• अंतरिम वेतनवाढ किती द्यायची याचा निर्णय तीन आठवड्यात घेण्याचे सरकारला निर्देश
  • तोडग्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरिय समिती नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर - मुंबई हायकोर्ट
  • संप ताबडतोब मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Redstrib
चंद्रपूर
Blackline
चंद्रपूर - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व तयारी करण्यात आली असून, तगडा बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे.
Published 05-Sep-2017 09:38 IST
चंद्रपूर - तळोधी येथील जंगल परिसरात मोहफुलापासून दारू तयार करण्याचे काम सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड मारत हा अड्डा उद्ध्वस्त केला.
Published 05-Sep-2017 09:38 IST
चंद्रपूर - तेलंगाणातून राज्यात तस्करी होत असलेला ६० हजार रुपये किमतीचा गांजा विरूर पोलिसांनी तपासणी नाक्यावर पकडला आहे. या कारवाईत पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.
Published 04-Sep-2017 17:23 IST | Updated 17:27 IST
चंद्रपूर - मंगळवारी होत असलेल्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दारूची आवक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने १५ लाखांची दारू रात्री एका वाहनातून पकडली. चंद्रपूरजवळील पडोली येथे ही कारवाई करण्यात आली.
Published 04-Sep-2017 10:02 IST
चंद्रपूर - गणेश विसर्जनादरम्यान घडलेल्या अपघातात ट्रॅक्टरने जमावाला चिरडले. यात एका मुलीचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले. यापैकी अनेक जण गंभीर आहेत. ही घटना वायगाव येथे रात्री ८ च्या सुमारास घडली. मनिषा कन्नाके (१६) असे या घटनेतील मृत मुलीचे नाव आहे.
Published 04-Sep-2017 07:00 IST | Updated 07:19 IST
चंद्रपूर - चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकान फोडून चक्क सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मशीनही पळविल्याची घटना घडली. या चोरांनी 'प्रतिक मोबाईल शॉपी' हे दुकान फोडून रोख रकमेसह विविध कंपन्यांचे जवळपास २० ते २५ लाखांचे मोबाईल लंपास केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे व्यापारीवर्गात घबराहटीचे वातावरण पसरले आहे.
Published 02-Sep-2017 21:03 IST
चंद्रपूर - जिल्ह्यात दारुबंदी होऊन २ वर्षे उलटली. मात्र, दारूचा ओघ अजूनही कायम आहे. यामुळे त्रासून वहानगाव येथील ग्रामसभेने दारू रितसर विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा ठराव एकमताने पारित करून शासनालाच आव्हान दिले आहे. अशा प्रकारचा वेगळा ठराव घेणारी कदाचित ही पहिली ग्रामपंचायत असावी. या ठरावामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
Published 02-Sep-2017 19:12 IST | Updated 19:13 IST
चंद्रपूर - मुलांना संधी मिळाली की ते आपल्या अंगभूत कलागुणांचा किती उत्तम आविष्कार घडवू शकतात, याचा प्रत्यय चंद्रपुरात आला. चंद्रपूर येथील बांबू प्रशिक्षण केंद्राने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ११० विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वांनी आपल्या मनातील बाप्पाची मूर्ती बांबूपासून साकारली.
Published 01-Sep-2017 22:59 IST
चंद्रपूर - वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द येथे शार्ट सर्कीटने गोठ्याला आग लागली. या आगीमध्ये सहा जनावरे होरपळली असून मृत्यूशी झुंज देत आहेत. आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.
Published 01-Sep-2017 14:35 IST
चंद्रपूर - आपल्या ग्राहकाला निकृष्ट दर्जाचा सोफा देणे भारत कुलर्सच्या मालकाला चांगलेच महागात पडले. ग्राहकाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेतली असता न्यायालयाने दुकानाचे मालक सुनील तन्नीरवार यांना १० हजारांचा दंड ठोठावला आहे.
Published 01-Sep-2017 14:31 IST
चंद्रपूर - नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण वाढू नये, यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने कृत्रिम टाक्यांची व्यवस्था केली आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसादही लाभत आहे.
Published 31-Aug-2017 22:40 IST
चंद्रपूर - भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, विद्युत दिव्यांची रोषणाई यामुळे चंद्रपूरचा राजा सध्या भक्तांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला आहे. १७ वर्षांपूर्वी 'चंद्रपूरचा राजा' हे नाव देऊन दीपक बेले या भाविकाने य बाप्पांची स्थापना केली होती.
Published 31-Aug-2017 21:13 IST
चंद्रपूर - ज्या प्लास्टीक कचऱ्याने मुंबईची तुंबई केली. त्याच प्लास्टीकची शास्त्रीय विल्हेवाट लावून त्यापासून आकर्षक अशा सार्वजनिक वापराच्या वस्तूंची निर्मिती चंद्रपुरात केली जाते. शहरातून रोज गोळा होणाऱ्या प्लास्टीक कचऱ्याचा वापर करून टिकाऊ वस्तू निर्माण करणारी चंद्रपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली असल्याचा दावा केला जात आहे.
Published 31-Aug-2017 19:25 IST
चंद्रपूर - जिल्ह्यातील दुर्गम अशा पाटण गावात मोठा शौचालय घोटाळा उघड झाला आहे. या गावात चक्क ११२ शौचालये कागदोपत्री बांधलेली दिसत असताना वास्तवात मात्र एकही शौचालय आढळत नसल्याचे समोर आले आहे.
Published 29-Aug-2017 21:22 IST

video playराज्य आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर - अजित पवार

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव