• कोल्हापूर - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एकाला लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
  • हिसार - फतेहाबाद येथे एका तांत्रिकाला १२० महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक
  • शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली-विखे
  • मुंबई - जगभरातल्या नेत्यांना मिठ्या मारता, राहुल गांधींची का नको - राज ठाकरे
  • जयपूर - गाय तस्कर समजून मुस्लीम तरुणाची जमावाकडून हत्या
  • पुणे - मुंढवा-केशवनगरमध्ये दुमजली इमारत कोसळली, ८ जण काढले सुखरुप बाहेर
  • हिंगोली : सशस्त्र सीमा बलाच्या कँपसमोर उभ्या ट्रकमध्ये आढळला मृतदेह
Redstrib
नंदुरबार
Blackline
नंदुरबार - विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. यावेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या निवडणुकीतील १६ उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
Published 25-Jun-2018 11:10 IST
नंदुरबार - विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना इमारतीवर वीज कोसळल्याची घटना नवापूर शहरात घडली आहे. शाळेच्या वर्गात सुमारे ५०० विद्यार्थी उपस्थित होते. या घटनेत विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. वीज कोसळल्याने पाण्याच्या टाकीचे तुकडे झाले आहेत.
Published 23-Jun-2018 11:46 IST
नंदुरबार - शाळा आणि विद्यार्थी यांचे एक अतुट नाते असते. हा शाळेचा पहिला दिवस कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी काकासाहेब हिरालाल मगन चौधरी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले.
Published 15-Jun-2018 14:14 IST
नंदुरबार - उत्तर महाराष्ट्र्रातील धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी भागाला नवसंजीवनी ठरणारी तापी बुराई उपसा सिंचन योजना गेल्या १० वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. या प्रश्नी शिवसेना या प्रश्नावर शासनदरबारी पाठपुरावा करीत होती, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याने शिवसेनाMore
Published 30-May-2018 17:50 IST
नंदुरबार - रेल्वे स्टेशनवरुन एका तीन वर्षीय बालकाचे अपहरण करणाऱया आरोपीला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. उदयकुमार छोटालाल दास असे आरोपीचे नाव आहे.
Published 30-May-2018 18:02 IST
नंदुरबार - पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रतिदिवस वाढत असल्याने वाहन ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. परंतु महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात याचा फारसा फरक पडत नसल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यात जातात. यामुळे त्यांना लिटर मागे साडेआठ रुपयांचा फायदा होत आहे.
Published 25-May-2018 13:04 IST | Updated 13:38 IST
नंदुरबार - राज्यात बंदी असलेले कापसाचे आरआरबीटी बियाणे विकणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुनीलाल पटेल असे या विक्रेत्याचे नाव आहे. पटेल याच्या घरावर छापा टाकला असता आरआरबीटी वाणाचे १ क्विंटल ३२ किलो बियाणे हस्तगत करण्यात आले आहे.
Published 17-May-2018 09:42 IST
नंदुरबार - पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी श्रमदान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आमिर खानच्या खान्देश दौऱ्याला सुरूवात झाली आहे.
Published 14-May-2018 13:29 IST | Updated 13:54 IST
नंदुरबार - महिलांना लग्न, शुभारंभप्रसंगी शृंगार करताना आपण पाहिले आहे. परंतु नवापूर शहरातील महिला चक्क अंतिम संस्काराचा शृंगार करण्यात रमली आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरातील रहिवासी जिजाबाई देविदास हिरे या ६५ वर्षीय महिलेने आपल्या अंतिम संस्काराची तयारी जिवंत असतानाच केली आहे. त्या शेवटच्या टप्प्यातील कर्करोगाशी झुंज देत आहेत.
Published 11-May-2018 15:57 IST
नंदुरबार - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मार्च २०१८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व आदिवासी गाव आणि पाड्यांमध्ये वीज जोडणी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच पंतप्रधान मोदींनीही देशातल्या प्रत्येक गावपाड्यात वीज पोहचल्याचा केलेला दावा खोटा ठरल्याचा प्रकार समोर आला आहे.
Published 08-May-2018 16:24 IST | Updated 19:52 IST
नंदुरबार - नवापूर तालुक्याच्या खांडबारा परिसरातील वागदा गावातून गुजरात, महाराष्ट्र वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने २५ लाखांचा खैर लाकडाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे वन तस्करात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published 08-May-2018 11:40 IST
नंदुरबार - सध्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्थानक चांगलेच चर्चेत आले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यानंतर ट्वीटरसह सोशल मीडियावर नवापूर रेल्वे स्थानकाबद्दल चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
Published 03-May-2018 17:55 IST
नंदुरबार - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत दीडपट हमीभाव दिला नाही, तर शेतकरी मोदींना पुन्हा चहा विकायला लावतील, अशी खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील हिंगणी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
Published 02-May-2018 22:16 IST
नंदुरबार - अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात गुरुवारी दुपारपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भर उन्हाळ्यात सातपुड्यात उगम पावणाऱ्या सुसरी नदीला अचानक पूर आला. उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नदी काठावरील हजारो नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
Published 13-Apr-2018 07:39 IST | Updated 07:44 IST