• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
नागपूर
Blackline
नागपूर - महावितरण विरोधात खोटी तक्रार दाखल केल्यास तक्रारदार वीज ग्राहक आणि त्याच्या प्रतिनिधीला नुकसान भरपाईपोटी दंड ठोठावण्यात येईल, असा महत्वपूर्ण निकाल महावितरणच्या नागपूर येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.
Published 29-Apr-2017 16:19 IST
नागपूर - चोवीस तास ऑन ड्युटी, गुन्हेगारांशी येणारा संबंध, तपासाचा तणाव यामुळे पोलीस हा उर्मठ, निष्ठूर असतो असा सर्वसामन्यांचा समज आहे. कामाच्या व्यापातून स्वत:करिता आणि कुटुंबाकरिता वेळ काढणे अवघड असताना त्यात कला जोपासणारे पोलीस अधिकारी अगदी मोजकेच आहेत. मात्र साहित्यकला जोपासणारे पोलीस निरीक्षक संजय पांडे यांनी त्यांच्या कवितासंग्रहातून स्व:ताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Published 29-Apr-2017 12:48 IST
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज तयार करून त्यावर टाकलेल्या अश्लील पोस्टमुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. याबाबात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत स्वत: जनहित याचिका दाखल करत याप्रकरणी गुगलला आणि फेसबुकला नोटीस बजावली आहे.
Published 28-Apr-2017 21:11 IST
नागपूर - कस्तूरचंद पार्क हे एक ऐतिहासिक वारसा असलेले स्थळ आहे. या पार्कवरील सभा, प्रदर्शन, मेळावे यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बंदी घातली आहे. यापुढे केवळ स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन हे तीन शासकीय कार्यक्रम होतील. याखेरीज दुसरे कोणतेही कार्यक्रम येथे होणार नाहीत.
Published 28-Apr-2017 14:20 IST
नागपूर - 'बाहुबली-२ द कनक्लुजन' चित्रपट पाहून नागपूरकर सैराट झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी नागपूरकरांनी पहाटेपासून चित्रपटगृहासमोर गर्दी केली होती. चित्रपट संपल्यानंतर जय माहेश्मतीचा आवाज देत प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडले.
Published 28-Apr-2017 12:23 IST
नागपूर - नगरअभियंता रवी भास्कर गोविंदवार यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने पकडले आहे. गोविंदवार हे नगरपरिषद उमरेड येथे कार्यरत असून मौदा नगरपंचायतीचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारदार हे सब कॉन्ट्रक्टर आहे.
Published 28-Apr-2017 11:35 IST | Updated 12:40 IST
नागपूर - भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर खडसे यांनी आक्षेप घेतला होता. हा आक्षेप समितीने फेटाळला आहे. तसेच अंतिम निर्णयाच्या वेळी मत देण्याचा आदेशाबात घेतलेला खडसे यांचा आक्षेपही समितीने गुरुवारी फेटाळून लावला.
Published 28-Apr-2017 10:21 IST
नागपूर - लहान मुलांना मारहाण करून त्यांना रस्त्यावर भीक मागायला लावणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. ८ अल्पवयीन मुलामुलींची या टोळीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखा व बाल सरंक्षण अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
Published 27-Apr-2017 22:03 IST
नागपूर - नितिका फार्मास्युटीकल स्पेशालिटी कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दंडाधिकारीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Published 27-Apr-2017 21:02 IST
नागपूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जागरूक नागरिकांचाही वॉच राहणार आहे. नागरिकही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून वाहतूक पोलिसांना पाठवू शकतात. त्यानंतर या निष्काळजी वाहनचालाकांचे ई-चालन योग्य अभ्यास व मुल्यमापन करून वाहतूक विभागाकडून पाठविण्यात येणार आहे.
Published 27-Apr-2017 17:13 IST
नागपूर - सुधारगृहातून पळून गेलेल्या पीडित मुलीवर २४ तासात दोनदा सामूहिक बलात्कार झाल्याचे पोलीस तपासात उघडकिस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा डोंगरे व जितू मंगलानी या दोघांना अटक केली आहे.
Published 27-Apr-2017 12:55 IST
नागपूर - भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याने जमीन बळकावल्याचे एकामागून एक प्रकार समोर येत आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची मालिका सतत सुरूच आहे. या घटनांची मानकापूर व कोराडी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून ग्वालबन्सी व त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविले आहेत.
Published 27-Apr-2017 12:18 IST | Updated 12:32 IST
नागपूर - शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपल्या कार्यकाळात सर्व प्रयत्न करणार असल्याची अशी ग्वाही नवनियुक्त आयुक्त अश्विन मुद्गल यांनी दिली. बुधवारी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
Published 26-Apr-2017 21:33 IST
नागपूर - ईव्हीएम सारखे यंत्र आजच्या आधुनिक काळात हॅक करणे कठीण नाही. अनेक विकसित देश आता ईव्हीएमऐवजी मत पत्रिकेच्या माध्यमाने निवडणूक घेत आहेत. आपल्या देशात देखील मत पत्रिकेच्या माध्यमानेच निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे, ते आज नागपुरात बोलत होते.
Published 26-Apr-2017 18:46 IST | Updated 18:52 IST

video playरोडरोमियोंना धडा शिकविणार जिजाऊच्या वाघिणी

स्पर्म डोनेशन...कसे ? कुठे ? केव्हा ? कधी ?
video playलीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे