• नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
 • नवी दिल्ली - ब्राह्मोस क्रूज मिसाईलची सुखोई -३० विमानातून यशस्वी चाचणी
 • भंडारा - तडिपार गुंडाचा महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला, तिघांना अटक
 • सांगली -घरकुल योजनांचे ७०% काम निकृष्ट दर्जाचे, गृहनिर्माण मंत्र्यांची कबुली
 • औरंगाबाद - सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करा - गिरीश बापट
 • चंद्रपूर - पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू
 • वाशिम - कर्जबाजारीपणामुळे खानापूरमध्ये शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
 • लाहोर - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याची नजरकैदेतून सुटका
 • नंदुरबार - प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर सामाजिक बहिष्कार
 • औरंगाबाद - मोदींना घरात घुसून मारेन, लालुंचे सुपुत्र तेजप्रताप यांची धमकी
 • पुणे - कोंढवामध्ये शेक देताना दुर्घटना, नवजात बाळ ७० टक्के भाजले
 • ठाणे - मित्राचा मृतदेह बाईकवरून तब्बल ६ किलोमीटर दूर नेवून फेकला
 • जगातील सर्वात वेगवान 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्राची हवाईदलाकडून यशस्वी चाचणी
 • लाहोर - २६/११ च्या पार्श्वभूमीवर सईदची आजच नजरकैदेतून सुटका
Redstrib
बुलडाणा
Blackline
बुलडाणा - सराफा दुकानातून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. या महिलेला न्यायालयात हजर केले असता, तिला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही घटना चिखली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या डीपी रोडवर घडली होती. या प्रकरणातील आणखी दोन महिला आरोपींचा शोध सुरू आहे.
Published 02-Nov-2017 14:27 IST
बुलडाणा - बदलत्या हवामान चक्रामुळे बळीराजा संकटात आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदील आहे. अशा संकटसमयी शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे मत कृषी, फलोत्पादन व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
Published 02-Nov-2017 13:37 IST
​बुलडाणा - तालुक्यातील पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अभय (वय ११) आणि गौरव (वय ७) जाधव अशी या दोघांची नावे आहेत.
Published 31-Oct-2017 14:08 IST
बुलडाणा - मोताळा तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रांना 'आयएसओ' मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे 'आयएसओ' मानांकन मिळविणारा मोताळा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे.
Published 29-Oct-2017 10:18 IST
बुलडाणा - यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस जरी पडला असेल तरी जलसाठे ओसंडून वाहतील, असा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सिंचन विभागाने पाणीसाठ्यातील पाण्याचा साठा लक्षात घेऊन लाभ क्षेत्रातील गावांमध्ये सिंचन न करण्याबाबत जागृती करावी. तसेच प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा,More
Published 28-Oct-2017 16:15 IST
बुलडाणा - राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंबांना पती-पत्नीच्या नावे दिली जाते. विधवा व परित्यक्त्या स्त्रीयांच्या बाबतीत जमीन त्या स्त्रियांच्या नावे केली जाते.
Published 28-Oct-2017 08:50 IST
बुलडाणा - सततची नापिकी, पावसाची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. शेतीला पाणी, वीज व खत असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनातून मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जेचा उपयोग केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वृद्धी होऊ शकते. त्याचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यात येत असून जिल्ह्यात अटल सौर कृषीपंप योजनेतंर्गत सौर उर्जेवर आधारीत जैन इरिगेशनMore
Published 28-Oct-2017 09:58 IST | Updated 10:05 IST
बुलडाणा - माहेरी आलेल्या पत्नीची दगडाने ठेचून पतीने निर्घृण हत्या केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात ही घटना घडली होती. हत्या केल्यानंतर फरार आरोपीस पोलिसांनी आज अटक केली.
Published 27-Oct-2017 17:56 IST | Updated 18:09 IST
बुलडाणा - रेशन दुकानदार हा संपूर्ण राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. या व्यवस्थेमध्ये स्वस्त धान्य वितरण दुकानदारांच्या समस्या सोडविण्याचे काम राज्य शासन करत आहे. संपूर्ण रेशनिंग व्यवस्थेचे संगणकीकरण करून ई-पॉस मशीनच्या माध्यमातून संपूर्ण धान्य वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या व्यवस्थतेतील काळाबाजार संपूर्णपणे थांबून भ्रष्टाचार संपविण्यात यश येईल, असा विश्वास राज्याचे अन्न वMore
Published 26-Oct-2017 22:57 IST
बुलडाणा - शिवसेनेच्यावतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. हा मोर्चा सोयाबीनला ५ हजार रुपये तर कापसाला ६ हजार रुपये हमीभाव द्या आदी मागण्यांसाठी काढण्यात आला.
Published 25-Oct-2017 18:14 IST
बुलडाणा - तालुक्यातील दहीद बुद्रुक या गावात जयहरी अशोक माऊली महाराज नावाचा भोंदू बाबा आहे. मी अनेक असाध्य आजार दूर करतो, असा दावा करून त्याने महाराष्ट्रातील अनेक गावात आपला दरबार आयोजित केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुलडाणा टीमने या बाबाच्या दरबाराची प्रत्यक्ष पाहणी करून जनतेसमोरच त्याची भांडेफोड केली. लोकांची फसवणूक करणाऱ्या या बाबावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंनिसने केलीMore
Published 24-Oct-2017 10:51 IST
बुलडाणा - सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र अद्यापही कायम आहे. थकीत कर्जाच्या विवंचनेतून ४० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. किशोर सीताराम भटकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते संग्रामपूर येथील रहिवासी होते.
Published 23-Oct-2017 07:05 IST
बुलडाणा - २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता सरकारने न केल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत, शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जामोद पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published 22-Oct-2017 16:30 IST | Updated 17:19 IST
बुलडाणा -​ राज्य शासनाने राज्यामध्ये आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गुटख्यावर बंदी घातली असली तरी देखील बुलडाणा जिल्ह्यामध्ये सर्रास व खुलेआम गुटख्याची विक्री केली जात आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यामध्ये करोडो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. आज पुन्हा चिखली येथे गुटख्यासह ८० लाखांचा मुद्देमाल चिखली पोलिसांनी जप्त केला.
Published 21-Oct-2017 12:43 IST


video playहिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी
हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी
video playतुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता आहे का ?
तुमच्या शरीरात प्रथिनांची कमतरता आहे का ?