• मुंबई : अंधेरीतील एका इमारतीला आग, २ जणांचा होरपळून मृत्यू
  • मुंबई : नेहरु-आझाद-आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे - शरद पवार
  • लातूर:लान्स नाईक रोहित शिंगाडे शहिद; कर्तव्य बजावताना बर्फात पडून मृत्यू
  • मुंबई : मग वस्ताद चितपट कसा झाला? - सदाभाऊंचा राजू शेट्टींवर पलटवार
Redstrib
जळगाव
Blackline
जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची व भाजपची बदनामी केली. त्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील न्यायालयात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल आहे. हा खटला रद्द करावा, म्हणून दमानिया यांनी न्यायालयात दाखल केलेला अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला.
Published 12-Oct-2018 22:37 IST | Updated 23:17 IST
जळगाव- माझे नाव मोदी नाही सुळे आहे, आपल्याला कोणतीही गोष्ट मोठी करून सांगता येत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. जळगावमध्ये शुक्रवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पुढाकाराने जळगाव विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना खासदार सुळे बोलत होत्या. याप्रसंगीMore
Published 12-Oct-2018 21:04 IST
जळगाव - खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी आघाडी सरकारने आसोदा येथे बहिणाबाईंचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीही दिला. मात्र, सरकार बदलल्यानंतर या स्मारकाचे काम रखडले आहे. बहिणाबाईंचे स्मारक अपूर्ण ठेवण्याचे पाप भाजप सरकारचे आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली.
Published 11-Oct-2018 23:43 IST
जळगाव - विविध मागण्यांसाठी गुरुवारी शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनात शहरातील चार वसतिगृहातील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
Published 11-Oct-2018 23:44 IST
जळगाव - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांची पहिली महासभा गुरुवारी (११ ऑक्टोबर) सत्ताधारी-विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाने पार पडली. महासभा माहापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत व्यापरी संकुलातील गाळ्याच्या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
Published 11-Oct-2018 19:09 IST
जळगाव- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांची पहिली महासभा गुरुवारी (११ ऑक्टोबर) महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. या महासभेत गाळेधारकांच्या ठराव क्रमांक ४० च्या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. यासह मागील सत्ताधाऱ्यांचे काही ठराव रद्दच्या विषयांकडे देखील लक्ष असणार आहे.
Published 10-Oct-2018 21:24 IST
जळगाव - शहरातील योगेश्वरनगरमधील एका टेंट हाऊसच्या गोदामाला बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामन बंब वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे सुमारे दीड तास आग धगधगत राहिली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. परिसरातील तरुणांनी मोठ्या धाडसाने आगीचा सामना केला. विजेच्या खांबावरील सर्व्हिस वायर तुटल्यामुळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published 10-Oct-2018 20:55 IST

video playखडसे समर्थकांचा दानवेंना घेराव; पुनर्वसनाबाबत केली...