• रायगड-नळपाणी योजनेवरून झालेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे-नगराध्यक्ष राहुल पंडीत
  • पुणे-जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो,तरी नाझरे धरणात केवळ २० टक्के जलसाठा
  • डॉ.विलास भाले यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
  • ठाणे-सर्व्हर हॅक करून एमआयडीसीतील कंपनीकडे १ हजार डॉलर्सच्या खंडणीची मागणी.
  • ठाणे- कुत्र्याला दगड मारल्याच्या वादातून त्रिकूटाच्या हल्ल्यात तरूण जखमी
  • ठाणे- टिटवाळ्यात १८ वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या
  • अकोला-देऊळगाव बाळापूर मार्गावर ट्रक व झायलोचा अपघात, एक ठार सहा जखमी
  • पालघर-विक्रमगड येथे शिवसेनेचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न.
  • पुणे-आशापुरा मातेची मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिकांच्या हस्ते आरती, नवचंडी यज्ञ
  • पुणे-जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार-पालकमंत्री गिरीश बापट
Redstrib
बुलडाणा
Blackline
बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा येथील सरपंचपती यज्ञेश्वर मधुकर चेके यांचे औरंगाबाद येथे निधन झाले होते. निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले आहे.
Published 14-Aug-2017 10:04 IST
बुलडाणा - विद्युत वितरण कंपनीने १० ऑगस्ट रोजी बुलढाणा, खामगाव आणि मलकापूर विभागातील शहरी व ग्रामीण भागात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल १६२ विजचोऱ्या पकडल्या आहेत. एकाच दिवशी केलेल्या धडक कारवाईसाठी ४६ पथकांची नेमणूक करण्यात आली होती.
Published 12-Aug-2017 18:11 IST
बुलडाणा - राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान' राबविले जात आहे. या आभियानाच्या कामात हलगर्जीपणा करणार्‍या १७ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याची आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी हे आदेश दिले आहेत.
Published 12-Aug-2017 15:47 IST
बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
Published 09-Aug-2017 18:54 IST | Updated 13:10 IST
बुलडाणा - खामगाव शहरातील लायन्स क्लबच्यावतीने जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन देण्याचा कार्यक्रम राबवला आहे. या भोजनदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Published 08-Aug-2017 21:31 IST | Updated 13:12 IST
बुलडाणा - राज्याच्या राखीव पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणारे राहुल पवार हे ३ महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत. घरातील कर्त्या पुरुषाचा शोध लागत नसल्याने पवार कुटुंबीय हवालदिल झाले असून त्यांची उपासमार होत आहे.
Published 07-Aug-2017 18:02 IST | Updated 11:55 IST
बुलडाणा - शरीरास हानिकारक असलेल्या गुटख्यावर राज्यात २०१२ साली सरकारने बंदी घातली. तरी देखील बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या विशेष गुटखा विरोधी मोहीमेतंर्गत खामगाव पोलिसांनी २० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
Published 05-Aug-2017 13:44 IST
बुलडाणा - लोणार तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनावरच चोरट्यांनी हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. शारा गावाजवळ असलेल्या नंदनवन गोट फार्ममधून चोरट्यांनी १३ लाख रुपये किंमतीचे बोकड चोरी केले. यामुळे पशुधन सुरक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published 04-Aug-2017 17:52 IST
बुलडाणा - सातबारा आणि गाव नमुना नकल देण्यासाठी शेतकऱ्याकडून १ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केले. दीपक चव्हाण असे त्या लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो संग्रामपूर तालुक्यातील वरवट येथे कार्यरत आहे.
Published 04-Aug-2017 14:52 IST
बुलडाणा - शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज आणि विजबिल मुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Published 02-Aug-2017 10:54 IST
बुलडाणा - बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळा बाजार येथील एका नराधमाने गावातील ७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली. महादेव श्रीनाथ असे या आरोपीचे नाव आहे.
Published 31-Jul-2017 17:07 IST
बुलडाणा - गेल्या दोन महिन्यांपासून आषाढी एकादशीच्या वारीसाठी गेलेली ‘श्रीं’ची पालखी मंगळवारी शहरात परतली. या पालखीचे संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत करण्यात आले. संस्थानाचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या हस्ते हे स्वागत करण्यात आले.
Published 30-Jul-2017 22:04 IST
बुलडाणा - सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या मराठा पाटील युवक समितीच्या वतीने यावर्षी ११०० गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. खामगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार गरजू आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले आहे.
Published 29-Jul-2017 22:28 IST
बुलडाणा - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते शनिवारी चिखली नगरपालिकेच्या १० कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, या विकास कामांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे भाजपचा निषेध व्यक्त करत पालकमंत्री फुंडकर यांना शिवसेनेकडून काळे झेंडे दाखविण्यात आले.
Published 29-Jul-2017 22:29 IST

video playकाळ्या बाजारात जाणारा २० टन गहू जप्त
काळ्या बाजारात जाणारा २० टन गहू जप्त

हे तंत्र देईल अल्झायमर रोगापासून मुक्ती
video playही टेस्ट करेल दोन मिनिटांत कॅन्सरचे निदान
ही टेस्ट करेल दोन मिनिटांत कॅन्सरचे निदान