दुसऱ्या संत्रा फेस्टीव्हलच्या आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विमानतळावर संत्रा विकण्यासाठी संत्र्याचा स्टॉल उघचलण्यासाठी किती पापड लाटले ते केंद्रीय मंत्री असतानासुद्दा सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. रामदेव बाबा यांनी ५ हजार कोटी रुपये खर्च करून नागपुरात संत्रा प्रकल्प टाकला आहे. आता त्यांना जर विदर्भातील शेतकऱ्यांनी संत्रा दिला नाही तर रामदेव बाबा माझे केस उपटतील असेही गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी केंद्रीय लिंबुवर्गीय संशोधन संस्था आणि राज्याच्या कृषी खात्याचे कान टोचले.