• नवी दिल्ली - जिनपिंग यांच्याशी खास चर्चेसाठी आज पंतप्रधान जाणार चीन दौऱ्यावर
  • नाशिक - शिवसेनेत अंतर्गत वाद, राऊतांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची दांडी
  • लातूर - संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना दिला कचरा भेट
  • अकोला - संभाजी ब्रिगेडकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड
  • मुंबई - कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या विकासाचा मार्ग मोकळा - बडोले
  • नवी दिल्ली - लोकांनी खरे संत आणि भोंदू यांच्यात फरक करावा - अशोक गेहलोत
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये राजकीय कार्यकर्त्याची हत्या
  • नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
Redstrib
चंद्रपूर
Blackline
चंद्रपूर - जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात ठणठणाट आहे. या सर्व प्रकल्पांत सरासरी १४. ९६ टक्केच साठा शिल्लक आहे. महाऔष्णिक वीजकेंद्र आणि चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ ११.६५ टक्के साठा शिल्लक आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांचा आढावा घेतला असता येत्या दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published 29-Mar-2018 17:31 IST
चंद्रपूर - दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी देण्यात आलेल्या निधीतून एक पैसाही महापालिकेने खर्च केला नाही. यामुळे बुधवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोधकांनी निषेधाचे फलक झळकावून सभात्याग केला.
Published 29-Mar-2018 07:53 IST
चंद्रपूर - सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलांनी शाळेची भिंत ओलांडून पळून जात फोनवरुन पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने थोडी शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
Published 28-Mar-2018 09:12 IST
चंद्रपूर - केवळ चार रुपयांच्या करासाठी चंद्रपूर महानगपालिका एका नागरिकाला सातत्याने मेसेज पाठवत आहे. मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्यानंतरही त्यांना जप्तीचा इशारा देणारा मेसेज पाठवला जात असल्याने महापालिकेचा कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते. या प्रकारामुळे महापौरांवर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढवली आहे.
Published 27-Mar-2018 21:48 IST | Updated 21:56 IST
चंद्रपूर - कपडे वाळत घालत असताना पत्नी विद्युत तारेला चिटकली असता तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीचा मृत्यू झाला. भद्रावती शहरातील विजासन भागात सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. पुंडलिक बेलेकर (वय ७०) असे मृताचे नाव आहे.
Published 27-Mar-2018 20:40 IST
चंद्रपूर - चूल, कोळशाचा स्वयंपाकासाठी वापर करणाऱ्या कुटुंबाला श्वसनाच्या विविध आजारांना सामोर जावे लागते. यातून सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधानांनी उज्ज्वला ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. मात्र अनुदानाअभावी जिल्ह्यातील हजारो लाभार्थी पुन्हा चुलीवरच परतले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Published 27-Mar-2018 13:09 IST | Updated 13:43 IST
चंद्रपूर - रयतवारी कोळसा खाणीतील कोळसा वाहून नेणाऱ्या लोडींग बेल्टला मोठी आग लागली. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published 27-Mar-2018 08:40 IST
चंद्रपूर - वरोराच्या चिमूर मार्गावरील एटीएमला हॅक करुन तब्बल २३ लाख रुपये पळवल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी समोर आला. याबाबतची तक्रार वरोरा पोलिसांना देण्यात आली असून, यात बँकेचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा हात तर नाही? या दिशेने देखील तपास सुरू करण्यात आला आहे.
Published 27-Mar-2018 07:17 IST
चंद्रपूर - शहराजवळील लोहारा जंगलात लागलेल्या भीषण वणव्यामध्ये मोठी वनसंपदा जळून खाक झाली आहे. हा वणवा आता दूरवर पसरला आहे. प्रादेशिक जंगलात लागलेल्या या वणव्याने वन्यजीवांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
Published 26-Mar-2018 18:56 IST
चंद्रपूर - पोलीस मुख्यालयात पोलिसाच्या बंदुकीतून गोळी सुटून २ पोलीस जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास परेडची तयारी करत असताना ही घटना चंद्रपुरात घडली आहे. या घटनेमध्ये शंकर चौधरी आणि पुरुषोत्तम येरमे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
Published 26-Mar-2018 08:57 IST | Updated 09:00 IST
चंद्रपूर - रामनवमीनिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय आणि 'चला पोहायला मित्र' परिवाराच्यावतीने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार वर्षांपासून ते पन्नास वर्षांपेक्षा अधिक अशा सात गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
Published 25-Mar-2018 21:13 IST
चंद्रपूर - न्यायालयीन कोठडी दरम्यान वैद्यकीय उपचार घेणारा आरोपी फरार झाला आहे. हा आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. सूरज आंग्रे असे या आरोपीचे नाव आहे.
Published 24-Mar-2018 19:59 IST | Updated 20:02 IST
चंद्रपूर - जागतिक जलदिनानिमित्त चंद्रपुरात गुरुवारी विविध संघटनांचे वेगवेगळे उपक्रम बघायला मिळाले. इको-प्रो या संस्थेने पाण्याचे मोल सांगण्यासाठी जनजागृती केली. तर इरई बचाव जनआंदोलनच्या कार्यकर्त्यांनी नदी वाचवण्यासाठी पदयात्रा काढून नदीपात्रामध्ये बैठा सत्याग्रह केला. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही संघटनांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले.
Published 23-Mar-2018 12:58 IST
चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळ डोमा बिटमध्ये आज दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बुधवारी याच परिसरात एका बिबट्याचा मृत्यू वाघाच्या झुंजीत झाला होता. तर त्यापूर्वी ताडोबातही एक बिबट्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला होता. सलग तीन दिवसांमध्ये ३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.
Published 22-Mar-2018 22:32 IST

video play
'कॅटफाईट'बद्दल काय म्हणाली रिचा चढ्ढा