• पुणे- शार्दूल जाधव यांना 'अजित युवा पुरस्कार' जाहीर
  • पुणे- निगडी पोलिसांकडून पहाटे २ गुन्हेगारांना अटक, २ पिस्तूल जप्त
  • नागपूर- युग चांडक प्रकरण : अल्पवयीन आरोपी दोषी,आज निकाल
  • जम्मू-पठाणकोट रस्त्यावर अपघात, १ ठार तर २२ जण जखमी
Redstrib
भंडारा
Blackline
भंडारा - भंडारा नगरपरिषदेतील अपक्ष उमेदवार कल्पना राजकुमार व्यास यांचे पती राजकुमार व्यास यांनी काँग्रेस कार्यकर्ता रोशन दहेलकर यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. या प्रकरणी भंडारा जिल्हा काँग्रेसने तक्रार केल्यानंतर आरोपीस रात्री उशिरा अटक करण्यात आली.
Published 19-Jul-2017 22:20 IST
भंडारा - सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. भंडारा जिल्ह्यातही रात्रभर रिमझिम पाऊस बरसला. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. वैनगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे ५ दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत.
Published 18-Jul-2017 18:54 IST
भंडारा - मोहाडी तालुक्यात एका टँकरने बैलगाडीला दिलेल्या धडकेत बैलगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 17-Jul-2017 16:29 IST
भंडारा - कोणीही अनोळखी व्यक्ती फोन करून आधार कार्ड क्रमांक मागत असेल तर सावधान ? आधार कार्ड क्रमांक मागून बचत खात्यातून ६५ हजार रुपये काढल्याची घटना तुमसर तालुक्यातील येरली गावातून समोर आली आहे.
Published 15-Jul-2017 19:49 IST
भंडारा - शहरात पाणी प्रश्न पेटला असून नळाला येणारे गढूळ पाणी कसे प्यावे हा प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी भंडारा नगरपरिषद अध्यक्ष सुनील मेंढे यांना घेराव घातला. यात भाजप कार्यकर्त्यांमध्येच पाणी प्रश्नावरून आपसात मतभेद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Published 15-Jul-2017 08:04 IST
भंडारा - विहिरीत पडलेल्या उंदराला पाहून एका शाळकरी मुलाला दया आली. त्यामुळे उंदराला वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू असताना सापाने त्याला कडाडून दंश केला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यांतर्गत एकोडी गावात घडली. मृत मुलाचे नाव अंकित जगदीश खेडीकर असे आहे.
Published 14-Jul-2017 14:41 IST
भंडारा - शहरात १०० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय नव्याने तयार होणार आहे. याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये 'पोस्टरवार' सुरू झाले आहे. शहराच्या विविध ठिकाणी श्रेयवादाचे पोस्टर लागलेले दिसून येत आहेत. शिवाय दोन्ही पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपआपला हक्क सांगत आहे.
Published 13-Jul-2017 17:33 IST
भंडारा - पवनी तालुक्यातील कोढा कोसरा गावचे शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत उदयराम देशमुख यांचा मृतदेह गावच्या शिवारातील विहिरित संशयास्पद स्थितीत आढळला. विहिरीच्या बाजुलाच उभ्या असलेल्या त्यांच्या कॉलिस या चारचाकी वाहनाचे समोरचे काच फुटलेले असुन गाडीत आढळलेल्या रक्ताच्या डागावारुन त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Published 11-Jul-2017 18:08 IST
भंडारा - राज्यातील कर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, या मागणीसाठी आज शिवसेनेतर्फे राज्यभर जिल्हा बँके समोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
Published 10-Jul-2017 18:53 IST
भंडारा - पवनी तालुक्याच्या इटान गावातील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी पहिल्या वर्गात शिकणारा ५ वर्षीय चिमुकला चार तास शाळेतच कोंडून राहिला. प्रतीक पांचालवर असे या मुलाचे नाव आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रतीकवर ही वेळ आली.
Published 08-Jul-2017 11:54 IST
भंडारा - देव्हाडी गावात नागरिकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. अवैध कुक्कुटपालन केंद्र, अनियमित वीज पुरवठा, पाणीटंचाई या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारीही केल्या, तरीही काही करावाई करण्यात आलेली नाही. अखेर शिवसेनेने आज तुमसर-गोंदिया महार्गावर 'रास्तारोको' आंदोलन केले.
Published 07-Jul-2017 11:47 IST
भंडारा - नगरपरिषदेत पाणी शुद्ध करण्यासाठी लागणाऱ्या तुरटीचा साठा संपला आहे. त्यामुळे भंडारा शहरातील नागरिकांना तीन दिवसांपासून दूषित पाणी प्यावे लागत आहे.
Published 07-Jul-2017 11:37 IST
भंडारा - वैनगंगा नदीच्या पुलावरून जाणाऱ्या एका वृद्धाला भोवळ आल्यामुळे तो नदीत पडला. पावसामुळे नदीच्या पात्रात वाढ झाल्यामुळे तो वाचेल की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र त्याठिकाणी असलेल्या मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीने धाव घेत त्या वृद्धाला वाचविले. अडकोबा गाढवे, असे या ८३ वर्षीय वृद्धाचे नाव आहे.
Published 05-Jul-2017 08:57 IST
भंडारा - शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हा कार्यक्रम अमलात आणला. तसेच या माध्यमातून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामही होत आहे. मात्र असे असले तरीही गाळासोबत जमिनीतून गौण खनिज काढून ते विकण्याचा गोरखधंदा बेला ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. याची साधी चौकशीही झाली नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले आहे.
Published 04-Jul-2017 14:02 IST

video playदुधाच्या टँकरची बैलगाडीला धडक; एक ठार
video playउंदराला वाचवताना सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू
उंदराला वाचवताना सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू

सनी लिओनी