषण या शांतीपूर्ण अस्त्राची अवहेलना करत आहेत. राजकारणी ढोंगी आहेत, असा आरोप 'युवा परिवर्तन की आवाज' संघटनेने करत उपोषण केले.
Published 13-Apr-2018 17:41 IST
वर्धा - गांधी प्रदर्शनीच्या जागेवर व्ही आय पी कॉटेज उभारले जात असल्याने सेवाग्राम परिसरातील गांधी चित्र प्रदर्शन तोडण्यात येत आहे. चित्र प्रदर्शनीतील दांडी यात्रेची प्रतिकृतीही तोडण्यात आली. त्यामुळे गांधी विचार पर्यटकांपर्यंत पोहोचविणारे चित्रांचे प्रदर्शन तोडल्याने कुठेतरी गांधी विचारांनाच तडा जातो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published 11-Apr-2018 16:46 IST
वर्धा - वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असे. मात्र, आता अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगार सहज उपलब्ध होत नसल्याने ही गर्दी अलीकडच्या काळात ओसरली आहे. तर मेडिकलची क्रेझ मात्र अजूनही कायम आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचा विचार करता मेडिकलच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी पालक आणि अभियांत्रिकीला विद्यार्थी मिळावे यासाठी अभियांत्रिकीचेMore
Published 09-Apr-2018 10:33 IST
वर्धा - शेतकऱ्यांच्या हिताच्या धोरणांवर कोणतेच सरकार गंभीर नाही. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्याचे मरण निश्चित आहे. यात पोरांचा खेळ होत आहे पण बेडकांना मात्र जीव गमवावा लागत असल्याची घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.
Published 09-Apr-2018 10:20 IST
वर्धा - राज्यात १० जिल्ह्यांना जून महिन्यापासून रुग्णांच्या सेवेसाठी केमोथेरोपी उपचारपद्धती सुरू होणार आहे. पण, या केमोथेरोपीसाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ फिजिशियन हे या उपचारपद्धतीत रुग्णालयांना आव्हान ठरणार आहे.
Published 08-Apr-2018 17:26 IST
वर्धा - भूखंड माफिया सतीश नरहरशेट्टीवार याने एका व्यक्तीला विकलेली जागा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकून फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याला तीन वर्षाचा कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्वाळा ४ थे सह दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अपूर्वा भसारकर यांनी दिला.
Published 04-Apr-2018 16:50 IST
वर्धा - रेल्वे पोलिसांनी स्थानकावर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. या महिलेकडून बांगलादेशी चलन व बोगस कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
Published 04-Apr-2018 08:38 IST | Updated 08:42 IST
वर्धा - वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या समुद्रपुर तालुक्यातील कोरा परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोरा परिसरातील गावांमध्ये वाघाने अनेक गुरे मारली आहेत. वनविभागामार्फत वाघाचा बंदोबस्त होत नसल्याने कोरा परिसरातील गावकऱ्यांनी मृत जनावरे वनविभागाच्या कार्यालयात आणून निषेध केला आहे.
Published 03-Apr-2018 11:11 IST
वर्धा - आर्वी येथील जाजूवाडीत चक्क नवऱ्यानेच बायकोच्या एटीएमवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी संजय ढोले याच्याविरुद्ध त्याची पत्नी अर्चना ढोले हिने तक्रार दाखल केली आहे.
Published 01-Apr-2018 17:03 IST
वर्धा - येथील एका खासगी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीतून बाहेर पडलेल्या २ कर्मचाऱ्यांनी कंपनीचा डाटा चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हे वर्ध्यातील डॉल्फिन कंपनीत काम करत होते. तेथील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी त्याच कंपनीतील महत्त्वाचा डाटा चोरी केला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी इतर तिघा जणांच्या मदतीने चोरी केलेला तो डाटा एका बनावट कंपनीला विकला आहे.
Published 31-Mar-2018 14:33 IST
वर्धा - वर्षभरापूर्वी बांधकाम झालेली ३ मजली इमारत अचानक पत्याच्या घराप्रमाणे कोसळल्याची घटना पुलंगाव येथे शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये दुकानातील कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे नुकसान झाले आहे.
Published 31-Mar-2018 14:23 IST
वर्धा - वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावावर ४८ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या दोघांना सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन प्रवेश होतात, अशा चर्चांना सध्या उधाण आले असून वशिलेबाजी आणि पैशाने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करवून देणारे मोठे रॅकेट पोलिसांना सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published 30-Mar-2018 21:08 IST
वर्धा - दारोडा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लावण्याचा प्रकार समोर आला. या गोठ्यातील शेती साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत गोठ्याला आग लावली. या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
Published 30-Mar-2018 16:20 IST