• अमरावती - तिवस्यात दोन रायफलीसह एक देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त
  • मुंबई - दहिसरमध्ये सिलेंडरचा स्फोट, चार जण गंभीर जखमी
  • मुंबई - केंद्रीय मात्सिकी शिक्षा संस्थानमधील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी संप
  • अकोला- जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवारांची बदली
  • ठाणे - भाजपच्या दोन नगरसेवकांवर ६० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत कारंजा तालुक्यातील राणवाडी या गावात श्रमदान सुरू आहे. या गावात मंगळवारी सिनेअभिनेते आमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी श्रमदान केले.
Published 24-Apr-2018 17:15 IST | Updated 17:38 IST
वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या तसेच त्यांच्याशी निगडीत सर्व वास्तूंना ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्या वास्तूंचे जतन केले जाते. मात्र, सेवाग्राम येथील गांधी यांच्या काळात त्यांच्या संपर्काशी निगडीत डाकघर हे आजही उपेक्षित आहे. ही ऐतिहासिक वास्तू चक्क आश्रमाच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान झाले आहे.
Published 24-Apr-2018 16:12 IST
वर्धा - जम्मू येथील कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराचा निषेध आज शहर व जिल्ह्यातील विविध ३६ संघटनांनी केला आहे. या संघटनांनी शांती मार्च काढून पीडितेच्या नातेवाईकांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. विविध संघटनांनी हा मार्च शहरातील बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला.
Published 20-Apr-2018 20:00 IST
वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध दारूभट्ट्यांविरोधात वॉश-आऊट मोहीम सुरू केल्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये लहादेवी शिवारातील सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचे मोहा सडवा रसायन नष्ट करण्यात आले.
Published 20-Apr-2018 17:09 IST
वर्धा - नागपूर-अमरावती हायवेवर असणाऱ्या तळेगाव शामजी पंत येथे रात्रीच्या दरम्यान दरोडा घालून ५ घरे फोडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दरोडा घालण्यात आलेल्या ४ घरांपैकी २ घरे पोलीस आणि वन खात्यातील अधिकाऱ्यांची आहेत. या चोरीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
Published 18-Apr-2018 21:00 IST
वर्धा - एकीकडे नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र, याच नद्यांच्या विद्रुपीकरणाचे काम वाळू माफिया करत असल्याची बाब समोर आली आहे. वाळू माफियांकडून हरित लवाद आणि राज्य शासनाच्या नियमावलींना तिलांजली देत नद्यांमधून अवैध वाळू उपसा धडाक्यात सुरू आहे.
Published 18-Apr-2018 13:02 IST
वर्धा - शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना विनाविलंब विद्युत जोडणी देण्यासाठी निर्देशित करावे. या विषयावर योग्य ती कार्यवाही करून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय त्वरित घ्यावे. या अपेक्षेचे पत्र शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.
Published 17-Apr-2018 09:05 IST
वर्धा - शहरातील शिवाजी चौकात असणाऱ्या दुकानामागे अचानक आज स्फोटकसदृश्य वस्तू आढळल्या आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीअंती ही स्फोटके नसून चायनिज फटाके असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Published 16-Apr-2018 19:24 IST
वर्धा - एका तरुण-तरुणीचा मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Published 16-Apr-2018 16:38 IST
वर्धा - दारूची तस्करी करणाऱ्या  एका फरार आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. समुद्रपूर न्यायालयात पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका देत आरोपीने पळ काढला होता. त्या नंतर हैद्राबाद येथून या आरोपीला जेरबंद करण्यात आले.
Published 15-Apr-2018 10:21 IST
वर्धा - समुद्रपूर येथील स्टेट बँकेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी मध्यप्रदेश येथून जेरबंद केले. या टोळीने १२ राज्यात एटीएम मशीनवर दरोडा टाकल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
Published 15-Apr-2018 08:13 IST
वर्धा - जनतेच्या रक्षणासाठी असलेले सरकार बलात्काराच्या आरोपींना पाठीशी घालत आहे, त्यामुळे आता रक्षकच भक्षक झाल्याची टीका महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केली. उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शहरातील बजाज चौकातून कँडल मार्च काढत निषेध नोंदविला.
Published 14-Apr-2018 08:23 IST
वर्धा - आष्टी तालुक्यातील पंचाळा गावानजीकच्या जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जगन विघ्ने (५५), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 13-Apr-2018 19:15 IST
वर्धा - भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या उपोषण या शांतीपूर्ण अस्त्राची अवहेलना करत आहेत. राजकारणी ढोंगी आहेत, असा आरोप 'युवा परिवर्तन की आवाज' संघटनेने करत उपोषण केले.
Published 13-Apr-2018 17:41 IST

video playरेती घाटावर अवैध वाळू उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष
रेती घाटावर अवैध वाळू उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष