• उस्मानाबाद :उमरगा-कवठा येथील लहान मुलीसह ३२ वर्षीय महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल
  • पुणे : हिंजवडीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एका मुलीचा मृत्यू
  • लातूर : हजारो महिलांच्या उपस्थितीत महाआरती करत पावसासाठी गणरायाकडे साकडे
Redstrib
अकोला
Blackline
अकोला - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडी स्थापन्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, याचवेळी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेसने त्यांना आघाडीपासून दूरच ठेवले आहे.
Published 18-Sep-2018 15:17 IST
अकोला- स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अकोला पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी ७ आरोपींना अटक करून जेरबंद करण्यात आले आहे. यातील ५ आरोपी हे गुजरातमधील सुरतचे असून २ आरोपी महाराष्ट्रातील नंदुरबार येथील आहेत. ही टोळी ग्राहकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील पैसे लुटत होती.
Published 17-Sep-2018 11:32 IST
अकोला - स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे अकोला येथील रेड डोअर कॅफे आणि न्यु राधा किसन प्लॉट येथे चलनातून बाद झालेल्या नोटा घेवून बसलेल्या २ जणांना ताब्यात घेतले आहे.
Published 16-Sep-2018 15:11 IST
अकोला - विक्की खट्टापे खून प्रकरणात मोक्का लावण्यात आलेला आरोपी प्रशांत उर्फ बंटी सटवाले याला पोलिसांनी अटक केली आहे. ही अटकेची कारवाई अकोला पोलासांनी केली.
Published 15-Sep-2018 23:01 IST
अकोला - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात शाळांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा अकोल्यात तीव्र निषेध करण्यात आला. सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने स्थानिक टॉवर चौक अकोला येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
Published 15-Sep-2018 23:12 IST
अकोला - परभणी येथील श्री गणेश वेदशाळेत वेदशास्त्रचे शिक्षण घेणाऱया ३ अल्पवयीन मुलांवर दोघांनी लैंगिक अत्याचार आणि अमानवीय छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणाऱयांपैकी एकजण संस्थाचालकाच्या नात्यातील अल्पवयीन मुलगा आहे. याप्रकरणी तीघांविरोधात परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संचालक सुधीर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे.
Published 15-Sep-2018 15:13 IST
अकोला - युवक काँग्रेसच्या अकोला शहर महासचिवपदी शिवतेज मनोहर इंगळे यांनी बाजी मारली आहे. इंगळे यांनी निवडणुक जिंकल्याची अधिकृत घोषणा आज स्वराज्य भवन येथे करण्यात आली.
Published 13-Sep-2018 21:34 IST
अकोला - एखाद्या समोर अचानक साप आला की त्यांची बोबडी वळतेच. मग त्यातल्या त्यात किंग कोब्रा असेल तर मग विचार न केलेलाच बरा. असाच एक प्रकार मिर्झापूरमध्ये घडला आहे. रात्री १ वाजण्याच्या सुमाराला एकाला अचानक किंग कोब्राला सामोरे जावे लागले. सापाला पाहताच त्याची बोबडी तर वळलीच सोबत रक्तदाबही वाढला.
Published 13-Sep-2018 21:28 IST
अकोला - आज गणरायाचे आगमन झाले आहे. प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाच्या ओढ लागल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळाले. यावेळी बाप्पाप्रेमींनी ढोलताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत बाप्पाची स्थापना केली. या मंगलमय वातावरणाने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
Published 13-Sep-2018 20:50 IST
अकोला - महानगरपालिकांमध्ये गणेशोत्सव परवानगीकरता सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु विनापरवानगी कोणत्याही मंडळाने गणपती प्रतिष्ठापना करू नये, यासाठी एक दिवसाची मुदतवाढ केली आहे.
Published 13-Sep-2018 12:39 IST
अकोला - जिल्ह्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी तो युवक नदीवर आंघोळीसाठी गेला असताना ही घटना घडली.
Published 12-Sep-2018 23:16 IST
अकोला - पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक घटना आणि सण-उत्सवाच्या बंदोबस्ताला गृहरक्षक दल हजर असते. त्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याने उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताला गृहरक्षक दलाने नकार दिला आहे. यामुळे बंदोबस्तामध्ये विस्कळीतपणा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published 12-Sep-2018 22:44 IST
अकोला - विद्युत वाहिनीच्या खांबावर चढून काम करीत असताना वीजेचा धक्का लागल्याने विद्युत वितरण कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्रीराम नायडू असे त्यांचे नाव असून शहरातील दुर्गा चौकात काम करत असताना ही दुर्घटना घडली आहे.
Published 12-Sep-2018 20:00 IST | Updated 21:31 IST
अकोला - जिल्ह्यात अकरा वर्षीय मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. शहरातील कृषीनगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Published 11-Sep-2018 14:57 IST

video playचलनातून बाद झालेल्या १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त,...
चलनातून बाद झालेल्या १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त,...
video playभारिप आणि एमआयएमच्या युतीने काँग्रेस नाराज!
भारिप आणि एमआयएमच्या युतीने काँग्रेस नाराज!

प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस गळतीचे वाढतेय प्रमाण
video playअननस खाण्याचे
अननस खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?