• उस्मानाबाद :उमरगा-कवठा येथील लहान मुलीसह ३२ वर्षीय महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल
  • पुणे : हिंजवडीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एका मुलीचा मृत्यू
  • लातूर : हजारो महिलांच्या उपस्थितीत महाआरती करत पावसासाठी गणरायाकडे साकडे
Redstrib
चंद्रपूर
Blackline
चंद्रपूर- येथील विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना श्यामकुळे यांचे जावई डॉ. सोनेकर यांच्या मनमानी कारभारामुळे ते अनेकदा चर्चेत आले आहेत. चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह सहकारी, कर्मचारी नेहमी त्यांना दचकूनच असतात, असाही आरोप त्यांच्यावर होत आलेला आहे. या करभाराविरोधात आता प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक यांनी आता थेट आवाज उठविला आहे.
Published 19-Sep-2018 23:26 IST
चंद्रपूर - जिल्ह्यातील भद्रावती येथे नजरेस पडलेल्या वाघाचा संचार आता वरोरा तालुक्यात सुरू झाला आहे. या वाघाने वनविभागाला जेरीस आणले आहे. ११ दिवसानंतरही या वाघाचा प्रवास वेगवेगळ्या भागांत सुरुच आहे. या वाघाला जंगलात पिटाळून लावण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींचा मुक्काम वरोरा तालुक्यातील आसाळा येथे आहे.
Published 19-Sep-2018 14:15 IST
चंद्रपूर- ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी येथील रहिवासी अनिल सागर राऊत (१०) शेळ्या चारायला गेला असता कालव्याच्या पाण्यात तोल गेल्याने पडला व वाहत्या पाण्यात वाहत जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ४ वाजता घडली.
Published 18-Sep-2018 21:37 IST
चंद्रपूर - युवतीने धारदार चाकूने एका युवकावर सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. रात्री नागभीड येथील भर रस्त्यावर हा थरार घडला. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला तर झटापटीत युवतीसुद्धा जखमी झाली आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Published 18-Sep-2018 13:58 IST | Updated 16:59 IST
चंद्रपूर - सर्वोच्च न्यायालयाने माना जमातीला जात वैधता प्रमाणपत्र द्यावे, असा आदेश दिला आहे. मात्र, दाखला घेण्यासाठी गेल्यानंतर अधिकारी टाळाटाळ करतात. या विरोधात माना जमात संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
Published 18-Sep-2018 10:34 IST
चंंद्रपूर - नाकोडा येथील अंगणवाडीत मुलांना अळ्यायुक्त पोषण आहार दिला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अंगणवाडी केंद्र क्रमांक ५ व ८ मध्ये हा प्रकार झाला.
Published 18-Sep-2018 09:58 IST | Updated 13:19 IST
चंद्रपूर - १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. मात्र राजुरा उपविभागातील जनता स्वतंत्र झाली नव्हती. एकीकडे स्वातंत्र्याची पहाट, तर दुसरीकडे रझाकारांचा जुलमी छळ अशी अवस्था येथील जनतेची होती. या राजवटीतून मुक्ती मिळविण्यासाठी राजुरावासियांना तब्बल तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ ला निजामशाहीचा अस्त झाला. हाच दिवस राजुरा मुक्तिदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Published 17-Sep-2018 18:28 IST
चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहेत. महापाषाण युगातील हे शिलावर्तुळ 3 हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या भागात अश्मयुगातील सूक्ष्म हत्यारे सापडली आहेत. त्यामुळे महापाषाण युगात गोंडपिपरी तालुक्यात मानव जातीचा मोठ्या प्रमाणात अधिवास असल्याचे समोर आले आहे.
Published 16-Sep-2018 23:32 IST
चंद्रपूर - जात वैधता नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी माना जमातीच्या आदिवासी समाजाने केली आहे. माना जमातीचे जात वैधता प्रमाणपत्राअभावी आर्थिक, मानसिक, शैक्षणिक नुकसान होत आहे.
Published 16-Sep-2018 20:46 IST
चंद्रपूर - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण भटकावे लागते. रक्ताअभावी कित्येक जीव गेल्याचे हे रुग्णालय साक्षी आहे, अशी कुख्याती असलेल्या रुग्णालयात गर्भवती महिलेला तत्काळ रात्री १२ वाजता रक्त उपलब्ध झाले. रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच रुग्णालयात दाखल होत चंद्रपुरचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरजी रेड्डी यांनी रक्तदान केले.
Published 16-Sep-2018 11:33 IST
चंद्रपूर - महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमे अंतर्गत अहिर यांनी झरपट नदीची स्वच्छता केली. ही स्वच्छता मोहीम पंधरा दिवसापर्यंत राबवण्यात येणार आहे.
Published 16-Sep-2018 00:01 IST | Updated 00:07 IST
चंद्रपूर - जिल्ह्यातील माजरी परिसरात अल्पवयीन प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Published 15-Sep-2018 23:52 IST | Updated 00:01 IST
चंद्रपूर - केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेने तहसील कार्यालयावर दुचाकी वाहने ढकलत मोर्चा काढला.
Published 14-Sep-2018 20:35 IST
चंद्रपूर - ज्येष्ठ नागरिकांकरिता देशातील पहिल्या शुश्रूषा केंद्राचे लोकार्पण जिल्ह्यातील मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
Published 14-Sep-2018 15:31 IST

प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस गळतीचे वाढतेय प्रमाण
video playअननस खाण्याचे
अननस खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?