• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - गावठी कट्टा, पिस्तूल अशी हत्यारे सहजच शहरात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. कट्टा विक्रीसाठी आलेल्या एकास गुन्हे शाखा युनीट २ च्या पथकाने पाथर्डी फाटा बस स्टॉपजवळून देशी बनावटीच्या कट्‌ट्यासह अटक केली.
Published 26-Apr-2017 12:24 IST
नाशिक - शहराच्या नागरी भागात असलेल्या जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्यास धोका उत्पन्न झाल्याने महापालिकेने शहरातील सर्व गोठ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नगररचना विभागासह पर्यावरण व आरोग्य विभागामार्फत अनधिकृत गोठेधारकांना नोटीस बजावण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत.
Published 26-Apr-2017 11:45 IST
नाशिक - शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या संपावर जाण्याच्या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही आता संपावर जाणार आहेत.
Published 26-Apr-2017 10:40 IST
नाशिक - मनमाड रेल्वे स्थानकात मालगाडीचे ४ ते ५ डबे घसरल्याची घटना घडली. मनमाडकडून औरंगबादच्या दिशेने गाडी निघाली असताना हा अपघात घडला.
Published 25-Apr-2017 22:38 IST | Updated 22:38 IST
नाशिक - १ एप्रिल पासून सुरु होणारा नवीन कर्ज पुरवठा सुरु न केल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत जिल्हा सहकारी बँकेला टाळे ठोकले. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
Published 25-Apr-2017 21:05 IST
नाशिक - एकीकडे शासनाकडुन गरिब मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी प्रयत्न सुरु असताना, नाशिकमध्ये मात्र अल्पदरात गरिब विद्यार्थ्याना शिक्षण देणारी बी.डी. भालेकर शाळा भाडेतत्वार देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाने नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Published 25-Apr-2017 17:00 IST
नाशिक - जीसएटीची अंमलबजावणी होणार असल्याने विक्रिकर विभागाने आतापासूनच व्यापाऱ्यांना 'सॅप' कार्यप्रणालीद्वारे कर भरण्याचा आग्रह केला आहे. करोडो रुपये खर्च करून तयार केलेली नवी सॅपप्रणाली गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. यामुळे व्यापाऱ्यांना या प्रणालीची ओळख नाही. तर पूर्वीच्या महावॅटने कर भरण्याची सोय नाही.
Published 25-Apr-2017 14:15 IST
नाशिक - पुढच्या दोन ते तीन दिवसात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकांसंदर्भात गिरीश महाजन हे मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर पीक कर्जासंदर्भात तोडगा निघेल, अशी माहिती पालकमंत्री महाजन यांनी दिली. ते आज खरीप आढावा बैठकीत बोलत होते.
Published 25-Apr-2017 11:34 IST | Updated 11:38 IST
नाशिक - माणसाची उंची हा त्याच्या पर्सनालिटीचा भाग असतो. शहरात सध्या आनंद मेळा सुरू आहे. या मेळ्यात देशातील सर्वात उंच तरुणाने आपले प्रदर्शन भरवले आहे. त्याला बघण्यासाठी आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चक्क पैसे मोजावे लागत आहेत. धर्मेंद्र प्रताप सिंग (३५) असे या तरूणाचे नाव आहे.
Published 25-Apr-2017 11:21 IST | Updated 11:43 IST
नाशिक - दिंडोरी तालुक्यात काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. माळे दुमला येथे चुलत काकानेच आठ वर्षाच्या पुतणीचा बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना उघकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Published 25-Apr-2017 08:48 IST
नाशिक - महामार्गावरील अपघात कमी व्हावे म्हणून सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद केली. मात्र यामुळे शहराच्या आतील दुकानांवर मोठी गर्दी होऊन अनुचितप्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
Published 24-Apr-2017 23:06 IST
नाशिक - जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला आहे. ही घटना काल रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही काळ औरंगाबाद व पुण्याकडे जाणारी वाहतूक इतर लाईनवर वळवण्यात आली.
Published 23-Apr-2017 23:30 IST | Updated 07:14 IST
नाशिक - मालेगाव-सटाणा रस्त्यावर स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. कार चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकिनारी एका झाडाला गाडी धडकली. यात ३ जण जागीच ठार झाले आहेत. मृतामध्ये ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत व बचाव कार्य सुरू केले.
Published 23-Apr-2017 16:09 IST | Updated 16:13 IST
नाशिक - सर्वत्र तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. याला पशू, पक्षी अपवाद नाहीत. जिल्ह्यातील सटणाच्या डांगसौंदाणे येथे पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला. यानिमित्ताने वाढत्या तापमानाचा फटका प्राण्यांनाही बसत असल्याचे चित्र समोर आले आहे
Published 23-Apr-2017 14:49 IST

video playकाकाचा आठ वर्षीय पुतणीवर बलात्कार करून खून
काकाचा आठ वर्षीय पुतणीवर बलात्कार करून खून

ऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
video playदात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
दात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
video playही हिरवी पूड आहे सुपरफूड
ही हिरवी पूड आहे सुपरफूड

video play
'लिपस्टिक अंडर माय बुरखा'ला 'ए' सर्टिफिकेटची शिफारस