• पुणे - कोरेगाव भीमा : मिलिंद एकबोटे पोलीस ठाण्यात दाखल, चौकशी सुरू
 • पुणे - डीएसके दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत १ मार्चपर्यंत वाढ
 • सुकमा - नक्षलवाद्यांच्याबरोबर सुरक्षा दलांची चकमक सुरू
 • मुंबई - काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी
 • नवी दिल्ली - रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांची पटियाला हाऊस कोर्टात हजेरी
 • रांची - चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामिन फेटाळला
 • नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टीची
 • मुंबई - मध्यरेल्वेची वाहतूक ४० मिनीटांपासून ठप्प
 • ईडीच्या छाप्यात नीरव मोदीची अनेक परदेशी बनावटीची उंची घड्याळे जप्त
 • गोंदिया - खेळण्यातून वाद, अल्पवयीन मुलाने केला गळा आवळून खून
 • दानापूर - लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्ती माजी खा. सुभाष यादव यांच्या घरी छापे
 • नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात कॅनडाच्या पंतप्रधानांचे स्वागत
Redstrib
बुलडाणा
Blackline
बुलडाणा - खामगाव आगार प्रमुखांना औरंगाबाद येथून शिर्डी-हिंगणघाट बसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला. मात्र बस तेथे पोहोचली नव्हती. यानंतर त्यांनी चिखली आगार प्रमुखांना फोन केला आणि ही बस थांबण्याची सूचना केली. यानंतर सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. हा संपूर्ण प्रकार साडेचार वाजताच्या सुमारास घडला.
Published 23-Dec-2017 22:12 IST
बुलडाणा - गिरगाव चौपाटीवरुन शेगावला सी-प्लेनने येण्याचे आपले स्वप्न आहे. ते लवकरच प्रत्यक्षात येईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग बुलडाणा जिल्ह्यात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
Published 17-Dec-2017 19:18 IST | Updated 22:51 IST
बुलडाणा - राज्य सरकारने करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडत २०१२ मध्ये संपुर्ण राज्यामध्ये गुटखा बंदी केली. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने युवा पिढी बरबाद होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी गुटखाबंदीची मागणी करत शिवसेनेच्या वतीने प्रशासनाविरोधात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
Published 17-Dec-2017 11:57 IST
बुलडाणा - नोकरभरती करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने शासकीय कार्यालयातील नोकरीचा अनुशेष वाढला आहे. त्यामुळे एकीकडे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा आहे. तर, दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.
Published 17-Dec-2017 08:42 IST
बुलडाणा - शिक्षक पतीने चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार करून शिक्षक पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना सिंदखेड राजा येथे घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल सरोदे असे आरोपीचे नाव आहे.
Published 12-Dec-2017 20:05 IST
बुलडाणा - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आज सर्व पक्षीय जिल्हा विकास समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
Published 08-Dec-2017 11:36 IST
बुलडाणा – कंटेनर आणि बसचा भीषण अपघात होऊन कंटेनर चालक जागीच ठार झाला. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील येरळी पुलावर घडली. दरम्यान पुलावर बस अर्धवट लटकलेल्या अवस्थेत असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
Published 07-Dec-2017 17:37 IST | Updated 18:01 IST
बुलडाणा - एसटी बसमध्ये चढताना चाकाखाली आल्याने एका १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे घडली. यानंतर संतप्त ग्रामस्थानी एसटी बसच्या काचा फोडल्या.
Published 06-Dec-2017 19:45 IST
बुलडाणा - पोटच्या मुलीवर सतत २ वर्षे बलात्कार करणार्‍या नराधम बापास खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा आरोपीने एकाच वेळी भोगायची आहे.
Published 06-Dec-2017 18:15 IST
बुलडाणा - सावळी येथील विशाल नरवाडे या तरुणाने स्पर्धा परिक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. आयआयटी अभियंता असलेल्या विशालने घवघवीत पगाराची नोकरी न करता देशाची सेवा करण्याचा निर्णय घेत आयपीएस होण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याने यशही मिळवले.
Published 05-Dec-2017 14:23 IST
बुलडाणा - अपंग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने अनेक आंदोलने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोनवेळा बैठकही घेतली. मात्र, ढिम्म प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अपंगांची अवहेलना सुरूच ठेवली. त्यामुळे १९९५ च्या अपंग कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांसाठी आज ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार अपंगMore
Published 03-Dec-2017 21:36 IST
बुलडाणा - एका शेतकऱ्याकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने दुय्यम निबंधक नितिन खाकरे याला रंगेहात पकडले आहे. मोताळा तालुक्यातील वारुळी गावातील गट क्रमांक ५४ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीतील वारसांचे नाव कमी करण्यासाठी दुय्यम निबंधकाने शेतकऱ्याकडे पैशांची मागणी केली होती.
Published 03-Dec-2017 10:11 IST
बुलडाणा - देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही, तर नव्या पिढीला देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही. त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केली.
Published 01-Dec-2017 16:27 IST | Updated 16:59 IST
बुलडाणा - जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील ​मेंढळी या गावात एका २७ वर्षीय युवकाला जाळून ठार मारण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याचे प्रथम दर्शनी पोलीस तपासात उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.
Published 30-Nov-2017 14:53 IST

video playखामगाव शहरात आजपासून चार दिवस भव्य कृषी महोत्सव
खामगाव शहरात आजपासून चार दिवस भव्य कृषी महोत्सव

video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त

हे उपाय तुम्हाला ठेवतील किडनी स्टोनपासून दूर
video playसर्वोपयोगी काजू, पाहा काय आहेत औषधी फायदे
सर्वोपयोगी काजू, पाहा काय आहेत औषधी फायदे
video playहृदयविकारावर उपयुक्त आहे व्हिटॅमिन डी ३
हृदयविकारावर उपयुक्त आहे व्हिटॅमिन डी ३

video playअक्षयने अफगाणी मुलांसोबत केले
अक्षयने अफगाणी मुलांसोबत केले 'केसरी'चे शूटींग