• अंतरिम वेतनवाढ किती द्यायची याचा निर्णय तीन आठवड्यात घेण्याचे सरकारला निर्देश
  • तोडग्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरिय समिती नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर - मुंबई हायकोर्ट
  • संप ताबडतोब मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Redstrib
चंद्रपूर
Blackline
चंद्रपूर - वादाच्या भोवऱ्यात अडकलेला गोसीखुर्द प्रकल्प जिल्ह्यातील भात शेतीसाठी वरदान ठरला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे भात शेती धोक्यात आली होती. मात्र, धरणाचे पाणी कालव्यातून आणल्यामुळे सुमारे ३० हजार हेक्टर शेती ओलीताखाली आली आहे.
Published 05-Oct-2017 22:42 IST
चंद्रपूर - राजुरा तालुक्यात पोवनी आणि साखरी येथील वेस्टर्न कोलफिल्डसच्या कोळसा खाणीत अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार साखरीचे तलाठी विनोद खोबाग्राडे यांनी पोलिसांत दाखल केली आहे. शेतसारा, सीमांकन शुल्क मिळून एकूण सहा कोटींची रक्कम वेकोली कंपनीने भरलेली नाही.
Published 02-Oct-2017 18:31 IST
चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या रानतळोधी या गावाच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या या पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत येथील नागरिकांचे जीवन मात्र अंधारात आहे. वन्य प्राण्यांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन त्यांना जगावे लागत आहे.
Published 30-Sep-2017 14:39 IST
चंद्रपूर - दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोड्या करणाऱ्या दोन बालगुन्हेगारांना दुर्गापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान अनेक घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.
Published 29-Sep-2017 09:43 IST
चंद्रपूर - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी खोब्रागडे यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ही घटना काँग्रेसची बदनामी करणारी असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Published 26-Sep-2017 22:40 IST | Updated 22:47 IST
चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील बिबी गावातील सर्पमित्र मागील पंधरा वर्षांपासून साप पकडतो. पकडलेल्या सापाने चावा घेऊ नये, म्हणून तो त्याच्या तोंडावर चक्क चिकटपट्टी लावतो. यामुळे सापाच्या तोंडाला तसेच डोळ्याला गंभीर इजा होते. स्वत:ला सर्पमित्र म्हणविणाऱ्याकडूनच होत असलेल्या अशा हेळसांडीमुळे सापांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Published 26-Sep-2017 19:21 IST
गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील घोटसूर गावातील जंगलात 'टिंग टिंग गोटा' नावाने ओळखला जाणारा दगड आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर दुसऱ्या कोणत्याही दगडाने किंवा लोखंडी वस्तूने मारा केल्यानंतर एखाद्या मंदिरातील घंटीचा नाद ऐकू यावा तसा या दगडातून आवाज येतो. या दगडातून टिंग टिंग असा आवाज येत असल्याने टिंग टिंग दगड असे नाव येथील गावकऱ्यांनी दिले आहे.
Published 26-Sep-2017 14:44 IST
चंद्रपूर - शहरातील वीज केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ ३४ टक्के म्हणजेच ६४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. याचा वापर नियोजनबद्ध केला तरच ते पुढील पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे. यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published 26-Sep-2017 13:20 IST
चंद्रपूर - जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून काही रिसोर्ट मालकांनी ऑनलाईन बुकिंगमध्ये काळाबाजार सुरू केला होता. यामुळे सतर्क होत ताडोबा व्यवस्थापनाने काही कठोर निर्णय प्रस्तावित केले आहेत. यात तिकिटासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव आहे.
Published 26-Sep-2017 12:49 IST
चंद्रपूर - चिमुर तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकऱ्यांच्या तलाव बांधकामाकरिता संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला मिळवण्यासाठी लढा सुरू होता. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. डोंगर्लावासींना न्याय मिळाला असून त्यांना त्यांच्या संपादित जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश वाटप करण्यात आले.
Published 25-Sep-2017 17:40 IST
चंद्रपूर - एकाच गावाचे कार्यक्षेत्र दोन तालुक्यात विभागले गेल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पूर्वी जिवती तालुक्यात असलेले कारगाव (बू) हे गाव आता कोरपना तालुक्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामासाठी मोठे अंतर कापावे लागत आहे.
Published 25-Sep-2017 15:48 IST
चंद्रपूर - बल्हापुरातील भव्य गोंडकालीन किल्ला आजही आपल्या इतिहासाची साक्ष देतो. सहा एकरात पसरलेल्या या किल्ल्याचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. किल्ल्याचा आतील राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. मात्र, ते राजवाडा पुर्णपणे जमीनदोस्त करू शकले नाही. त्याच्या खुणा आजही ठळकपणे दिसत आहेत. राजवाड्यातील तबेला, विहिर बऱ्यापैकी आपले अस्तित्व टिकवून आहे. किल्ल्याला लागून वर्धा नदीचे पात्र आहे. एकंदरीत हाMore
Published 24-Sep-2017 22:50 IST
चंद्रपूर - येथील कोरपना पोलीस स्टेशनमध्ये रविवारी एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Published 24-Sep-2017 17:45 IST
चंद्रपूर - शहरातील लालपेठ परिसरात २२ सप्टेंबरला एका घरात चोरी झाली होती. याची तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी २४ तासाच्या आत एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील एलसीडी टीव्ही व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Published 24-Sep-2017 15:31 IST

video playराज्य आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर - अजित पवार

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव