• औरंगाबाद-जाधव यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी सरकारी इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • औरंगाबाद - जवान संदीप जाधव यांचे पार्थिव शनिवारी सकाळी गोकूळवाडीत दाखल होणार.
  • औरंगाबाद - जवान संदीप जाधव यांचे पार्थिव आज रात्री औरंगाबादमध्ये आणण्यात येणार.
  • औरंगाबाद-पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात औरंगाबादचे सुपुत्र संदीप जाधव (३५) शहीद.
  • पाकिस्तानात पेशावरजवळ शक्तिशाली स्फोट, १५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी.
Redstrib
गडचिरोली
Blackline
गडचिरोली - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अनेकदा जाहीर करण्यात आला. मात्र, नक्षलवाद्यांच्या भीतीने जिल्ह्यातील तब्बल १५ ग्रामपंचायतींवर एकाही लोकप्रतिनिधीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार गेल्या सात वर्षांपासून प्रशासकांच्या भरवशावर चालविला जात आहे.
Published 23-Jun-2017 18:21 IST
गडचिरोली - एका अल्पवयीन मुलीला वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून मित्राने बोलावले. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलीवर मित्रासह ४ तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. उल्लेखनीय म्हणजे एका मिसकॉलवरुन पीडितेची या नराधमाशी ओळख झाली होती.
Published 23-Jun-2017 11:29 IST | Updated 13:31 IST
गडचिरोली - आरमोरीच्या भाजप आमदाराच्या अंगरक्षकाने शुक्रवारी कार्यालयासमोर आत्महत्या केली. या अंगरक्षकाने सर्व्हिस रिव्हॉलव्हरने स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Published 23-Jun-2017 08:50 IST | Updated 09:39 IST
गडचिरोली - अहेरी वरून नागपूरला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे स्टेयरींग बिघडल्याने बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
Published 22-Jun-2017 19:22 IST
गडचिरोली - जिल्हा आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर तीन राज्यांच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालेश्वर मंदिरावर वीज कोसळली. मात्र भाविकांची गर्दी नसल्याने मोठी जीवीतहानी टळली आहे.
Published 20-Jun-2017 22:20 IST
गडचिरोली - मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे एका विवाहित महिलेवर घरात घुसून बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री नराधमाने पीडितेवर बलात्कार केला व महिलेने प्रतिकार केल्याने आरोपीने तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली असून पीडितेवरही हल्ला केला आहे.
Published 19-Jun-2017 11:41 IST | Updated 19:49 IST
गडचिरोली - पेदोडीच्या जंगलात महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जहाल माओवादी कमांडर शर्मिला पोटावी व इतर २ माओवादी ठार झाले आहेत. शर्मिला पोटावी हिच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते.
Published 18-Jun-2017 19:24 IST
गडचिरोली - जहाल महिला माओवाद्यासह दोन महिला माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सोनी कोवासे असे आत्मसमर्पण केलेल्या महिला माओवाद्याचे नाव आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे.
Published 18-Jun-2017 18:47 IST | Updated 19:08 IST
गडचिरोली - जहाल माओवादी पवन उर्फ सोमा वेलादी (३५) याने महाराष्ट्र-छत्तीसगड-ओरिसा राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याच्या कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. अखेर त्याला जेरबंद करण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
Published 18-Jun-2017 10:43 IST
गडचिरोली - एटापल्ली येथे दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले. यातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Published 17-Jun-2017 17:55 IST
गडचिरोली - वर्दीतल्या माणसाने खाकीपलीकडे जाऊन दाखवलेली माणुसकी आपण अनेकवेळा पाहिली आहे. पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती शहराला आली आहे. रक्ताचा पुरवठा कमी असल्याने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह हजारो पोलिसांनी रक्तदान करुन तो तुटवडा भरुन काढला. जमा झालेले रक्त सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस विभागाचे कौतुक होत आहे.
Published 17-Jun-2017 11:03 IST | Updated 12:00 IST
गडचिरोली - दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने शाळेच्या ३ मजली इमारतीवरुन उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 15-Jun-2017 12:11 IST
गडचिरोली - दहावीचा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८५. ४९ टक्के इतका लागला आहे. भामरागडसारख्या सर्वाधिक मागास तालुक्यात असलेल्या डॉ. प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी आश्रमशाळेचा निकाल ८४ टक्के लागला आहे.
Published 13-Jun-2017 22:36 IST
गडचिरोली - आदिवासी आणि नक्षलग्रस्त मानल्या जाणारा गडचिरोली जिल्हा एसएससीच्या निकालात नागपूर विभागात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल विभागात सर्वाधिक असून तो ८५. ४९ टक्के एवढा लागला आहे. तर जिल्ह्यातील ३५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
Published 13-Jun-2017 21:01 IST | Updated 21:26 IST

video playस्टेयरींग बिघडल्याने बसचा अपघात, ९ जखमी
स्टेयरींग बिघडल्याने बसचा अपघात, ९ जखमी

आता डेंग्यू, चिकनगुनियास कारणीभूत डास होतील नामशेष
video playअतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन
अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन

video play२५ ऑगस्ट रोजी येतोय
२५ ऑगस्ट रोजी येतोय 'बाबूमोशाय बंदूकबाज' !