• वाशिम : आईच्या हत्येप्रकरणी चिमुकलीचा जबाब; बाप संशयाच्या भोवऱ्यात
  • रत्नागिरी - निवडणुकीत जागा वाढविण्यासाठी भाजपवाले दंगलीही घडवतील - राज ठाकरे
Redstrib
बुलडाणा
Blackline
बुलडाणा - जळगाव जामोद येथील वनविभागाचे कार्यालय जळून खाक झाले. या आगीत महत्त्वाचे कागदपत्र जळाले असून मोठी हानी झालेली आहे. जवळच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत होती, परंतु कोणतीही जिवीतहानी न झाल्याने थोडक्यात मोठा धोका टळला. कार्यालयाच्या जवळच अग्निशमन दलाचा बंदोबस्त असतानाही दीड तास गाडी आलीच नाही.
Published 26-May-2018 17:26 IST
बुलडाणा - सिंदखेड जवळील दुसरबीड येथे दुपारच्या जेवणासाठी थांबले असताना ट्रकने अचानक पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परंतु ट्रक पूर्ण जळला असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
Published 26-May-2018 16:29 IST
बुलडाणा - मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसी परिसराच्या बिरला कंपनीसमोर शुक्रवारी मोठा अपघात झाला. यात मिनी ट्रॅव्हल्स बस आणि टिप्परमध्ये झालेल्या धडकेत तब्बल २५ ते २८ जण जखमी झाले आहेत.
Published 26-May-2018 08:11 IST
बुलडाणा - पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सिंदखेडराजा येथे रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने येथील पेट्रोल पंपाला काळे झेंडे लावून अनोखे आंदोलन केले.
Published 25-May-2018 18:19 IST
बुलडाणा - देशात झालेल्या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोटसायकलच्या प्रतिकृतीची प्रेतयात्रा काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला आहे.
Published 25-May-2018 08:38 IST
बुलडाणा - औषध उपचारासाठी गेलेल्या १० ते १२ जणांना मुदतबाह्य औषधाचे वाटप करण्यात आले. औषधे घेतल्यानंतर याचा त्यांना त्रास जाणवू लागला. तत्काळ त्यांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून, ३ रुग्णांची प्रकृत्ती गंभीर असल्याचे समजते.
Published 24-May-2018 14:54 IST | Updated 15:38 IST
बुलडाणा - जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागात यावर्षीपासून ऑनलाईन सरळ बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या अन्यायकारक असल्याचा आरोप ४०० शिक्षकांनी केला आहे. ही प्रक्रिया तात्काळ रद्द करुन नव्याने सर्व प्रकारची पडताळणी करुन बदल्या करण्यात याव्यात, यासाठी बुलडाणा जिल्हा परिषदेत ४०० महिला-पुरुष शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.
Published 23-May-2018 16:47 IST
बुलडाणा - महसूल विभागाने बोटीद्वारे होणारा बेकायदा रेती उपसा बंद केला. आता पुन्हा अवैध वाळू व्यावसायिकांनी अनोखा फंडा वापरत वाळूची चोरी सुरुच ठेवली आहे.
Published 10-May-2018 17:51 IST
बुलडाणा - संपूर्ण देशात रविवारी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा 'नीट' घेण्यात आली. ही परीक्षा बुलडाण्यातील १२ परीक्षा केंद्रांवर पार पडली. यादरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षार्थींची केंद्रावर कसून तपासणी करण्यात आली.
Published 07-May-2018 10:16 IST | Updated 12:19 IST
बुलडाणा - राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्येचा विचार करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Published 06-May-2018 21:47 IST
बुलडाणा - खामगांव येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. शुक्रवारी (४ मे) दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
Published 05-May-2018 13:01 IST | Updated 13:18 IST
बुलडाणा - जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहे. जिल्हा निबंधक कार्यालय, महसूल, आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून ही कारवाई करून संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
Published 04-May-2018 12:39 IST | Updated 14:26 IST
बुलडाणा - जिल्ह्यामध्ये गेल्या ७२ तासात विविध ठिकाणी अपघात होऊन ८ जण ठार झाले, तर ४० जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात अपघाताची एक प्रकारे मालिकाच सुरू असून, यात सर्वात जास्त अपघात हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर होत आहेत. त्यामुळे हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळाच बनला आहे.
Published 03-May-2018 13:00 IST
बुलढाणा - जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवरातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. यावार्षी पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने तब्बल १९ वर्षानंतर सरोवरातील सासू-सुनेची विहीर उघडी पडली आहे. १९ वर्षानंतर सदर विहिरीचे दर्शन झाल्याने ती पाहण्यासाठी पर्यटकांची सरोवरावर गर्दी होत आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील एका बाजूचे पाणी चवीला गोड तर दुसऱ्या बाजूचे खारट आहे.
Published 01-May-2018 09:30 IST | Updated 10:32 IST

मुदतबाह्य औषधे दिल्याने १२ रुग्ण अत्यवस्थ
video playऑनलाईन बदल्यांच्या विरोधात ४०० शिक्षकांचा ठिय्या
ऑनलाईन बदल्यांच्या विरोधात ४०० शिक्षकांचा ठिय्या

मोत्यांचे शहर हैदराबादमधील पर्यटन स्थळे..
video playइतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले
इतिहासाच्या पाऊलखुणा : किल्ले 'रायगड'

video playइअरफोन वापरताना
इअरफोन वापरताना 'ही' काळजी अवश्य घ्या
video playथायरॉईड आणि आहार
थायरॉईड आणि आहार