• नवी दिल्ली - दहशतवादमुक्त अफगाणिस्तान हे दोन्ही देशांचे स्वप्न -पंतप्रधान
  • नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे - राहुल गांधी
  • नवी दिल्ली - नीरव मोदीचे बेल्जियमस्थित घर अखेर सापडले, 'तो' अद्याप फरारच
  • बुलडाणा - खामगाव शहरात आजपासून चार दिवस भव्य कृषी महोत्सव
  • पुणे - डीएसके दाम्पत्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
  • नवी दिल्ली - कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ कुटुंबासह दिल्लीत दाखल
  • जालना - दहीगव्हाण येथे गावातील विद्युत खांबावर प्रवाह उतरल्याने एकाचा मृत्यू
Redstrib
चंद्रपूर
Blackline
चंद्रपूरचा - चंद्रपूरचा वडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि चिमूरचा घोडा अशी चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन ओळख. यातील वडा आणि जोडा काळाच्या ओघात अस्तंगत झाले असले तरी चिमूरचा घोडा अर्थात श्रीहरी बालाजी देवाची वार्षिक घोडा यात्रा आपले अस्तित्व आजही टिकवून आहे. वसंतपंचमीपासून चिमूर शहरात सुरु झालेल्या या यात्रेने ३९१ वर्षांची दिमाखदार परंपरा पुढच्या पिढीसाठी कायम राखली आहे.
Published 30-Jan-2018 10:21 IST
चंद्रपूर - जंगलात रानडुकराची शिकार केल्यानंतर मांस कापत असताना वनविभागाने छापा टाकून ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शहरातील अष्टभुजा वॉर्डात वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी केली.
Published 30-Jan-2018 08:58 IST
चंद्रपूर - राज्य सरकारने न्यायालयीन प्रकरणातील कोर्ट फी वाढवल्याने वकिलांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, आज चंद्रपुरात सर्व वकिलांनी न्यायालयापुढे निदर्शने केली आहेत. न्यायालय शुल्क वाढवून राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड लादला आहे. न्यायालय फीमध्ये केलेल्या वाढीचा फटका सामान्य जनता तसेच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना बसणार असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.
Published 29-Jan-2018 21:35 IST
चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीत मशीनच्या बेल्टमधून अडकून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही मशीन तांत्रिक बिघाडामुळे अचानक सुरू झाली होती. अरुणकुमार रामेश्वर सिंग (३२) असे मृत कामगाराचे नाव आहे.
Published 27-Jan-2018 22:57 IST
चंद्रपूर - आज ६९ वा प्रजासत्ताक दिन चंद्रपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Published 26-Jan-2018 11:41 IST
चंद्रपूर - मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे रिलायन्स कंपनीच्या दोन टॉवर्सला सील ठोकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी मनपाच्या जप्ती पथकाने ही कारवाई केली. या कंपनीवर तीन लाख २६ हजार रुपयांचा कर थकीत आहे.
Published 26-Jan-2018 09:42 IST
चंद्रपूर - ऐशो आराम आणि महागड्या वस्तू विकत घेण्यासाठी तसेच आपली हौस भागविण्यासाठी घरफोड्या करणारी बंटी-बबली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी या टोळीतील २ आरोपींना अटक केली आहे. चंद्रपूर गुन्हेशाखेच्या पथकाला रात्रीच्यावेळी ही टोळी संशयितरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
Published 25-Jan-2018 21:34 IST
चंद्रपूर - तुकूम युवा मित्रा मंडळ, चंद्रपूरद्वारा आयोजित ‘विदर्भ खासदार श्री‘ शरीर सौष्ठव स्पर्धा प्रचंड जल्लोषात चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडली. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते या शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन झाले.
Published 25-Jan-2018 11:28 IST
चंद्रपूर - पालक शिक्षकांच्या भरवशावर चिमुकल्यांना शाळेत पाठवितात. मात्र अशाच शिक्षिकेने अवघ्या बालवाडीत इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे डोक्यावरील केस उपटत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना माऊंट कारमेल कॉन्व्हेंटमधील केजी-२ या वर्गात घडली आहे. मल्लिका सरकार असे चिमुरडीला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Published 24-Jan-2018 22:47 IST
चंद्रपूर - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४५ शाळा पटसंख्या कमी असल्यामुळे बंद केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलन केले. शालेय गणवेशात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे.
Published 23-Jan-2018 12:22 IST
चंद्रपूर - सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बहुतेक गावांमध्ये वाघाची दहशत पसरली होती. वाघ जंगल सोडून गावामध्ये येत असल्याने तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र आज सकाळी मेंढा - चारगाव रस्त्याच्या शेतशिवार परिसरात टी-२३ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागाची झोप उडाली.
Published 23-Jan-2018 12:14 IST | Updated 12:21 IST
चंद्रपूर - चिमुर तालुक्यातील सरडपार गावात शेतात कापूस वेचत असताना वाघाने अचानक हल्ला करुन महिलेला गंभीर जखमी केले. रुखमा विठोबा रंदये (वय ६५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
Published 23-Jan-2018 09:51 IST
चंद्रपूर - जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने एक मोठा निर्णय सुनावला आहे. ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिवांसह एकूण नऊ जणांना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Published 23-Jan-2018 08:45 IST
चंद्रपूर - संत कोंडय्या महाराज यात्रा महोत्सवाची आज गोपालकाल्याने सांगता झाली. संत कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्सवात पार पडला. यावेळी हजारो भक्त अनवाणी पायाने अग्निकुंड प्रभावळीतील निखाऱ्यावरून चालले.
Published 22-Jan-2018 19:11 IST

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

हे उपाय तुम्हाला ठेवतील किडनी स्टोनपासून दूर
video playसर्वोपयोगी काजू, पाहा काय आहेत औषधी फायदे
सर्वोपयोगी काजू, पाहा काय आहेत औषधी फायदे
video playहृदयविकारावर उपयुक्त आहे व्हिटॅमिन डी ३
हृदयविकारावर उपयुक्त आहे व्हिटॅमिन डी ३

video play"माझ्या काळात तू का आली नाहीस ! का ?" - ऋषी कपूर
"माझ्या काळात तू का आली नाहीस ! का ?" - ऋषी कपूर
video playआशाताईंना पाहून रेखा यांच्या भावना उफाळून आल्या
आशाताईंना पाहून रेखा यांच्या भावना उफाळून आल्या