• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
Redstrib
गोंदिया
Blackline
गोंदिया - बिरसीमध्ये नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचे हेलिकॉप्टर नदीत कोसळले. प्रशिक्षणादरम्यान आज सकाळी ९ वाजता हा अपघात झाला.
Published 26-Apr-2017 12:28 IST
गोंदिया - रेल्वेसाठी शेतात उभारण्यात येणाऱ्या १२३ केव्ही व्हॅटच्या टॉवर लाईनला गोंदियातील शेतकऱ्यांनी विरोध करत काम बंद पाडले. यावेळी प्रती टॉवर १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर जोपर्यंत मोबदला देणार नाही, तोपर्यंत शेतातून टॉवर लाईनचे काम करू देणार नसल्याचा पवित्रा बळीराजा शेतकरी संघटनेने घेतला आहे.
Published 26-Apr-2017 09:36 IST
गोंदिया - तिरोडा तालुक्यातील वामन हटवार (वय ३२) या युवकाने ८ महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. घटनेनंतर तिरोडा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Published 26-Apr-2017 07:15 IST | Updated 07:31 IST
गोंदिया - पोलिसांनी स्फोटके जप्त करुन मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Published 25-Apr-2017 11:24 IST
गोंदिया - वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने कूलर, एसी, पंख्याशिवाय घरात थांबणे कुणालाही शक्य नाही. मात्र जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे विना पंखा, विना एसी आपल्या घरात राहतात. यावर कदाचीत विश्वास बसणार नाही. पण जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी एक अनोखा प्रयोग करून आपल्या घराला 'कूल कूल' ठेवले आहे.
Published 25-Apr-2017 09:48 IST
गोंदिया - केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भारणोली-बोरटोला गावाच्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी बॅनर लावले. यावर त्यांनी ठेकेदार आणि नक्षलविरोधी जनजागरण अभियान राबविणाऱ्यांना धमकी दिली आहे.
Published 24-Apr-2017 22:24 IST
गोंदिया - चांदसुराज गावाच्या टॉवर लाईन पहाडीवर लपवून ठेवलेले नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळल्या आहेत.
Published 20-Apr-2017 14:39 IST
गोंदिया - जिल्हा पोलिस दलाच्या बॉम्बशोधक पथकाने सालेकसा तालुक्यातील चांदसुराज पहाडावर वायरलेस टॉवर लाईनवर डम्प केलेले नक्षल साहित्य जप्त केले. ३ किलो स्फोटक, २ डिटोनेटर, १ बँटरी, लोखंडी खिडे, २०० मीटर विद्युत तार जप्त करण्यात आले.
Published 19-Apr-2017 19:29 IST
गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त रमाई या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
Published 17-Apr-2017 20:37 IST | Updated 20:39 IST
गोंदिया - उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी अनेक पक्षांचा मृत्यू होत आहे. यासाठी एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेमार्फत पक्ष्यांच्या पाण्याकरीता मातीच्या भांड्याचे वितरण करण्यात आले आहे.
Published 17-Apr-2017 10:37 IST
गोंदिया - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे अवचित्य साधून जेएनयु संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात हजेरी लावली. प्रचारसभेत संबोधित करताना मोदी सरकार आणि आरएसएसवर त्याने सडेतोड टीका केली.
Published 14-Apr-2017 13:33 IST | Updated 13:50 IST
गोंदिया - शहराच्या मध्य भागी असलेल्या उड्डाण पुलावर लावण्यात आलेला जड वाहन प्रतिबंधकाचा बॅरीगेट पुलाखालून जाणाऱ्या एका पादचाऱ्याच्या डोक्यावर पडला. दामोदर वटवानी असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 12-Apr-2017 21:29 IST
गोंदिया - शहरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात मंगळवारी हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सीविल लाईन परिसरात असलेले हे हनुमान मंदिर जवळपास १०० वर्षे जुने आहे. नवसाला पावणारा हनुमान अशी या देवस्थानाची ओळख आहे. दर शनिवारी आणि मंगळवारी या मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते.
Published 11-Apr-2017 20:03 IST
गोंदिया - महाराष्ट्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवयुवकांना प्रशिक्षण देणे, त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात एक दिवसीय कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
Published 11-Apr-2017 07:45 IST


ऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
video playदात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
दात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
video playही हिरवी पूड आहे सुपरफूड
ही हिरवी पूड आहे सुपरफूड

video play
'लिपस्टिक अंडर माय बुरखा'ला 'ए' सर्टिफिकेटची शिफारस