• सातारा- मल्हार क्रांतीच्या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेक
  • सांगली- सावंत प्लॉटमध्ये एकाची भरदिवसा गळा चिरुन हत्या, मोटारसायकलचीही मोडतोड
  • सोलापूर-उजनीतून भीमा नदीत ८० हजार क्युसेक्सचा विसर्ग ; नदीकिनारी सतर्कतेचा इशारा
  • सोलापूर-कामचुकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा,मनपा आयुक्त अविनाश ढाकणे
  • ठाणे-भिवंडी तालुक्यात धुवाधार पावसाने हळव्या भातपिकाचे नुकसान,शेतकरी चिंताग्रस्त
  • अकोला-अकोट ग्रामीण पोलिसांची दारू भट्टीवर धाड, ११,३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त.
  • पुणे-दौंडमधील फिरंगाई मातेच्या नवरात्र उत्सवास सुरूवात
Redstrib
अमरावती
Blackline
अमरावती - शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला, तरीही सरकार पडणार नाही. कारण १५ आमदार आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. त्यांनी अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
Published 22-Sep-2017 20:10 IST
अमरावती - डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या वर्धा शाखेतील गैरव्यवहार उघडकीस आला होता. आपल्या कार्यकाळात एवढा मोठा घोळ झाल्याची बाब बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांना सहन झाली नाही. त्यामुळे नैतिकतेपोटी आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष संजय खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Published 22-Sep-2017 14:15 IST
अमरावती - परतवाडा-धारणी रस्त्यावरील अपघाती वळणावर महिंद्रा पीक-अप आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
Published 22-Sep-2017 14:17 IST
अमरावती - हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृतदेह अचानक गायब झाला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी बाळाच्या वडिलांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
Published 22-Sep-2017 12:51 IST
अमरावती - इंधन दरवाढीविरोधात आज शिवसेनेच्यावतीने रहाटगाव नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Published 21-Sep-2017 21:51 IST
अमरावती - डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. बँक क्षेत्रातील जाणकार असलेल्या वानखेडे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागे बँकेतील कथित घोटाळ्याची किनार असल्याची चर्चा आहे.
Published 21-Sep-2017 12:03 IST
अमरावती - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोउत्सवासाठी संपुर्ण विदर्भवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती येथील अंबादेवी संस्थानची तयारी पूर्ण झाली. नवरात्र दरम्यान देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही मंदिर संस्थांनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.
Published 20-Sep-2017 20:24 IST
अमरावती - मागील २ दिवसापासून चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाचे २ दरवाजे मंगळवारी सायंकाळी ८ च्या सुमारास उघडण्यात आले.
Published 20-Sep-2017 18:27 IST
अमरावती - ज्यांच्याकडे शेतीच नाही, त्यांच्याही नावावर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने लाखो रुपयांचे कर्ज दाखविले आहे. विशेष म्हणजे याबाबत संबंधित ग्रामस्थांनाही माहिती नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आमदार अनिल बोंडे आणि संबंधित ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे व सहनिबंधक गौतम वालदे यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.
Published 19-Sep-2017 14:12 IST
अमरावती - मेळघाटमधील गवळी समाज व पशुपालक सोमवारी मोठ्या संख्येने गुराढोरांसह रस्त्यावर उतरला. जनावरांसाठी गायरान उपलब्ध करून देण्यात यावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, जंगलातील नदीपर्यंत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेली जनावरे दंड आकारून सोडण्यात यावी, गायी-म्हशींपासून मिळणारे खत विकण्याची परवानगी देण्यात यावी, या मागण्यांकडे शासनाचे लक्षMore
Published 19-Sep-2017 14:13 IST
अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १३३९ हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड करण्यात येते. मात्र आता या परिसरातील सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसावर गुलाबी अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक जात असल्याने या परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
Published 18-Sep-2017 15:07 IST
अमरावती - जिल्ह्यातील मोझरी येथे ७ वर्षांपूर्वी ११ महिला सदस्य असलेल्या नाजुका बचत गटाची स्थापना करण्यात आली होती. सामान्य कुटुंबातील महिलांनी तब्बल ५ वर्ष पन्नास रूपये प्रति महिना जमा ठेऊन या गटाची मुहूर्तमेढ रोवली.
Published 17-Sep-2017 12:11 IST
अमरावती - सर्वस्व दिल्यानंतरही प्रियकराने स्वत:चे लग्न झाल्याचे लपवून धोका दिल्याने गर्भवती प्रेयसीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी लघुवेतन कॉलनीत उघडकीस आली. मृत्यूपूर्वी प्रेयसीने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये तिने प्रियकराने केलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला आहे.
Published 17-Sep-2017 10:30 IST
अमरावती - जिल्हा परिषद शाळेत वापरण्यात येणाऱ्या ई-लर्निंग प्रोजेक्टच्या बनावट सॉफ्टवेअर निर्मितीच्या गोरखधंद्याचा सायबर पोलिसांनी शुक्रवारी पदार्फाश केला. याप्रकरणी साईनगर भागात राहणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Published 17-Sep-2017 10:12 IST


हे तंत्र देईल अल्झायमर रोगापासून मुक्ती
video playही टेस्ट करेल दोन मिनिटांत कॅन्सरचे निदान
ही टेस्ट करेल दोन मिनिटांत कॅन्सरचे निदान