• रायगड-नळपाणी योजनेवरून झालेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे-नगराध्यक्ष राहुल पंडीत
  • पुणे-जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो,तरी नाझरे धरणात केवळ २० टक्के जलसाठा
  • डॉ.विलास भाले यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
  • ठाणे-सर्व्हर हॅक करून एमआयडीसीतील कंपनीकडे १ हजार डॉलर्सच्या खंडणीची मागणी.
  • ठाणे- कुत्र्याला दगड मारल्याच्या वादातून त्रिकूटाच्या हल्ल्यात तरूण जखमी
  • ठाणे- टिटवाळ्यात १८ वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या
  • अकोला-देऊळगाव बाळापूर मार्गावर ट्रक व झायलोचा अपघात, एक ठार सहा जखमी
  • पालघर-विक्रमगड येथे शिवसेनेचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न.
  • पुणे-आशापुरा मातेची मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिकांच्या हस्ते आरती, नवचंडी यज्ञ
  • पुणे-जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार-पालकमंत्री गिरीश बापट
Redstrib
बुलडाणा
Blackline
बुलडाणा - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी कर्जमाफीचा प्रत्यक्षदर्शी किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला ? बँकेने त्या शेतकऱ्यांच्या यादया प्रसिद्ध करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील पाडळी येथील सेंट्रल बँक शाखेवर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
Published 10-Jul-2017 20:08 IST
बुलडाणा - भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त आदेशान्वये नवमतदारांसाठी १ जुलै ते ३१ जुलै २०१७ दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये वय १८ ते २१ वर्ष वयोगटातील तरुण आणि पात्र प्रथम मतदारांची मतदार नाव नोंदणी करण्यात येणार आहे. काही कारणास्तव मतदार यादीत समावेश न झालेल्या तरुण आणि पात्र प्रथम मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची ही सुवर्णसंधी आहे.
Published 08-Jul-2017 19:57 IST
बुलडाणा - शासनाकडून लेक वाचवा लेक शिकवा या उपक्रमाबाबत जनजागृती केली जाते खरी.. मात्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे जनतेच्या मनात अजूनही ही योजना रुजली नाही. माँ जिजाऊंच्या बुलडाणा जिल्ह्यात जुळ्या मुली झाल्या आणि तिसरीसुद्धा मुलगीच होण्याच्या भीतीने सासरच्यांनी गरोदर सुनेला त्रास देऊन घरातून काढून दिले. याप्रकरणी विवाहितेने खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखलMore
Published 08-Jul-2017 15:39 IST | Updated 16:33 IST
बुलडाणा - सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषीपेक्षा पशुसंवर्धन क्षेत्राचा वाटा जास्त आहे. देशात नवव्या क्रमांकावर असलेला पशुसंवर्धन विभाग आता कार्यपद्धती, योजनांचे क्रियान्वयन याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाचे काम अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास निश्चितच हा विभाग देशात अन्य राज्यांच्या तुलनेत अव्वल क्रमांक मिळविणार आहे, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला.
Published 07-Jul-2017 22:41 IST
बुलडाणा - मध्यप्रदेश पोलिसांनी शेतकरी आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा खासदार राजु शेट्टी यांना अटक केली. याच्या निषेधार्थ गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले.
Published 07-Jul-2017 12:06 IST
बुलडाणा - शासकीय आदेशानुसार तूर खरेदीबाबत नोंदणी करून टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर अद्यापही खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी बुधवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.
Published 06-Jul-2017 10:21 IST
बुलडाणा - मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांचावर खोटे गुन्हे दाखल करून, खच्चीकरण करण्याचे सत्र पोलीस विभागाद्वारे सुरू आहे. अशा प्रकरे पत्रकारांवर बुलडाणा येथे खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने पोलीस प्रशासनाचा निषेध केला आहे.
Published 05-Jul-2017 16:45 IST

video playकाळ्या बाजारात जाणारा २० टन गहू जप्त
काळ्या बाजारात जाणारा २० टन गहू जप्त

हे तंत्र देईल अल्झायमर रोगापासून मुक्ती
video playही टेस्ट करेल दोन मिनिटांत कॅन्सरचे निदान
ही टेस्ट करेल दोन मिनिटांत कॅन्सरचे निदान